Saturday, January 28, 2023
Surajya Digital
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
  • ब्लॉग
  • अर्थाअर्थ
  • शिवार
  • Techनिक
No Result
View All Result
Surajya Digital
No Result
View All Result

लांबोटीजवळील अपघातात जि.प. कर्मचारी ठार; चोरीची सहा वाहने जप्त करून तिघांना अटक

In the accident near Lamboti, Z.P. Employee killed; Mohol police seize six stolen vehicles and arrest three

Surajya Digital by Surajya Digital
June 18, 2022
in Hot News, सोलापूर
0
लांबोटीजवळील अपघातात जि.प. कर्मचारी ठार; चोरीची सहा वाहने जप्त करून तिघांना अटक
0
SHARES
110
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मोहोळ : सोलापूरकडून मोहोळकडे येणाऱ्या दुचाकीला पाठीमागून दुसऱ्या दुचाकीने धडक दिली. यात पाठीमागील दुचाकीस्वार रस्त्यावर पडल्याने त्याच्या डोक्याला गंभीर मार लागून त्याचा मृत्यू झाला आहे. हा अपघात शुक्रवारी (ता.१७ ) सकाळी ९ : ३० वाजण्याच्या दरम्यान लांबोटीजवळील सीना नदीच्या पुलालगत झाला. In the accident near Lamboti, Z.P. Employee killed; Mohol police seize six stolen vehicles and arrest three

 

शब्बीर हुसेन शेख असे मृताचे नाव आहे. मोहोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोलापूर येथील अंबादास प्रभाकर कटा व त्यांच्यासोबत अजय जगन्नाथराव जोशी (रा. लातूर ) असे दोघे जण मिळून पंढरपूर येथे दुचाकी (क्रमांक एम. एच.१३, बी. एल. २७६७) वरून निघाले असता मोहोळ तालुक्यातील लांबोटी येथील सीना नदी लगत असलेल्या पुलावर पाठीमागून आलेले जिल्हा परिषदेचे चतुर्थश्रेणी कर्मचारी शब्बीर हुसेन शेख (वय ५७ रा. शिरपूर सो. ) यांच्या दुचाकीने (क्रमांक एम. एच.१३, ए.पी.२२४३) कटा यांच्या दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिली. यावेळेस शब्बीर शेख हे रस्त्यावर पडल्याने त्यांच्या डोक्यास गंभीर मार लागला. दुसऱ्या दुचाकीवरील दोघांना किरकोळ मुक्का मार लागला. स्थानिक नागरिकांनी तात्काळ शब्बीर शेख यांना सोलापूर येथे उपचारासाठी पाठविले असता वाटेतच त्यांचा मृत्यू झाला.

याप्रकरणी दुचाकी चालक अंबादास कटा यांनी दिलेल्या खबरी वरून मोहोळ पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून अधिक तपास अपघात पथकाचे पोलीस कॉन्स्टेबल ज्योतिबा पवार करीत आहेत.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

 

 

 

□ तीन ट्रक्टर, दोन पीकअप एक बुलेट सह २५ लाखाचा मुद्देमाल जप्त, तिघांना अटक

मोहोळ : मोहोळ पोलिसांनी  पकडले डिझेल चोर परंतु त्यांच्याकडून तीन ट्रॅक्टर, दोन पीकअप एक बुलेटसह २५ लाखाचा चोरीचा मुद्देमाल त्याच्याकडून जप्त करून  त्या तीन संशयितांना ताब्यात घेऊन अटक केली.

पोलिसांकडून मिळालेली माहिती, मोहोळ पोलिस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलिस पेट्रोलिंग करत असताना सावळेश्वर जवळ मोटरसायकलवर हातामध्ये कँड घेवून डिझेलची चोरी करत असताना तीनजण दिसून आले त्यांना पकडून त्यांच्या जवळची मोटरसायकलवर ताब्यात घेतले. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी डिझेल चोरी केली असल्याचे कबूल केले सदर डिझेल हे चोरी करून आणलेल्या वाहनांमध्ये भरून  विक्रीसाठी नेण्यासाठी वापरत असल्याचे त्यांनी सांगितले.

