पुणे – राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाचा इयत्ता दहावीचा निकाल आज सकाळी जाहीर झाला आहे. एकूण ९६.९४ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. निकालात यंदा कोकण विभागातील विद्यार्थ्यांनी दमदार कामगिरी केली आहे. कोकण विभागात 99.27 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. सर्वाधिक कमी निकाल नाशिक विभागाचा लागला. Tenth: State Result 96.94%, Solapur 97.74%, lowest Nashik SSC Board
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीची परीक्षा यंदा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात आली. गेल्या वर्षी कोरोना प्रादुर्भावामुळे परीक्षा झाल्या नव्हती. पण यंदा मात्र कोरोना आटोक्यात असल्यानं दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात आल्या. त्यानंतर मात्र विद्यार्थी आणि पालकांना निकालाची प्रतीक्षा होती. अखेर ही प्रतिक्षा संपली असून आज दुपारी 1 वाजता ऑनलाईन निकाल जाहीर झाला आहे.
सर्वाधिक निकाल कोकण विभागाचा (९९.२७ टक्के) तर सर्वात कमी निकाल नाशिक विभागाचा (९५.९० टक्के) आहे. यंदा कोरोना महामारी काळानंतर पहिल्यांदाच झालेली ही दहावीची परीक्षा आहे. मागील वर्षी दहावी, बारावीच्या परीक्षा रद्द झाल्या होत्या. त्यामुळे यंदाच्या निकालाबाबत एक वेगळी उत्सुकता होती.
यावर्षी उत्तीर्ण विद्यार्थीनी 97.96 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. तर उत्तीर्ण होणाऱ्या मुलांचं प्रमाण 96.06 टक्के आहे. म्हणजे परीक्षा देणाऱ्या मुलांपेक्षा 1.09 टक्के अधिक मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. महाराष्ट्र बोर्डाच्यावतीने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली आहे.
राज्यात 15 लाख 68 हजार 977 विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती. त्यापैकी 15 लाख 21 हजार 003 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. राज्यात कोकण विभागाचा सर्वाधिक निकाल लागला आहे. कोकण विभागात सर्वाधिक 99.27 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर, सर्वाधिक कमी निकाल नाशिक विभागाचा लागला आहे. नाशिक विभागाचा निकाल 95.90 टक्के इतका लागला असल्याची माहिती महाराष्ट्र बोर्डाच्यावतीने देण्यात आली.
दहावी परिक्षेसाठी पुणे विभागातून २ लाख ६६ हजार ४०० विद्यार्थी बसले होते. यापैकी २ लाख २ ५८ हजार ३१२ विद्यार्थी पास झाले आहेत. हे प्रमाण शेकडा ९६.९६ टक्के इतका आहे.
पुणे विभागातून रिपीटर ९११० विद्यार्थी होते यातील ७३०५ विद्यार्थी पास झाले. प्रमाण ८०.१८ टक्के इतकं आहे. एकंदरीत यंदाही निकाल चांगला लागल्यानं आता मिशन ॲडमीशन हा मोठा प्रश्न विद्यार्थी आणि पालकांसमोर आहे.
https://www.facebook.com/109399567404448/posts/563193842025016/
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
□ दहावीचा सोलापुरात ९७.७४% निकाल
सोलापूर – दहावी परिक्षेचा सोलापूर जिल्ह्याचा निकाल ९७.७४ टक्के इतका लागला आहे. एकूण ६४ हजार ६५२ विद्यार्थ्यांनी परिक्षा दिली यातील ६३ हजार १९६ विद्यार्थी पास झाले आहेत. हे प्रमाण शेकडा ९७.७४ टक्के इतकं आहे.
पास झालेल्यात ३० हजार ७८७ गुणवत्तेत तर २३ हजार ०१६ प्रथम श्रेणीत, ८१६९, द्वितीय श्रेणीत तर १२२४ पास श्रेणीत यशस्वी झालेत. सोलापूर जिल्ह्यात सर्वात चांगला निकाल मोहोळचा ९८.७२ टक्के इतका लागला आहे. तर सांगोला – ९८.२६, मंगळवेढा – ९८.६६, बार्शी – ९७.९५, सोलापूर शहर – ९७.९०, माढा – ९७.८९, अक्कलकोट ९७.५९, पंढरपूर – ९७.२० , माळशिरस – ९७.०८, करमाळा – ९६.१६ – असा तालुक्याचा निकाल आहे.
https://www.facebook.com/109399567404448/posts/563147188696348/