सोलापूर – तक्रारी अर्जाची पाहणी करण्यासाठी आलेल्या प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यास अर्वाच्य शिवीगाळ करून शासकीय कामात अडथळा केल्याची घटना वटवटे (ता.मोहोळ) येथील जकराया शुगर कारखाना जवळ घडली. या प्रकरणात कामतीच्या पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली. Insult to Pollution Control Board officials; Three arrested
यासंदर्भात संजय ताराचंद ननावरे या प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी पोलिसात फिर्याद दाखल केली. कारखाना परिसरातील शेतात दूषित पाणी येत असल्याची तक्रार नारायण गुंड यांनी केली होती. त्या तक्रारी अर्जाचे पाहणी करणसाठी ननवरे हे मंगळवारी (ता .14) दुपारच्या सुमारास गेले होते.
त्यावेळी नारायण गुंड त्यांचा भाऊ हरी शिवाजी गुंड आणि लहु पंढरी जाधव (सर्व रा.येणकी ता.मोहोळ) या तिघांनी त्यांना अर्वाच्य शिवीगाळ करून कामात अडथळा केला होता. पुढील तपास सहाय्यक फौजदार दुधे हे करीत आहेत.
□ बोराळे येथे दगड काठीने मारहाण वृद्ध गंभीर जखमी
बोराळे (ता.मंगळवेढा) येथे भावकीतील भांडणातून काठी आणि दगडाने केलेल्या मारहाणीत सिद्धेश्वर मलसिद्ध कोठे (वय ६५) हे गंभीर जखमी झाले. ही घटना आज गुरुवारी दुपारच्या सुमारास घडली. त्यांना बेशुद्धावस्थेत सोलापुरातील शासकीय रुग्णालयात अशोक (मुलगा) यांनी दाखल केले. त्यांना हनुमंत मलसिद्ध कोठे आणि शांताबाई हनुमंत कोठे या दोघांनी मारहाण केली. अशी प्राथमिक नोंद तालुका पोलिसात झाली आहे.
□ दारू पिण्यास पैसे दिले नाही म्हणून भावावर वस्तऱ्याने वार
सोलापूर – दारू पिण्यासाठी पैसे दिले नाही म्हणून सख्ख्या भावाला वस्तऱ्याने वार करून जखमी करण्यात आले. ही घटना लकी चौकातील हेअर कटिंग दुकानात मंगळवारी (ता.14) सकाळी घडली.
राकेश अशोक सिंदगीकर (वय ४५ रा. माशाळ वस्ती) असे जखमी झालेल्या दुकानदाराचे नाव आहे. त्यांना मारहाण केल्याप्रकरणी त्यांचा भाऊ राजेश सिंदगीकर याच्याविरुद्ध फौजदार चावडीच्या पोलिसांनी गुन्हा दाखल केला. राकेश सिंदगीकर आज मंगळवारी सकाळी त्यांच्या दुकानात बसले होते.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
https://www.facebook.com/109399567404448/posts/562888722055528/
त्या वेळी त्यांचा भाऊ राजेश हा मद्यप्राशन करून दुकानात आला. आणि पैसे मागू लागला. पैसे नाही म्हणताच त्याने दुकानातील केस कापण्याचा वस्तरा घेऊन त्यांच्या गालावर आणि हातावर वार करून जखमी केले. अशी नोंद पोलिसात झाली. हवालदार चव्हाण पुढील तपास करीत .
□ विष प्राशन केलेल्या शेतकऱ्याचा मृत्यू
देगाव वाळूज (ता.मोहोळ) येथे स्वतःच्या शेतात विष प्राशन केलेले गोकुळ विश्वनाथ अतकरे (वय ६०) हे सोलापुरातील शासकीय रुग्णालयात उपचार घेताना आज मंगळवारी (ता. 14) दुपारी मरण पावले. त्यांनी १० जून रोजी रात्रीच्या सुमारास स्वतःच्या शेतात विष प्राशन केले होते. त्यांना मोहोळ येथे प्राथमिक उपचार करून सोलापुरात शहाजी (भाऊ) यांनी दाखल केले होते. अशी नोंद तालुका पोलिसात झाली आहे .
□ अपघातामधील वृद्ध महिलेचा मृत्यू
उस्मानाबाद येथील दर्गा रोडवर राहणाऱ्या सुगराबी गफूरर बागवान (वय ७५) या वृद्ध महिला सोलापुरातील शासकीय रुग्णालयात उपचार घेताना सोमवारी (ता. 13) सायंकाळी मरण पावल्या. शनिवारी रात्रीच्या सुमारास त्या घराजवळ पायी फिरत होत्या. त्यावेळी अज्ञात वाहनाच्या धडकेने त्या जखमी झाल्या. त्यांना उस्मानाबाद येथे प्राथमिक उपचार करून सोलापुरात दाखल करण्यात आले होते. अशी नोंद पोलिसात झाली आहे.
https://www.facebook.com/109399567404448/posts/562239768787090/