Friday, January 27, 2023
Surajya Digital
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
  • ब्लॉग
  • अर्थाअर्थ
  • शिवार
  • Techनिक
No Result
View All Result
Surajya Digital
No Result
View All Result

सास-यावर तलवारीने हल्ला; जावयासह सहा जणांवर गुन्हा दाखल

Sword attack on Saas; Case registered against 6 persons including Javaya in Solapur

Surajya Digital by Surajya Digital
June 14, 2022
in Hot News, सोलापूर
0
सास-यावर तलवारीने हल्ला; जावयासह सहा जणांवर गुन्हा दाखल
0
SHARES
119
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

सोलापूर : पूर्वीच्या भांडणावरून तलवार काठी आणि लाथाबुक्क्याने केलेल्या मारहाणीत एक जण गंभीर जखमी झाला. ही घटना अक्कलकोटरोड वरील साई नगरात रविवारी सायंकाळच्या सुमारास घडली. Sword attack on Saas; Case registered against 6 persons including Javaya in Solapur

भद्रीनाथ हनुमंत पवार (वय ३५ रा. यमगरवाडी ता. तुळजापूर, सध्या रा. साईनगर) असे जखमीचे नाव आहे त्यांना गंभीर अवस्थेत शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून याबाबत जखमी सासरे भद्री हणुमंत पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून (जावई) श्रवण शिंदे सह अविराज शिंदे, भारत शिंदे, आनंद शिंदे, मोन्या शिंदे व विरप्पा शिंदे (पत्ता नमूद नाही) अशा ६ जणांविरुद्ध एमआयडीसीच्या पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला.

रविवारी (ता. 12) फिर्यादी अक्कलकोट रोडवरील साई नगरात कामानिमित्त गेले होते. घटनेपूर्वी फिर्यादी आणि जावई श्रवण शिंदे यांच्यामध्ये वाद झाला होता. त्या वादातूनच जावई श्रवण याने साथीदारासह फिर्यादींना लाथाबुक्यांनी मारहाण केली. त्यावेळी संशयित आरोपी मोन्या याने जीवे मारण्याच्या उद्देशाने फिर्यादीच्या पाठीत तलवारीने हल्ला केला. या हल्ल्यात जखमी झाल्याने फिर्यादी खाली पडले असता, संशयित आरोपी शिंदेने सोन्याची साखळी बळजबरीने हिसकावली.

सोन्या शिंदे याने त्यांच्या तुला खलास करतो म्हणत त्यांच्या पाठीत तलवार खुपसली. मारहाण करताना एकाने पवार यांच्या गळ्यातील सोन्याची चैन हिसकावून नेली, अशी नोंद एमआयडीसी पोलीसात झाली. सहाय्यक निरीक्षक कुकडे पुढील तपास करीत आहेत.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

 

 

□ रेल्वेच्या धडकेने जखमी झालेल्याचा मृत्यू

होटगी ते सोलापूर या लोहमार्गावर रेल्वेच्या धडकेने जखमी झालेले दिपक रामचंद्र पुजारी (वय ५२ रा.सुंदरमनगर, विजापूर रोड) हे शासकीय रुग्णालयात शनिवारी (ता. 11) मरण पावले. बुधवारी दुपारच्या सुमारास हा प्रकार घडला होता. त्यांना रेल्वे पोलिसांनी शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. या घटनेची नोंद रेल्वे पोलिसात झाली आहे .

□ साईनाथ नगरात पाईपने मारहाण महिलेसह दोघे जखमी

सोलापूर – घराजवळील किरकोळ भांडणातून लोखंडी पाईप आणि सळईने केलेल्या मारहाणीत महिला आणि त्यांचा मुलगा असे दोघे जण जखमी झाले. ही घटना अमन चौकाजवळील साईनाथ नगरात शुक्रवारी (ता. 10) रात्रीच्या सुमारास घडली.    सलीमा अश्पाक नाईकवाडी (वय ४२) आणि त्यांचा मुलगा अरबाज नाईकवाडी ( रा.साईनाथ नगर) अशी जखमींची नावे आहेत. त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. सोनाली सुरेश जाधव,आदित्य जाधव आणि बंटी जाधव यांनी मारहाण केली. अशी नोंद विजापूर नाका पोलीस ठाण्यात झाली आहे .

□ आकाशवाणी केंद्राजवळ मारहाण तरुण गंभीर जखमी

आकाशवाणी केंद्राजवळ गवळी वस्ती येथे  लोखंडी रॉड आणि काठीने केलेल्या मारहाणीत महेबुब सलीम जकलेर (वय ३० रा.अन्सारी चौक, शास्त्री नगर) हा गंभीर जखमी झाला. ही घटना शुक्रवारी (ता. 10) रात्रीच्या सुमारास घडली. त्याला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.अनोळखी दहा ते बारा लोकांनी मारहाण केली. अशी नोंद एमआयडीसी पोलिसात झाली आहे.

 

□ विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्‍न

देगाव (ता. मोहोळ) येथे राहणाऱ्या गोकुळ विश्वनाथ आतकरे (वय ६०) याने स्वत:च्या शेतात विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्‍न केला. शुक्रवारी (ता. 10) रात्री हा प्रकार घडल्यानंतर त्याला मोहोळ येथे प्राथमिक उपचार करून सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. यामागचे कारण समजले नाही.

तर मार्डी (ता.उत्तर सोलापूर) येथे राहणाऱ्या अतुल प्रभाकर इनामदार (वय २५) याने घरातील किरकोळ भांडणातून विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्‍न केला. शुक्रवारी (ता. 10) सायंकाळी घराजवळील रिक्षा स्टॉप जवळ हा प्रकार घडला. त्याला अब्बास शेख (शेजारी) यांनी शासकीय रुग्णालयात दाखल केले. याची नोंद तालुका पोलिसात झाली आहे.

 

 

Tags: #Sword #attack #Saas #Case #registered #persons #Javaya #Solapur#सासरा #तलवारी #हल्ला #जावई #गुन्हा #दाखल #सोलापूर #
Previous Post

India wins gold medal सोलापूरच्या रामजी कश्यपने महाराष्ट्र खोखो संघाला मिळवून दिले सुवर्णपदक खेलो इंडिया

Next Post

percentage scam समाजकल्याण विभागात दलित विकास निधीवरून टक्केवारीचा गोरखधंदा, आमदाराचा गंभीर आरोप

Surajya Digital

Surajya Digital

Next Post
percentage scam समाजकल्याण विभागात दलित विकास निधीवरून टक्केवारीचा गोरखधंदा, आमदाराचा गंभीर आरोप

percentage scam समाजकल्याण विभागात दलित विकास निधीवरून टक्केवारीचा गोरखधंदा, आमदाराचा गंभीर आरोप

वार्ता संग्रह

June 2022
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« May   Jul »

ट्विटर पेज

Currently Playing

About Us

SurajyaDigital
सुराज्य डिजिटल हा ब्रँड जगाच्या काना-कोपऱ्यातील सर्वंकष माहितीचा अचूक खजिना आपल्यापर्यंत पोहोंचविण्याचे काम करतोय. टाईम मीडिया हाऊसचा हा ब्रँड अल्पावधीतच मराठी वाचकांचा अत्यंत विश्वासार्ह ब्रँड बनला आहे.जगभरातील घटनांचा वेगवान आढावा घेत त्यावर भाष्य करण्याबरोबरच वाचकांच्या आवडीचे विषय, करमणूक यासारखे दृक्श्राव्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सुराज्य डिजिटल कटीबद्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा timemediahouse@gmail.com timemarathi@gmail.com
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697