मुंबई : विधान परिषदेच्या मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर आता पहिल्या फेरीचा निकाल हाती आला आहे. यामध्ये भाजपचे सर्वच्या सर्व 5 उमेदवार विजयी झाले आहे. राष्ट्रवादी 2, शिवसेना 2 आणि काँग्रेसचा 1 उमेदवार विजयी झाला. भाजपला पहिल्या पसंतीची तब्बल 133 मते पडले आहेत. राष्ट्रवादीला एकूण 57 मतं मिळाली. शिवसेनेच्याही पहिल्या पसंतीची 3 मते फुटली आहेत. भाजपला अधिकची 27 मते मिळाली आहेत. तर काँग्रेसला 41 मते मिळाली आहेत. BJP’s 5 candidates won while Shiv Sena’s 3 votes split Congress
राज्यसभा निवडणुकांनतर अवघ्या 10 दिवसांत विधानपरिषदेची निवडणूक झाली. त्यामुळे ही लढत अत्यंत अटी-तटीची मानली गेली. विधानपरिषद निवडणुकीत प्रत्येक उमेदवाराला जिंकण्यासाठी 27 मतांची आवश्यकता होती. त्यामुळे सहा उमेदवार जिंकवण्यासाठी महाविकास आघाडीला 162 मतांची गरज होती.
विधान परिषद निवडणुकीतील अखेरचा निकाल जाहीर झाला आहे. काँग्रेसचे नेते चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव झाला आहे. तर काँग्रेसच्या भाई जगताप आणि भाजपचे प्रसाद लाड यांचा विजय झाला आहे. जगताप यांना 26 तर प्रसाद लाड यांना 28 मते मिळाली आहेत. काँग्रेसच्या कोट्यातील पूर्ण मते त्यांना मिळाली नाहीत, त्यांची काही मते फुटली, असे सांगितले जात आहे. विधान परिषदेचा निकाल येण्यास सुरूवात झाली आहे. राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे हे विजयी झाले आहेत. त्यांना 29 मते पडली आहेत.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
https://www.facebook.com/109399567404448/posts/565373551807045/
》 विधान परिषद – निकाल
* सचिन अहिर (शिवसेना) विजयी
* आमशा पाडवी (शिवसेना) – विजयी
* भाई जगताप (काँग्रेस) विजयी
* एकनाथ खडसे (राष्ट्रवादी काँग्रेस) विजयी –
* रामराजे निंबाळकर (राष्ट्रवादी काँग्रेस) विजयी
* प्रवीण दरेकर (भाजप) – विजयी
* राम शिंदे (भाजप) – विजयी
* श्रीकांत भारतीय (भाजप) विजयी
* उमा खापरे (भाजप) विजयी
* प्रसाद लाड (भाजप) विजयी
विधानपरिषद निवडणुकीबाबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले, “आमच्याकडून काही चुका झाल्या. त्या सुधारून आम्ही विधानपरिषद निवडणुकीला सामोरं जाऊ. आम्हाला विश्वास आहे की आम्ही सर्व जागा जिंकू.”
राज्यसभा निवडणुकीत अपक्षांनी भाजपच्या पारड्यात झुकतं माप टाकलं होतं. सरकार चालवण्यासाठी अपक्षांचा पाठिंबा असूनही राज्यसभेत अयशस्वी ठरलेले उद्धव ठाकरे विधानपरिषदेत अपक्षांची मनधरणी करण्यात यशस्वी होतील का, हा मोठा प्रश्न आहे.
आज पार पडलेल्या विधान परिषदेच्या निवडणूकीत एकनाथ खडसे यांना पहिल्या क्रमाकांची २७ मतं मिळवत दणदणीत विजय मिळवला आहे. त्यांच्या या विजयानंतर एकनाथ खडसे यांनी मिळालेली अतिरीक्त मते ही माझ्या भाजपमधल्या मित्रांनी दिली असे म्हटले आहे.
राष्ट्रवादीकडं फक्त ५१ मतं होते तरी आम्हाला ५८ मते मिळाली ज्यापैकी २९ मते मला मिळाली असे खडसे यांनी सांगितले.जी काही मते मिळाली असतील ते मला भाजपमधल्या मित्रांनी दिले असावेत असा विश्वास असल्याचे त्यांनी म्हटले आहे. शरद पवार, अजित पवार आणि जयंत पाटील या नेत्यांनी मला संधी दिली या संधीचं मी सोनं करेल, पुर्वीपेक्षा बोलायला अधीक संधी आणि वेळ आहे, असे खडसे यांनी म्हटले.
दरम्यान, बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर यांनी मतदानाचा हक्क बजावल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला.
संजय राऊतांनी आमदार फुटल्याविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. यावर हितेंद्र ठाकूर यांनी संजय राऊतांना चांगलेच सुनावले. मला फक्त काँग्रेस किंवा भाजपने नाही तर सर्व पक्षाने मतदानाची विनंती केली. माझे सर्वांशी चांगले नाते आहे असे ते म्हणाले. यावर आमदार काय मच्छीबाजार आहे काय? असा सवालही त्यांनी केला. लोकशाहीने आपण मत दिले असल्याचे ते सांगायला विसरले नाहीत.
https://www.facebook.com/109399567404448/posts/565430505134683/