पुणे : दहावीचा निकाल जाहीर झाला आहे. अशातच पुण्याच्या एका मुलाची चर्चा रंगली आहे. शुभम जाधव असं या विद्यार्थ्याचं नाव आहे. त्याला 35 टक्के मिळाले आहेत. मराठी, हिन्दी, इंग्रजी, गणित, विज्ञान या पाचही विषयात त्याला 35 गुण मिळाले आहेत. शुभम हा पुण्यातील गंजपेठेत राहतो. त्याच्या घरची परिस्थिती हलाखीची आहे. तो हार्डवेअरच्या दुकानात काम करतो. What is missing in Pune; Earned 35 marks in all subjects working hardware; Police Ganjpeth wants to be Shubham
पुण्यातील भवानी पेठेत राहणारा आणि रमणबाग शाळेतील शुभम राहुल जाधव या विद्यार्थ्याला इयत्ता दहावीमध्ये सर्व विषयामध्ये 35 गुण मिळाले आहे. शुभम हा हार्डवेअरच्या दुकानात काम करीत होता. त्यात त्याने हे यश मिळविले आहे. मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित,विज्ञान या पाचही विषयात त्याला ३५ गुण मिळाले आहेत.
शुभम हा पुण्यातील गंजपेठेत राहतो. त्याच्या घरची परिस्थिती हालाखाची आहे. तो हार्डवेअरच्या दुकानात काम करतो. दरमहा त्याला सहा हजार रुपये पगार मिळतो. वडील पाण्याच्या टाकीचं काम करतात. दहावीत त्याने सगळ्या विषयांचा अभ्यास केला होता. जास्त गुण मिळतील, अशी त्याची अपेक्षा होती. मात्र त्याला कमी गुण मिळाले.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
https://www.facebook.com/109399567404448/posts/563210105356723/
त्याच्या सर्व गुणांची टक्केवारी 35 टक्के इतकी झाली आहे. त्यामुळे आता त्याचे मार्क सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. दरम्यान, शुभमच्या परिसरातील नागरिकांनी पुणेरी पगडी आणि पेढे देऊन अभिनंदन केलं आहे. माझ्या घरची परिस्थिती हलाखीची असून वडील पाण्याच्या टाक्या दुरुस्तीच करतात. तर आई धुणीभांडी करण्याचं काम करते. माझ्या दहावीच्या शिक्षणाचा खर्च आई वडिलांवर नको म्हणून, मी हार्डवेअरच्या दुकानात काम करायचो.’ असं म्हणत शुभम जाधवने आपली घरची परिस्थिती बेताची असतानाही शिक्षण घेत असल्याची माहिती दिली.
या मार्कची माहिती आई वडीलांना दिली. दोघांना देखील खूप आनंद झाला. पण मला या परीक्षेत 50 ते 55 टक्के मिळतील असा अंदाज होता. पण कामामुळे मार्क कमी पडले. 9 वीमध्ये मला 67 टक्के होते. पण आता बारावीमध्ये 50 टक्यांपेक्षा अधिक पडायचे आहेत आणि पोलीस व्हायचं आहे.’ असं स्वप्नं असल्याचे शुभम जाधव याने सांगितलं.
एवढं काम करून तो पास झाला आहे. त्याबद्दल मला आनंद आहे. आता पुढील शिक्षण घेऊन परीक्षेत चांगले मार्क घ्यावेत आणि पोलीस होण्याचं स्वप्नं पूर्ण करावे. आम्ही त्याचे स्वप्नं पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार.’ असं शुभमचे वडील राहुल जाधव यांनी सांगितले.
https://www.facebook.com/109399567404448/posts/563148558696211/