सोलापूर : 8 वर्षांपूर्वी जेवणाचे बील दिले नसल्याचा दावा करत हॉटेल मालकाने सदाभाऊ खोत यांच्या गाडीचा ताफा अडवला. त्यानंतर हा हॉटेल मालक अशोक शिनगारे राष्ट्रवादीचा कार्यकर्ता असल्याचे सदाभाऊंनी म्हटले होते. आता यावर हॉटेल मालक म्हणाले की, ‘माझा आणि राष्ट्रवादीचा कसलाही संबंध नसून माझ्यावर असलेल्या गुन्हेगारी केसबाबत सदाभाऊ खोटी माहिती देत आहेत. माझ्या हॉटेलची 8 वर्षांपूर्वीची उधारी आधी द्यावी’. ‘I am not a nationalist activist; Lend 8 years ago Raju Shetty Udi Politics
मी राष्ट्रवादीचा नव्हे तर रघुनाथ दादा पाटील यांच्या शेतकरी संघटनेचा कार्यकर्ता आहे. मला माझ्या हॉटेलाची उधारी मिळेपर्यंत सदाभाऊ यांना अडवणार आणि पैसे वसूल करणार अशी स्पष्ट भूमिका उधारीसाठी सदाभाऊंचा ताफा अडवणारे हॉटेल मालक अशोक शिनगारे यांनी वृत्तवाहिनीला बोलताना दिली आहे.
माझा आणि राष्ट्रवादीचा कसलाही संबंध नसून माझ्यावर असलेल्या गुन्हेगारी केसबाबत सदाभाऊ खोटी माहिती देत आहेत. मी कधीही वाळूचा व्यवसाय केलेला नसून कर्नाटक येथून माझ्याकडे आलेले 13 किलो सोने मी सांगोला पोलिसांच्यामार्फत कर्नाटक पोलिसांना मिळवून दिले होते. माझ्यावर कोणत्याही केस नसून ज्या केस असतील त्याला मी तोंड देण्यास खंबीर आहे.
मात्र सदाभाऊंनी माझ्या हॉटेलची आठ वर्षांपूर्वीची उधारी आधी द्यावी अशी मागणी केली. हॉटेल ‘मामा भाचे’ हे माझ्या मालकीचे असून मी ते चालवायला माझ्या भाच्याला दिले आहे. सदाभाऊ खोटी माहिती देऊन पैसे बुडवायचा तयारीत असले तरी मी माझे पैसे मिळाल्याशिवाय सोडणार नाही, ते येतील तेव्हा त्यांच्या गाड्या अडवणार असल्याची भूमिका घेतली आहे.
□ कालचे सर्व आरोप फेटाळून लावले
सदाभाऊ यांनी काल सोलापूर येथे पत्रकार परिषद घेऊन अशोक शिनगारे याच्यावर केलेले सर्व आरोप फेटाळून लावल्याने आता सदाभाऊ यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. काल पंचायत राज बैठकीला जात असताना हॉटेल उधारीसाठी सदाभाऊ खोत यांचा गाडीचा ताफा शिनगारे यांनी अडविल्यामुळे सदाभाऊ खोत यांची मोठी नाचक्की झाली आहे.
आता सदाभाऊ आपण कोणाचीही उधारी बुडवली नसल्याचे सांगत असले तरी माढा लोकसभा निवडणुकीत सदाभाऊ यांचे काम करणारे सांगोल्यातील परमेश्वर कोळेकर यांनी मात्र सदाभाऊ यांनी अनेकांचे पैसे बुडविल्याचा आरोप केला आहे. सदाभाऊ यांना सांगोला तालुक्याने हजारोंची आघाडी मिळवून दिली मात्र त्यावेळी राबणारे आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना अजूनही सदाभाऊ यांच्या उधारीसाठी फोन येत असल्याचे परमेश्वर कोळेकर यांनी सांगितले.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
https://www.facebook.com/109399567404448/posts/563741891970211/
□ अशोक शिनगारे यांच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल
सदाभाऊ यांचा ताफा अडवणाऱ्या अशोक शिनगारे यांच्या विरोधात सांगोला पोलीस ठाण्यात भादवी 341 आणि 186 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु असल्याचे पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांनी सांगितले आहे. आता सदाभाऊ ही 66 हजार 450 रुपयांची उधारी देणार की पुन्हा शिनगारे त्यांची वाट अडवणार हे पाहावे लागणार. असे असले तरी राष्ट्रवादी काँग्रेस मात्र या सर्व प्रकारची दुरून गंमत बघत आहे. या सर्व प्रकारामुळे सदाभाऊ यांची राज्यभरात नाचक्की झाल्यानंतर भाजप नेते देवेंद्र फडणवीस यात काय भूमिका घेणार याकडे जिल्हावासियांचे लक्ष लागले आहे.
□ उधारी प्रकरणात राजू शेट्टींची उडी
या सगळ्या प्रकरणावर माजी खासदार राजू शेट्टी यांनी प्रतिक्रिया देऊन यात उडी घेतलीय. खोत यांच्याकडे उधारी मागणारा हॉटेल मालक हा आमचा जूना कार्यकर्ता असल्याचे शेट्टी म्हणाले. सदाभाऊ खोत यांच्याकडे उधारी मागणारा हॉटेल मालक अशोक शिनगारे हा कार्यकर्ता पूर्वी आमच्या संघटनेत सक्रिय होता. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत त्याने आम्हाला साथ दिल्याचे माहिती माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिली.
सदाभाऊ खोत यांचे एकेकाळचे सहकारी राजू शेट्टी यांनी मात्र अशोक शिनगारे हा आमच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेतला सक्रिय कार्यकर्ता होता. तो जेव्हा सक्रिय होता तेव्हा त्याने काही आंदोलनातही सहभाग घेतला होता. आता तो आमच्या संघटनेत नाही. मात्र, पूर्वी होता. 2014 सालच्या लोकसभा निवडणुकीत त्याने आमच्या उमेदवाराला सहकार्य केले होते असे ही शेट्टी म्हणाले.
https://www.facebook.com/109399567404448/posts/563713271973073/