Sunday, January 29, 2023
Surajya Digital
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
  • ब्लॉग
  • अर्थाअर्थ
  • शिवार
  • Techनिक
No Result
View All Result
Surajya Digital
No Result
View All Result

सोलापूर : मेथवडे टोलनाक्यावर पिकअप चक्काचूर, तीन जखमी

Solapur: Pickup shattered at Methwade toll plaza, three injured in accident

Surajya Digital by Surajya Digital
June 23, 2022
in Hot News, सोलापूर
0
सोलापूर : मेथवडे टोलनाक्यावर पिकअप चक्काचूर, तीन जखमी
0
SHARES
29
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

सोलापूर : अननस घेऊन चाललेला पिक अप टोल नाक्याच्या कठड्याला थटल्याने झालेल्या अपघातात तीन जण जखमी झाल्याची घटना मेथवडे फाटा (ता. सांगोला) येथील टोल नाक्यावर बुधवारी (ता. 22) सकाळी साडेसहाच्या सुमारास घडली आहे. Solapur: Pickup shattered at Methwade toll plaza, three injured in accident

चालकाचा ताबा सुटल्याने भरधाव पिकअप टोल नाक्याच्या लोखंडी बारला धडकून झालेल्या भीषण अपघातात कर्नाटकातील चालकासह तिघे गंभीर जखमी झाले. धडक इतकी भीषण होती की, पंढरपूरला जाणाऱ्या पिकअपचे तोंड विरुद्ध सांगोल्याच्या दिशेने झाले. परिसरातील असणाऱ्या नागरिकांनी पलटी झालेली पिकप उचलून आतील ड्रायव्हर व इतर दोघांना बाहेर काढून त्यांना हॉस्पिटलला पाठवले.

यात पिकअपचा पुढील भागाचा चक्काचूर झाला. हा अपघात सकाळी ७ च्या सुमारास सांगोला पंढरपूर रोडवरील मेथवडे नवीन टोल नाक्यावर घडला. बनवाशी ता. शिरसी जि. कारवाल (कर्नाटक) येथील चालक अब्दुल लतिफ अ. जब्बार शेख, मंजूर अब्दुल रज्जाकसह अन्य एक असे तिघे मिळून मंगळवारी रात्री कर्नाटकमधून अननस घेऊन के ए-३१-९३१५ हा पिकअप सांगोलामार्गे भरधाव वेगाने पंढरपूरच्या दिशेने निघाला होता.

भरधाव पिकअपवरील चालकाचा ताबा सुटल्याने, पिकअप नवीन टोल नाक्याच्या लोखंडी बारला धडकून हा भीषण अपघात झाला. अपघातात पिकअपचे तोंड पुन्हा सांगोल्याचे दिशेने झाल्याने पुढच्या भागाचा अक्षरश: चक्काचूर झाला.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

 

दरम्यान, तर पिकअपमधील अननस टोल नाका परिसरात फेकली गेली. मेथवडे टोलनाक्यावर लोखंडी बारला धडक दिल्यानंतर पिकअप चक्काचूर झाल्याचे दिसत आहे. अपघात घडताच परिसरातील नागरिकांनी धाव घेऊन केबिनमध्ये अडकलेल्या जखमी चालकास तिघांना बाहेर काढून १०८ रुग्णवाहिकेतून उपचाराकरिता सांगोला रुग्णालयात पाठवून दिले.

 

□ एका कॉलेज तरुणाची निर्घृण हत्या

 

सोलापूर : मंगळवेढा तालुक्यातील अकोला रोडवरील वरकुटे वस्ती परिसरात एका कॉलेज तरुणाची निर्घृण हत्या केल्याची घटना घडली. सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास घडली. याविषयी खळबळ माजली आहे. पोलीस घटनास्थळावर दाखल झाले आहेत. या खुनाच्या बाबतीत अधिक माहिती घेतली जात आहे.

मंगळवेढा तालुक्यातील अकोला येथे घरनिकी-अकोला रोडवरील वरकुटे वस्ती येथे ऊसाच्या शेतात सचिन सिद्धेश्वर वरकुटे (वय २३, रा. अकोला ता. मंगळवेढा) या तरुणाची हत्या करण्यात आली आहे.

Tags: #Solapur #Pickup #shattered #Methwade #tollplaza #three #injured in accident#सोलापूर #मेथवडे #टोलनाका #पिकअप #चक्काचूर #तीनजखमी #अपघात
Previous Post

निष्ठावंतांची घुसमट, एकनाथ शिंदेच्या भोवती असलेले वलय सेनेला खुपत होते की काय?

Next Post

सोलापुरात ड्रीम इलेवन गेममधून भावानेच केली भावाची निर्घृण हत्या

Surajya Digital

Surajya Digital

Next Post
सोलापुरात ड्रीम इलेवन गेममधून भावानेच केली भावाची निर्घृण हत्या

सोलापुरात ड्रीम इलेवन गेममधून भावानेच केली भावाची निर्घृण हत्या

वार्ता संग्रह

June 2022
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« May   Jul »

ट्विटर पेज

Currently Playing

About Us

SurajyaDigital
सुराज्य डिजिटल हा ब्रँड जगाच्या काना-कोपऱ्यातील सर्वंकष माहितीचा अचूक खजिना आपल्यापर्यंत पोहोंचविण्याचे काम करतोय. टाईम मीडिया हाऊसचा हा ब्रँड अल्पावधीतच मराठी वाचकांचा अत्यंत विश्वासार्ह ब्रँड बनला आहे.जगभरातील घटनांचा वेगवान आढावा घेत त्यावर भाष्य करण्याबरोबरच वाचकांच्या आवडीचे विषय, करमणूक यासारखे दृक्श्राव्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सुराज्य डिजिटल कटीबद्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा timemediahouse@gmail.com timemarathi@gmail.com
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697