मुंबई : शिवसेनेच्या गटनेतेपदी पक्षप्रमुखांनी निवडलेले अजय चौधरी हेच कायम राहतील, असे विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ स्पष्ट केले आहे. याआधी एकनाथ शिंदे यांनी 34 आमदारांच्या सह्या असलेले पत्र झिरवाळ यांना पाठवले होते. यात त्यांनी स्वतःचा गटनेते म्हणून उल्लेख केला होता. मात्र या पत्रातील नितीन देशमुख या आमदाराच्या सहीवर आक्षेप घेण्यात आला आहे. त्याची तपासणी करु, असेही झिरवाळ यांनी सांगितले. Breaking: Big blow to Eknath Shinde, party chief wants to elect group leader in law: Narhari Jirwal
“कायद्यात पक्षप्रमुखाने गटनेता निवडायचा असतो आणि गटनेत्याने प्रतोद निवडायचा असतो. याप्रमाणे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आधी एकनाथ शिंदे यांना गटनेतेपदी निवडलं होतं, त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्याऐवजी अजय चौधरी यांना गटनेतेपदी नियुक्तीचं पत्र दिलं, ” अशी माहिती नरहरी झिरवळ यांनी दिली.
महाराष्ट्राचे राजकारण मोठा खेळ बनल्याचे दिसत आहे. एकनाथ शिंदे गटाने मॅजिक फिगर 37 वर पोहोचल्याचा दावा केला आहे. विधान सभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांची पत्रकार परिषद एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या भूमिकेकडे राज्याचं लक्ष लागलं असताना आता विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी पत्रकार परिषद घेत काही गोष्टी स्पष्ट केल्या आहेत.
नितीन देशमुख यांनी मी नेहमी इंग्रजीमध्ये सही करतो. परंतु बंडखोर आमदारांनी केलेल्या ठरावावरची सही मराठीमध्ये आहे. ती सही माझी नसल्याचे देशमुख यांनी सांगितल्याने त्याची सत्यता तपासली जाईल आणि माझी खात्री झाल्यानंतर त्याच्यावर विचार केला जाईल, असे झिरवळ यांनी सांगितले.
कायद्यानुसार गटनेता निवडीचा अधिकार हा पक्षप्रमुखाचा असतो आणि गटनेत्याने प्रतोदाची नेमणूक करायची असते. त्यामुळे मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अजय चौधरी यांना गटनेता केल्याचे पत्र दिले असून ते स्वीकारले आहे, असे झिरवळ यांनी सांगितले. तसेच चौधरी यांनी सुनील प्रभू यांची प्रतोद म्हणून नेमणूक केल्याचेही झिरवळ यांनी सांगितले.
https://www.facebook.com/109399567404448/posts/566933574984376/
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
□ नितीन देशमुख यांचा खुलासा
शिवसेना आमदारांना फसवून महाराष्ट्रातून गुजरातमध्ये कसे नेले गेले त्याचा घटनाक्रम नितीन देशमुख यांनी माध्यमांना सांगितला. ते म्हणाले, राज्यमंत्री शंभूराज देसाई, अब्दुल सत्तार, संदीपान भुमरे यांच्याशी चर्चा करून गाडीत बसलो. मात्र, गाडी 100 किलोमीटरवर असलेल्या गुजरातच्या दिशेने निघाली होती, हे माझ्या नंतर लक्षात आले. दरम्यानच्या काळात प्रवासादरम्यान धाराशीवचे आमदार कैलास पाटील पळाल्याचे समजले. माझ्या बाजूला नंतर इतर आमदार येऊन बसले होते. त्यामुळे मला पळायला मिळाले नाही. गाडी हॉटेलमध्ये पोहोचली. तिथे मोठा पोलीस बंदोबस्त होता. भाजपची मंडळी तिथे होती. एकनाथ शिंदे यांचे नाव दिसत असले तरी या मागे भाजपचे षड्यंत्र आहे, असेही देशमुख म्हणाले.
गुजरातच्या शंभर ते दीडशे पोलिसांचा माझ्यावर पहारा होता. पोलिसांनी मला बळजबरीने रुग्णालयात नेले, तेथे मला बळजबरी इंजेक्शन दिले. रुग्णालयामध्ये नेल्यावर 20-25 लोकांनी पकडून मला इंजेक्शन दिले. ते इंजेक्शन कशाचे होते, याची मला माहिती नाही. रुग्णालयातून मी पळून रात्री रस्त्यावर आलो. माझ्या मागावर दीडशे पोलीस होते. गुजरात पोलिसांना माझा घात करायचा होता, असा आरोप नितीन देशमुख यांनी केला.
□ … म्हणून आम्ही तो निर्णय घेतला; बंडखोर आमदारांनी स्पष्टच सांगितलं
आमची व्यथा, आपल्या आजूबाजूच्या बडव्यांनी ऐकून घेण्याची कधी तसदी घेतली नाही, आपल्यापर्यंत ती पोहोचवली जात नव्हती. यावेळी एकनाथ शिंदे यांचा दरवाजा उघडा होता. मतदार संघात असलेली वाईट परिस्थिती, मतदार संघातील निधी, अधिकारी वर्ग, काँग्रेस-राष्ट्रवादीकडून होत असलेला अपमान आमची सर्व गाऱ्हाणी फक्त शिंदे साहेबच ऐकत होते आणि सकारात्मक मार्ग काढत होते. त्यामुळे शिंदे साहेबांना आम्ही हा निर्णय घ्यायला लावला.
https://www.facebook.com/109399567404448/posts/566925918318475/