भारतीय राजकारणात सत्ता आणि पदांची हाव सुटली आहे. त्यात एकमेकांचे पाय ओढण्याचा धंदा बोकाळला आहे. देशाचे आणि राज्याचे काही का होईना? आमचे भले होतेय ना. बस्स. ही वाईट प्रवृत्ती राजकीय नेत्यांमध्ये बळावली आहे. विधान सभा निवडणुकीचा निकाल लागल्या लागल्या शिवसेनेत अचानक बंड झाले. पण एकमात्र बंड हे एकाएकी कधीच होत नसते. त्याला महिनोंमहिने अभ्यास करून बंडाचा झेंडा फडकवण्याची तयारी करावी लागते. Rebellion in Shiv Sena … Thackeray’s temptation for power is not over Politics Blog
पूर्वी म्हणजेच ऐंशीच्या दशकाअगोदर खासदार व आमदारांचे बंड एका रात्रीतून सक्सेस व्हायचे पण माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी या राजकीय घोडेबाजाराला पायबंद घालण्यासाठी पक्षांतर बंदीचा कायदा आणला. एखाद्या राजकीय पक्षात जितके आमदार आहेत, त्याच्या दोन तृतीयांश आमदारांना वेगळा गट करता येतो. दोन तृतीयांश संख्याबळ नसेल आणि कुणी बंड केला तर त्याला सहावर्षांसाठी अपात्र ठरवले जाते. या कायद्याच्या कचाट्यात कोण सापडल्यास त्याचे राजकीय भवितव्य संपूनच जाते. बेकायदा पक्षांतर करणाऱ्यांना सहा वर्षे अपात्र ठरवले जाते. त्यामुळे बंडोबांना या कायद्याची भीती लागून असते.
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते तथा उध्दव ठाकरे यांच्या सरकारमधील नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचे बंड यशस्वी होणार की, थंड पडणार? याविषयीचे चित्र मंगळवारी सायंकाळपर्यंत तरी स्पष्ट झालेले नव्हते. पण राजकारणात केव्हाही काहीही होऊ शकते. त्यांच्या बंडाला भाजपने ताकत लावली आहे, यात शंकाच नाही. कारण भाजप नेत्यांच्या ज्या हालचाली झाल्या, त्या पाहाता भाजपकडून सेनेत फूट पाडण्याचा डाव रचला गेलाय.
https://www.facebook.com/109399567404448/posts/566465795031154/
सेनेची आमदार संख्या ५५ आहे. दोन तृतीयांशसाठी शिंदे यांना ३५ आमदारांचे पाठबळ आवश्यक आहे. ते नसेल तर कर्नाटक व एमपीच्या धर्तीवर राजीनामे घेऊन सेना आमदारांच्या ठिकाणी पोटनिवडणूक घेण्याचा भाजपचा प्लॅन नक्कीच असावा. दरम्यान हा डाव हाणून पाडण्यासाठी ठाकरे सरकारपुढे विधानसभा भंग करण्याचा मार्ग असेल. शिंदे यांना गटनेते पदावरून काढून टाकण्याची कारवाई केल्यामुळे ठाकरे हे कडक भूमिकेत असल्याचे दिसते.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
पक्षात निष्ठावंतांना डावलून चालत नाही. त्यांच्या नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या भावनांची कदर पक्षश्रेष्ठींना करावीच लागते. जर त्याकडे सातत्याने दुर्लक्ष केल्यास मनात साठलेल्या संतापाचा एक ना एक दिवस विस्फोट होत असतो. शिंदे यांचे बंड त्यातलेच आहे. सेनेत ते सिनियर आहेत. निष्ठावंतही. मुख्यमंत्री होण्याचा त्यांचा पहिला मान. पण ठाकरे घराण्याची आपल्यावर पुण्याई आहे म्हणून त्यांनी उध्दव यांना विरोध केला नाही. पण निदान सत्तेत तरी त्यांची दखल घ्यायला हवी होती.
