मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणाला हादरा देणारी बातमी समोर येत आहे. नॉट रिचेबल असणारे शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांचा पत्ता लागला आहे. एकनाथ शिंदे हे गुजरातमध्ये असल्याची माहिती समोर आली आहे. एकनाथ शिंदे यांना फोनवर संपर्क केल्यानंतर गुजराती भाषेतील टोन ऐकू येत आहे. त्यामुळे ते गुजरातमध्ये असल्याची चर्चा सुरू आहे. Thackeray government in danger; Minister Eknath Shinde in Gujarat? Ahmedabad Mahavikas Aghadi Shiv Sena likely to join BJP
एकनाथ शिंदे यांच्यासोबत काही आमदारही असल्याची माहिती आहे. एकनाथ शिंदे आणि त्यांचे समर्थक आमदार फुटल्यास महाविकास आघाडीचं अस्तित्वच धोक्यात येऊ शकतं.
राज्यात सत्ताधारी असलेल्या महाविकास आघाडीतील शिवसेना पक्षात सध्या अंतर्गत बंडाळी माजल्याचे दिसत आहे. शिवसेनेचे महत्वाचे नेते एकनाथ शिंदे हे तीव्र नाराज असून ते थेट भाजपात जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मंगळवारी (दि. 21 जून) रोजी उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या सर्व आमदारांची तातडीची बैठक बोलावली आहे.
मात्र, एकनाथ शिंदे हे 11 समर्थक आमदारांच्या गटासह महाराष्ट्राबाहेर गुजरात येथे असल्याचे बोलले जात आहे. एकनाथ शिंदे यांची नाराजी पाहता ते भाजपात गेल्यास शिवसेनेला पर्यायाने महाविकास आघाडीला मोठे खिंडार पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील ठाकरे सरकार कोसळू देखील शकतं.
आज मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी दुपारी शिवसेनेच्या आमदारांची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीला एकनाथ शिंदे हजर राहणार का? याकडे लक्ष लागलं आहे. काल सोमवारी पार पडलेल्या विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेने आपले दोन्ही उमेदवार विजयी करण्यात यश मिळवले. मात्र, या निवडणुकीत काँग्रेससोबत शिवसेनेचेही मते फुटली असल्याची चर्चा सुरू आहे. आता फुटलेल्या मतांवरून आता शिवसेनेतच फूट पडतेय का, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
https://www.facebook.com/109399567404448/posts/565443128466754/
एकनाथ शिंदे हे सुरतमधील एका हॉटेलमध्ये मुक्कामी असल्याचे काही वृत्तवाहिन्यांनी दिली आहे. एवढेच नाही तर गुजरात पोलिसांनी या हॉटेलबाहेर कडक पोलीस बंदोबस्त लावला आहे, अशीही दृश्य न्यूज चॅनेल्सवर दाखवली जात आहेत. दरम्यान भाजपच्या गुजरातमधील काही नेत्यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली असल्याची माहिती रिपोर्टरने दिली आहे. तसेच त्यानंतर हे भाजप नेते अहमदाबादच्या दिशेने रवाना झाल्याची वृत्त काही माध्यमांनी दिले आहे. एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेचे ११ आमदार हॉटेलमध्ये आहेत, असेही समजते आहे.
विधान परिषद निवडणुकीनंतर शिवसेनेतील अंतर्गत धुसफूस बाहेर येत आहे. शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय समजले जाणारे शिवसेना नेते एकनाथ शिंदे हे नाराज असल्याचे वृत्त होते. त्यातच आता त्यांचे समर्थक समजले जाणारे 13 आमदार नॉट रिचेबल असल्याची माहिती समोर आली होती. मध्यरात्री शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या आमदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीत 13 आमदार अनुपस्थित होते. त्यानंतर शिवसेनेच्या गोटातील चिंता आणखी वाढली आहे.
गेले काही वर्ष नाराज असलेले शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे आणि त्याच्या गटाचे आमदार यांनी टोकाचं पाऊल उचललं आहे अशी माहिती समोर येत आहे. एकनाथ शिंदे यांचा नाराज गट काल सायंकाळपासूनच नॉट रिचेबल असल्याची माहिती आहे. फोन नॉटरिचेबल लागत आहे. शिवसेनेतली धुसफूस लक्षात येताच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देखील ‘वर्षा’ या निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी चर्चा केली.
https://www.facebook.com/109399567404448/posts/565693525108381/