बार्शी : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या तथा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्याबद्दल समाजमाध्यमावर आक्षेपार्ह मजकूर टाकून त्यांची बदनामी केल्याप्रकरणी बार्शीतील भाजपा कार्यकर्ते युवराज चंद्रकांत ढगे (रा. प्रसन्नदाता मार्ग, बार्शी) वर बार्शी शहर पोलीस ठाण्यात भादंवि तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियमानुसार गुन्हा दाखल झाला आहे. Offensive post about Chakankar, chairperson of women’s commission, crime against BJP activist
येथील राष्ट्रवादीच्या महिला जिल्हा उपाध्यक्ष सुवर्णा शिवपुरे यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. दरम्यान, युवराज ढगेस अटक करण्यात आले नंतर जामिनावर सुटका झाली. दि. १४ रोजी वटपौर्णिमा असल्याने राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा चाकणकर यांनी समाजमाध्यमावर मी लग्न झाल्यापासून एकदाही वडाला फेरे मारले नाहीत. माझ्या नवऱ्यानेही कधी तसा हट्ट केला नाही, अशी पोस्ट टाकली होती.
त्यावर ‘आईच्या गावात अन १२ च्या भावात’ या समाजमाध्यमावरील अकाऊंटवरून चाकणकर यांनी टाकलेली पोस्ट कॉपी करून त्यावर त्यांनी चाकणकर यांच्या पोस्टबद्दल आपले काय मत आहे? असे विचारले होते. तसेच चाकणकर यांनी समाजाला सत्यवानाची सावित्री कळली, पण जोतिबाची सावित्री कळलीच नाही असे वक्तव्य केलेवर आईच्या गावात अन १२ च्या भावात या समाजमाध्यमावरील अकाऊंटवर पटतय का ? असे विचारण्यात आले.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
https://www.facebook.com/109399567404448/posts/562906182053782/
यावर युवराज ढगेने आक्षेपार्ह उत्तर दिले. सदर पोस्ट व उत्तराचा स्क्रीन शॉट राष्ट्रवादी अल्पसंख्याक सेलचे बार्शी शहराध्यक्ष इब्राहिम शेख यांनी फिर्यादी शिवपुरे यांना दाखविला. त्यानंतर शिवपुरे यांनी चाकणकर यांच्याविषयी आक्षेपार्ह टिपण्णी करून त्यांची बदनामी केल्याप्रकरणी युवराज ढगे विरोधात तक्रार दिली.
दाखल तक्रारीनुसार पोलिसांनी युवराज ढगे या तरुणाविरोधात माहिती तंत्रज्ञान अधिनियमासह भारतीय दंड संहितेतील कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर उदार हे पुढील तपास करीत आहेत.
□ काश्मीरी पंडितांबाबतचे वक्तव्य भोवले, साई पल्लवीविरूद्ध तक्रार
काश्मीरी पंडितांबाबत केलेल्या वक्तव्यावरून दाक्षिणात्य चित्रपटातील प्रसिध्द अभिनेत्री साई पल्लवी विरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. बजरंग दलाच्या नेत्यांनी हैद्राबादच्या सुलतान बाजार पोलिस ठाण्यात ही तक्रार दाखल केली आहे. ‘विराट पर्वम’ या तिच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान साई पल्लवीने काश्मीरी पंडीतांवर झालेल्या आत्याचारांची तुलना ‘गायीची तस्करी आणि मॉब लिंचिंगशी केली होती.
https://www.facebook.com/109399567404448/posts/562888722055528/