 

त्यांच्याकडे असणारी बुलेट की त्यांनी पुणे येथून चोरी केल्याचे त्यांनी सांगितले, त्यांनी चोरी केलेले महिंद्रा अर्जून ५५५ लाल रंगाचा ट्रॅक्टर त्याची किंमत अंदाजे पाच लाख 30 हजार रुपये असून तो त्याच्या चोरीची करमाळा पोलीस ठाण्यात फिर्याद आहे. महिंद्रा अर्जून ५५५ लाल रंगाचा ट्रॅक्टर त्याची किंमत अंदाजे पाच लाख १५ हजार रुपये असून भूम  पोलीस ठाण्यांमध्ये या ट्रॅक्टर चोरीची नोंद आहे. जॉन डीयर कंपनी चा हिरवा रंगाचा ट्रॅक्टरची किंमत सहा लाख रुपये असून माढा पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद आहे.

महिंद्रा  मॅक्स पिकप मुरुड जिल्हा लातूर येथून चोरी करण्यात आला याची किंमत चार लाख ३० हजार त्यांच्या महिंद्रा मॅक्स  पीकअप पांढऱ्या रंगाचा त्याची अंदाजे किंमत तीन लाख ७० हजार रुपये तर रॉयल एनफिल्ड कंपनीची क्लासिक बुलेट किंमत अंदाजे एक लाख रुपये असून यासह २५ लाख ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला.

यामध्ये सतीश शहाजी खांडेकर (रा वडनेर ता. परांडा जि. उस्मानाबाद), विशाल संभाजी मेरड व विशाल लक्ष्मण खळवट  (वय २२  रा. उडेगाव ता. बार्शी) असे तिघांची नावे आहेत. या तिघांना ही अटक करण्यात आली.

ही कामगिरीमध्ये मोहोळ पोलिस ठाण्याचे पोलिस अधीक्षक पोलिस उपअधीक्षक आमोल भारती,  पोलीस निरीक्षक अशोक सायकर  यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचारी सचिन माने, पोलीस नाईक अमोल घोळवे, पोलीस नाईक प्रवीण साठे, सिद्धनाथ मोरे   महीला पोलीस अनुसया बंडगर, सिद्धेश्वर थोरात यांनी कामगिरी केली.

 

 

Tags: #accident #Lamboti #ZP #Employee #killed #Mohol #police #seize #six #stolen #vehicles #arrest#लांबोटी #अपघात #जिप #कर्मचारी #ठार #चोरी #सहावाहने #जप्त #तिघांना #अटक #मोहोळ #पोलीस
Previous Post

दहावीत कमी मार्क मिळतील या भीतीने सोलापुरात विद्यार्थीनीची आत्महत्या

Next Post

नियमभंगामुळे बार्शीतील नऊ कृषी केंद्रांना बियाणे विक्री बंदचा आदेश

Surajya Digital

Surajya Digital

Next Post
नियमभंगामुळे बार्शीतील नऊ कृषी केंद्रांना बियाणे विक्री बंदचा आदेश

नियमभंगामुळे बार्शीतील नऊ कृषी केंद्रांना बियाणे विक्री बंदचा आदेश

वार्ता संग्रह

June 2022
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« May   Jul »

ट्विटर पेज

Currently Playing

About Us

SurajyaDigital
सुराज्य डिजिटल हा ब्रँड जगाच्या काना-कोपऱ्यातील सर्वंकष माहितीचा अचूक खजिना आपल्यापर्यंत पोहोंचविण्याचे काम करतोय. टाईम मीडिया हाऊसचा हा ब्रँड अल्पावधीतच मराठी वाचकांचा अत्यंत विश्वासार्ह ब्रँड बनला आहे.जगभरातील घटनांचा वेगवान आढावा घेत त्यावर भाष्य करण्याबरोबरच वाचकांच्या आवडीचे विषय, करमणूक यासारखे दृक्श्राव्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सुराज्य डिजिटल कटीबद्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा timemediahouse@gmail.com timemarathi@gmail.com
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697