नवी दिल्ली : केंद्र सरकारने युवकांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी अग्निपथ योजनेची घोषणा केली आहे. अग्निपथ योजनेत युवकांना 4 वर्षांसाठी भारतीय सैन्यात सेवा देण्याची संधी मिळणार आहे. 4 वर्षांनंतर या सैनिकांची समीक्षा होईल, ज्यांची निवड होईल त्यांना कायम केले जाईल. यात भरती होणाऱ्यांना ‘अग्निवीर’ म्हटल्या जाईल. Young people will be able to become soldiers for 4 years, Modi government’s ‘Agneepath’ scheme Defense Minister Rajnath Singh
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज ‘अग्निपथ भरती योजना’ जाहीर केली असून यादरम्यान तरुणांना अल्प कालावधीसाठी सैन्यात भरती होण्याची संधी असल्याचे सांगितले. गेल्या अनेक वर्षांत संरक्षण यंत्रणा मजबूत करण्यासाठी अनेक पावले उचलण्यात आली आहेत. लष्कराला जगातील सर्वोत्तम सेना बनवण्यासाठी अग्निपथ योजना आणली जात असल्याचे राजनाथ सिंग यांनी सांगितले यामुळे देशाची सुरक्षेत योगदान देण्यासाठी अग्निवीर पुढे येतील.
नोकरीच्या संधी वाढतील. अग्निवीरसाठी उत्तम वेतन पॅकेजची व्यवस्था करण्यात आली आहे. जीडीपीमध्येही योगदान देईल. देशाला कौशल्याची माणसेही मिळतील. या योजनेअंतर्गत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या तरुणांनी मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असणे आवश्यक आहे. अनेक देशांमध्ये अभ्यास केल्यानंतर ही योजना आणली जात आहे. या माध्यमातून तरुणांना रोजगार मिळेल आणि चांगला पगारही मिळेल.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
https://www.facebook.com/109399567404448/posts/561097618901305/
विशेष म्हणजे आता लष्कराच्या रेजिमेंटमध्ये जात, धर्म आणि प्रदेशानुसार भरती होणार नाही. तर ही भरती भारतीय म्हणून होईल. म्हणजेच कोणत्याही जाती, धर्म आणि प्रदेशातील तरुण कोणत्याही रेजिमेंटसाठी अर्ज करू शकतात. या वर्षाच्या ऑगस्ट महिन्यापर्यंत ही भरती होण्याची शक्यता आहे.
या भरती अंतर्गत भरती होणाऱ्या सैनिकांना ‘अग्नवीर’ असं नाव देण्यात येणार आहे. येत्या ऑगस्ट महिन्यापासून ही भरती होण्याची शक्यता आहे. ‘टूर ऑफ ड्युटी’च्या धर्तीवर ही योजना तयार करण्यात आली असून त्यामध्ये सैनिकांना केवळ चार वर्षे सैन्यात सेवा करण्याचा पर्याय देण्यात येणार आहे. सैन्य भरतीसाठी संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत असलेला लष्करी व्यवहार विभागाकडून नवीन योजनेची घोषणा करण्यात आली आहे. लवकरच ही योजना कार्यान्वित केली जाईल. सैन्यातील ही नवीन भरती योजनेचं नाव ‘अग्निपथ’ आहे.
नव्या योजनेनुसार ही सैन्य भरती चार वर्षांसाठी असणार आहे. चार वर्षांनंतर सैनिकांच्या सेवांचा आढावा घेतला जाईल. त्यानंतर काही सैनिकांची सेवा वाढवली जाऊ शकते. तर बाकीचे सैनिक निवृत्त होतील. या चार वर्षांच्या नोकरीमध्ये सहा आणि नऊ महिन्यांचे प्रशिक्षण देखील असणार आहे. चार वर्षांच्या निवृत्तीनंतर या सैनिकांना पेन्शन मिळणार नाही. परंतु, एकरकमी रक्कम दिली जाईल, अशी माहिती आहे.
□ अग्निपथ योजना इतका मिळणार पगार
सरकारने लष्करात भरती करण्यासाठी अग्निपथ योजनेची घोषणा केली आहे. या योजनेंतर्गत निवडलेल्या अग्नीवीर ( वयाची अट-17.5 ते 21 वर्षे) तरुणांना 4 वर्षे लष्करात सेवा देता येणार आहे. त्यांना पहिल्या वर्षी 4.76 लाख ते चौथ्या वर्षी 6.92 लाखांपर्यंत वार्षिक वेतन दिले जाणार आहे. प्रत्येक महिन्याला पगारातून “सेवा निधीत 30 टक्के रक्कम कापली जाणार आहे. 4 वर्षानंतर सेवा निधीसह 11.7 लाखांची रक्कम परत मिळणार आहे.
https://www.facebook.com/109399567404448/posts/561054182238982/