जळगाव : जळगावच्या तरूणाने फेसबुकला टक्कर देण्यासाठी एका ॲपची निर्मीती केली आहे. त्याने ‘इंडिया बुक’ नावाचे एक देशी ॲप बनवले आहे. या ॲपला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. 3 दिवसांत या ॲपला 18 हजार इन्स्टॉल आले आहेत. लक्ष्मीकांत सोनार असे या ॲपची निर्मीती केलेल्या तरूणाचे नाव आहे. या ॲपमध्ये 10 हजारांपर्यंत मित्र जोडू शकता. या तरूणाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. Young Laxmikant Sonar from Jalgaon created a country app called ‘India Book’ which is similar to Facebook
फेसबुक हे मंच विदेशी आहे. मात्र इंडियाबुक (Indiabook) नावाचे हे देशी अॅप आहे. या ॲपचा शोध लावणा-या तरूणाचे लक्ष्मीकांत सोनार असे नाव असून तो केवळ 26 वर्षीचा आहे. भारताचे देखील फेसबुकसारखे एखादे अॅप असावे, याच उद्देशाने राज्यातील जळगाव येथील एका तरुणाने India Book ‘इंडिया बुक’ नावाचे देशी अॅप विकसित केले आहे. हे अॅप आता फेसबुकला टक्कर देणारे ठरणार आहे.
लक्ष्मीकांतने “इंडियाबुक” नावाचे अॅप तयार केले असून, हे अॅप तुम्हाला गुगल प्ले स्टोरवरवरून डाऊनलोड करता येईल. अवघ्या तीन दिवसांमध्ये 18 हजारांहून अधिक जणांनी हे अॅप डाऊनलोड केले आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील लक्ष्मीकांत सोनार या 26 वर्षीय तरुणाने India Book इंडिया बुक नावाचे अॅप विकसित केले असून, हे अॅप गुगल प्ले स्टोरवरून डाऊनलोड करता येते. अवघ्या तीन दिवसांमध्ये 18 हजारांहून अधिक जणांनी हे अॅप डाऊनलोड केले आहे. India Book इंडिया बुक हे अॅप फेसबुकच्या तोडीसतोड असे अॅप आहे.
विशेष म्हणजे, हे भारतात तयार करण्यात आलेले अॅप आहे. या अॅपच्या माध्यमातून फेसबुक प्रमाणेच लाईव्ह कॉल, शेअरिंग, चॅटिंग, कमेंट्स आणि आपले विचार मांडू शकता येतात. या अॅपमध्ये विविध विषयांवर पोस्ट देखील करता येतात. फेसबुकमध्ये मित्र अॅड करण्याची मर्यादा ही केवळ पाच हजार इतकीच आहे. तर या देशी अॅपमध्ये मित्र संख्या दहा हजारापर्यंत वाढवण्यात आली आहे.
हे अॅप हॅक होणे या प्रकाराला आळा बसावा, यासाठी तांत्रिकदृष्ट्यादेखील अत्यंत सुरक्षित बनवण्यात आले आहे. नकारात्मक असणार्या पोस्ट रिपोर्ट करताच आपोआप त्या या अॅपवरून डिलिट होणार आहेत. विशेष म्हणजे, या अॅपची साईज अत्यंत कमी आहे, त्यामुळे हे अॅप मोबाईलमध्ये सहज वापरता येते. यासाठी मोबाईल जास्त स्पेसही घेत नाही.
India Book इंडिया बुक या अॅपवर बिझनेस, जाहिरात, गेम्स वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ, मायक्रो ब्लॉगिंग सुविधा आणि मेसेजिंग इत्यादी मंच उपलब्ध आहेत. या अॅपद्वारे चॅटही करता येते. तसेच मायक्रो ब्लॉगिंग साईटच्या माध्यमातून विविध विषयांवर व्यक्त सुद्धा होता येते. सोबतच जाहिरातदेखील करता येते. अल्पावधीतच इंडिया बुक तरुणांमध्ये लोकप्रिय झाले आहे. या अॅपच्या माध्यमातून फेसबुकला एक नवा पर्याय उपलब्ध झाला आहे.