मुख्यमंत्री झाल्यानंतर ठाकरे यांना मंत्रालयातील धडे देण्यात शिंदे हेच अग्रभागी होते. नाराजीचे पहिले कारण म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडी का केली? २०१९ च्या निवडणुकीत जनतेने भाजप – सेनेला स्पष्ट बहुमत दिले होते. तेव्हा युतीची सत्ता यायला हवी होती ही जी जनतेच्या मनात भावना होती, तीच सेनेच्या आमदारांमध्ये होती परंतु ठाकरे यांना सत्तेचा मोह आवरला नाही.
आदित्य ठाकरे व संजय राऊत यांच्या दबावाला ते बळी पडले. ठाकरे यांची ही अनैसर्गिक भूमिका राज्यालाही पटली नाही. पण करणार काय? अडीच वर्षे झाली, मराठी माणूस हे सारे सहन करत आहे. आत्ताचे ठीक आहे. भविष्यातील निवडणुकांमध्ये दोनही काँग्रेसने हात सोडून दिला आणि भाजपनेही जवळ केले नाही तर आपल्या राजकीय -भवितव्याचे काय ? ही चिंता सेनेच्या आमदारांना लागून होती. कारण आतापर्यंतच्या निवडणुकीत भाजप आणि सेनेला जे यश मिळाले, ते युतीमुळेच मिळाले हे त्रिवार सत्य आहे.
येत्या निवडणुकांमध्ये आघाडी करू, असे ठाकरे सतत म्हणाले. पण ते शक्य आहे काय ? तीनही पक्ष जागांची वाटणी कशी करणार ? एकमेकांचा जागांवर हक्क सांगू लागले तर वाटणी रीतसर होईल काय? असे एक ना अनेक प्रश्न समोर आले आहेत. शिंदे यांच्या बंडामुळे सरकार अस्थिर झाले असून पुढे काय होते ते बघत राहूया. शिंदे यांचे हे बंड यशस्वी झाले तर शिवसेनेतील हे दुसरे बंड ठरेल. यापूर्वी छगन भुजबळ यांचेही बंड यशस्वी झाले होते, तेही बाळासाहेबांच्या डोळ्या देखत.
✍ ✍ ✍
दै. सुराज्य, संपादकीय लेख
□ एकनाथ शिंदेंच्या आधी या नेत्यांनी शिवसेनेसोबत केले बंड
मुंबई : एकनाथ शिंदे यांनी आज बंड पुकारले आहे. ते शिवसेनेतून बाहेर पडतील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या ते सुरतमधील एका हॉटेलमध्ये आहेत. दरम्यान याआधी राज ठाकरे, नारायण राणे, भास्कर जाधव, गणेश नाईक, छगन भुजबळ, संजय निरुपम, बाळा नांदगावकर, सुरेश प्रभू, तुकाराम रेंगे पाटील, कालिदास कोळंबकर, विजय वडेट्टीवार, राजन तेली, प्रवीण दरेकर, अशा अनेक नेत्यांनी याआधी शिवसेनेला जय महाराष्ट्र केलेला आहे.
□ शिवसेनेमधील आतापर्यंतचं सर्वात मोठं बंड; याआधी झालेली बंड
* पहिलं बंड छगन भुजबळांचं- 1991 साली भुजबळांनी शिवसेना सोडली. मनोहर जोशींना विरोधी पक्षनेतेपद दिल्यानं भुजबळ नाराज होते. 1991 च्या नागपूर अधिवेशनात भुजबळांनी 9 आमदारांसह काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
* दुसरं बंड नारायण राणेंचं- 2005 मध्ये नारायण राणेंनी शिवसेना सोडली.
* तिसरं बंड राज ठाकरेंचं- नोव्हेंबर 2005 मध्ये राज ठाकरेंनी शिवसेना सोडली.
https://www.facebook.com/109399567404448/posts/566400695037664/