मुंबई : काँग्रेसने बंडखोर शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या नावावर सहमती दर्शवली आहे. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करायचं असेल तर त्याला कॉंग्रेसची कोणतीही हरकत नसेल, असं नाना पटोले यांनी सांगितलं आहे. या प्रस्तावाचा शिवसेनेकडून विचार होतो का, , ते बघावं लागेल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही वेळापूर्वी जनतेशी संवाद साधला होता. तसेच पद सोडण्याची तयारी दर्शवली होती.
यासंदर्भात कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याची माहिती आहे. राज्यात सुरू असलेल्या राजकीय नाट्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही वेळापूर्वी जनतेशी संवाद साधला होता. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बंड केलेल्या आमदारांनी मला समोर येऊन सांगा, मी मुख्यमंत्री पद सोडायला तयार आहे, असं म्हटलं होतं. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करायचं असेल तर त्याला कॉंग्रेसची कोणतीही हरकत नसेल, असं नाना पटोले यांनी सांगितलं आहे.
“मुख्यमंत्री जो निर्णय घेतील त्या निर्णयाबरोबर कॉंग्रेस आहे. सध्या आमचा विषय असा आहे की, जेव्हा महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं तेव्हा आम्ही त्यांना सपोर्ट केला. आताही जर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांच्याच पक्षाचा मुख्यमंत्री करत असतील आणि त्यासाठी कॉंग्रेस पक्षाची ते मदत मागत असतील तर आम्ही त्यांच्या सोबत आहोत” असं नाना पटोले यांनी सांगितलं आहे.
https://www.facebook.com/109399567404448/posts/566604191683981/
नाना पटोले म्हणाले की, “मुख्यमंत्री कुणाला करायचं हा उद्धव ठाकरे यांचा निर्णय आहे. त्याला आमची हरकत नाही. आमची भूमिका स्पष्ट आहे की, आम्हाला भाजपला सत्तेपासून दूर ठेवायचं आहे. याशिवाय जर त्यांना दुसऱ्या पक्षासोबत सुद्धा जायचं असेल तर त्याला आमची काही जबरदस्ती नाही. काय निर्णय घ्यायचा तो शिवसेनेचा अंतर्गत मुद्दा आहे, त्यांच्या निर्णयाकडे आमचं लक्ष आहे, असेही ते म्हणाले.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
□ होय, संघर्ष करणार, कोणी सल्ला दिला नाही, बहुमत सिद्ध करणारच, संजय राऊतांचा निश्चय
मुंबई : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला. आता त्यानंतर संजय राऊत यांनी एक ट्वीट केले आहे. ‘होय संघर्ष करणार’, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. ‘महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा प्रवास विधानसभा बरखास्तीच्या दिशेने होत आहे,’ असे ट्वीट अवघ्या सहा तासांपूर्वी संजय राऊत यांनी केले होते. त्यांनंतर आता राऊतांनी शिवसेनेची अधिकृत भूमिका स्पष्ट केली आहे.
शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना कोणताही सल्ला दिला नाही, वेळ आल्यावर विधानसभेत बहुमत सिद्ध करुन दाखवणार असं वक्तव्य शिवसेना नेते संजय राऊत यांनी केलं आहे.
महाविकास आघाडीचे सरकार वाचवायचं असेल तर एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करा असा सल्ला शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना दिला असल्याच्या बातम्या येत होत्या. संजय राऊत यांनी त्यावर आता स्पष्टीकरण दिलं आहे.
संजय राऊत म्हणाले की, “आम्हाला सत्तेचा मोह, माया किंवा लोभ नाही. आम्ही लढत राहू. आम्ही लढणारे आहोत, शेवटपर्यंत लढणार. सत्याचाच विजय होईल.” दरम्यान, शिवसेनेचे नेते आणि राज्याचे मंत्री गुलाबराव पाटील हे एकनाथ शिंदे यांच्या गटामध्ये सामिल झाल्याचं स्पष्ट झालं आहे. ते आता गुवाहाटीला पोहोचले आहेत.
शिवसेनेची तोफ म्हणून ओळखले जाणारे नेते आणि राज्याचे मंत्री गुलाबराव पाटील गुवाहाटी येथील रेडिसन ब्लू हॉटेलमध्ये पोहोचले आहेत. त्यांच्यासोबत योगेश कदम यांच्यासह काही आमदारही आहेत. पाटील ठाकरे सरकारवर नाराज असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान एकनाथ शिंदे यांच्याजवळ आता समर्थक आमदारांची संख्या वाढली आहे. तसेच शिंदे यांनी ठाकरे यांच्यासोबत चर्चेस नकार दिला आहे.
एकनाथ शिंदे यांच्या बंडाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आता लढाईच्या तयारीत असून संजय राऊत यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. होय, संघर्ष करणार असं संजय राऊत यांनी ट्वीट केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा प्रवास विधानसभा बरखास्तीच्या दिशेने होत असल्याचं ट्वीट अवघ्या सहा तासांपूर्वी संजय राऊत यांनी केलं होतं. आता मुख्यमंत्र्यांच्या संबोधनानंतर शिवसेनेची अधिकृत भूमिका स्पष्ट झाल्याचं चित्र आहे. त्यानंतर आता संघर्ष करणार असं ट्वीट संजय राऊत यांनी केलं आहे.
https://www.facebook.com/109399567404448/posts/566661995011534/
□ मुख्यमंत्री शिवसेनेचा झाला तर मला आनंद
मी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यायला तयार आहे. परंतु मुख्यमंत्री शिवसेनेचा झाला तर मला आनंद आहे. शिवसेनेचे लाकूड वापरून शिवसेनेवर वार करु नका. मला कोविड झालाय मी राजीनामा देतो तुम्ही येऊन घेऊन जा. हे काय मोठे आव्हान आहे. शिवसैनिक सोबत तोवर मी कुठल्याही आव्हानाला समोर जाईन.
शिवसैनिकांना असे वाटत असेल तर मी पक्ष प्रमुख पद सोडायला तयार आहे. संकाटाला सामोरा जाणारा शिवसैनिक. पण शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार असेल तर माझी तयारी असल्याचे म्हटले. आयुष्याची कमाई पद नाहीत. याच माध्यमातून मी तुमच्याशी बोललो. कुटुंब प्रमुख म्हणून मला अनेकांनी सांगितले. ही माझी कमाई. माझे हे नाटक नाही. माझ्यासाठी संख्या विषय गौण. संख्या कशी जमवता हे नगण्य. मी आपला मानतो त्यांनी मला सांगाव मी मुख्यमंत्री पद सोडतो.
□ इम्तियाज जलील यांनी केलं उद्धव ठाकरेंचं कौतुक
MIM खासदार इम्तियाज जलील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या फेसबुक लाईव्हचं कौतुक केलं आहे. ‘महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या सच्चाईचे कौतुक आहे. शिवसेनेसोबत राजकारणात वैचारिक मतभेद असू शकतील, पण त्यांचे संबोधन ऐकून त्यांच्याबद्दलचा आदर आणखीनच वाढला’. असं जलील यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे.
https://www.facebook.com/109399567404448/posts/566465795031154/