□ जय हनुमान शेतकरी विकास पॅनलच्या ऐतिहासिक विजय
□ जय हनुमान शेतकरी ग्रामविकास पँनेल चा उडाला धुव्वा
अक्कलकोट : अक्कलकोट तालुक्यातील हालहळ्ळी (अ) विविध कार्यकारी सेवा सोसायटी निवडणुकीत जय हनुमान शेतकरी विकास पॅनलचा एकतर्फी ऐतिहासिक विजय झाला. चार बिनविरोध सह सर्व तेरा जागा जिंकल्या. ७० वर्षानंतर यंदा पहिल्यांदाच बिनविरोधची परंपरा खंडित झाली. विद्यमान सरपंच बिराजदार पँनेलचा दारुण पराभव करून हालहळ्ळी गावातील तरुणांनी सत्ताधा-यांना धूळ चारली. The youth of Akkalkot Halhalli village handed over the Charli Dhool Society to the authorities
विद्यमान सरपंच प्रकाश बिराजदार यांचे जय हनुमान शेतकरी ग्रामविकास पँनेलचा दारुण पराभव झाला आहे. जय हनुमान शेतकरी विकास पॅनलकडून सुनंदा श्रीशैल स्वामी, शेकव्वा सोमनिंग बिराजदार, संगीता गंगाधर बिराजदार, सोमनाथ बाळप्पा जमादार हे चार सदस्य बिनविरोध निवडून आले होते.
अनिल सिद्रामय्या स्वामी, गंगाधर गुणवंत बिराजदार, मल्लप्पा आणप्पा बिराजदार, नागनाथ भिमशा बिराजदार, रामेश्वर यशवंत बिराजदार, रुपसेन बसण्णा कळमंडे, विठ्ठल आंदप्पा कोळी, रामलिंग भोजराया पाटील, विरभद्रय्या सिद्रामय्या स्वामी हे नवनिर्वाचित संचालक म्हणून निवडून आले आहेत. इकडे जय हनुमान शेतकरी ग्रामविकास पॅनेलकडून माजी सरपंच निलप्पा लक्ष्मण बिराजदार व विद्यमान उपसरपंच सिध्दाराम इरण्णा सुतार यांना देखील सोसायटी निवडणुकीत दारुण पराभवास सामोरे जावे लागले.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
https://www.facebook.com/109399567404448/posts/563927818618285/
विजयानंतर फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण करीत वाजत गाजत, जंगी मिरवणूक हालहळ्ळी (अ) गावातील प्रमुख मार्गावरून काढण्यात आली. हनुमानाचे दर्शन घेऊन सर्व नवनिर्वाचित विजयी सदस्यांचे सत्कार करण्यात आला. हालहळ्ळी(अ) विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या निवडणुकीत विजयात पोलिस पाटील मल्लिकार्जुन बिराजदार, ग्रामसेवक श्रीशैल स्वामी,ग्रामपंचायत सदस्य पती श्रीशैल धनशेट्टी यांचे मोठे योगदान लाभले.
माजी तंटामुक्त अध्यक्ष लक्ष्मण पाटील, समाजसेवक रेवणसिध्द बिराजदार, सरदार धनशेट्टी, काशिनाथ इरण्णा बिराजदार, अप्पाराव पाटील, राजकुमार बिराजदार, इरय्या स्वामी, मल्लिनाथ पाटील, यात्रा पंचकमिटी पदाधिकारी विश्वनाथ बिराजदार, नागय्या स्वामी, शिवानंद बिराजदार, बसवराज बिराजदार ग्रामस्थांची सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन बसवराज पाटील तर आभार श्रीशैल बिराजदार यांनी मानले.
□ सत्तर वर्षानंतर यंदा पहिल्यांदाच गावात सोसायटी निवडणूक
मलकप्पा भिमण्णा गोविंदे हे २५ नोव्हेंबर १९५१ ला सोसायटीची स्थापना झाल्यापासून ते १९८४ पर्यंत असे ३३ वर्षे बिनविरोध चेअरमन पदी राहिले. गिरमलप्पा मुस्ती हे १९८४ ते २०१२ असे २८ वर्षे तर रामेश्वर ढब्बे यांनी २०१२ ते २०२२ असे दहा वर्षे बिनविरोध चेअरमन म्हणून राहिले, असे एकूण सत्तर वर्षात एकदाही गावात सोसायटी निवडणूक झाली नव्हती. परंतु यंदाचे सन 2022 हे वर्ष अपवाद ठरले.
https://www.facebook.com/109399567404448/posts/564033661941034/