Monday, January 30, 2023
Surajya Digital
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
  • ब्लॉग
  • अर्थाअर्थ
  • शिवार
  • Techनिक
No Result
View All Result
Surajya Digital
No Result
View All Result

‘हिंमत असेल तर स्वतःच्या बापाच्या नावाने मत मागा’, बंडखोर 16 आमदारांना नोटीस

'If you have the courage, ask for votes in the name of your own father', notice to 16 rebel MLAs

Surajya Digital by Surajya Digital
June 25, 2022
in Hot News, महाराष्ट्र, राजकारण
0
‘हिंमत असेल तर स्वतःच्या बापाच्या नावाने मत मागा’, बंडखोर 16 आमदारांना नोटीस
0
SHARES
46
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुंबई : हिंमत असेल तर स्वतःच्या बापाच्या नावाने मत मागा, असे उद्धव ठाकरे यांनी अप्रत्यक्षरित्या बंडखोर आमदारांना म्हटले आहे. शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत ते बोलत होते. आधी नाथ होते आता दास झाले, अशा शब्दात उद्धव यांनी शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. ‘बंडखोर आमदारांना जे करायचे, जिथे जायचे तिथे जावे, मी हस्तक्षेप करणार नाही, पण बाळासाहेब ठाकरेंच्या नावाचा वापर करु नये’, असा इशारा त्यांनी दिला आहे. ‘If you have the courage, ask for votes in the name of your own father’, notice to 16 rebel MLAs

शिवसेनेच्या 16 बंडखोर आमदारांना नोटीस बजावण्यात आली आहे. पहिली नोटीस एकनाथ शिंदे आणि दुसरी नोटीस तानाजी सावंत यांच्या नावाने काढण्यात आली आहे. 27 जून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत या आमदारांना विधानसभेच्या उपाध्यक्षांपुढे त्यांची बाजू. मांडावी लागणार आहे. तसे न केल्यास या आमदारांवर कारवाई होण्याची शक्यता आहे.

गेल्या पाच दिवसांपासून शिवसेनेत निर्माण झालेली बंडाळी संपुष्टात येण्याची आशा पूर्णपणे मावळल्याने राज्यात सत्तासंघर्ष तीव्र झाला असून, ही लढाई आता कायदेशीर वळणे घेऊ लागली आहे. विधानसभेतील शिवसेनेचे गटनेते म्हणून अजय चौधरी आणि प्रतोद म्हणून सुनील प्रभू यांच्या नियुक्‍तीला मान्यता देत विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या गटाला पहिला धक्‍का दिला. पाठोपाठ १६ बंडखोर आमदारांना अपात्र ठरविण्याच्या नोटीसा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी पाठवल्या आहेत.

 

बंडखोरांना आधी त्यांचा निर्णय घेऊ द्या. माझ्यावर शिवसैनिकांचे जास्त प्रेम असल्याचे ठाकरे म्हणाले. शिवसेनेच्या कार्यकारिणीची महत्वाची बैठक शिवसेना भवन याठिकाणी आज पार पडली. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर गटावर जोरदार निशाणा साधला.

दरम्यान, शिवसैनिकांनी सेना भवनावर मोठं शक्तिप्रदर्शन केले. शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची महत्वाची बैठक आज शिवसेना भवन याठिकाणी पार पडली. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. शिवसेना कार्यकारिणीत उपस्थितांनी गद्दारांना परत घेऊ नका, अशी मागणी उद्धव ठाकरेंना केली. यावर उत्तर देताना उद्धव ठाकरे यांनी त्यांना परत घेणारच नसल्याचे ठणकावून सांगितले.

शिवसेना निखारा आहे. त्यावर पाय ठेवला तर जाळून टाकू असा इशारा देखील ठाकरेंनी दिला. दरम्यान या कार्यकारिणीत महत्वाचे पाच ठराव देखील मांडण्यात आले आहेत. यामध्ये बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना हे नाव कुणालाही वापरता येणार नाही असा ठराव ही राष्ट्रीय कार्यकारिणीत मंजूर करण्यात आला आहे. एकनाथ शिंदे गटाने आपल्या गटाचे नाव ‘शिवसेना-बाळासाहेब ठाकरे’ असे ठरवल्याचे असल्याचे वृत्त आहे. त्या पार्श्वभूमीवर या ठरावाला अतिशय महत्त्व आहे.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

 

 

शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत एकूण पाच ठराव ठेवण्यात आले, त्यापैकी तीन ठराव एकमताने मंजूर करण्यात आले. शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत पास झालेल्या या प्रस्तावांची माहितीही निवडणूक आयोगाला दिली जाणार आहे.

 

• शिवसेनेत सर्व प्रकारचे निर्णय घेण्याचे सर्व अधिकार पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे असतील.

• बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेचे नाव इतर कोणीही वापरू शकत नाही.

• पक्षाशी गद्दारी करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे अधिकारही उद्धव ठाकरे यांना असतील.

□ डोक्यात ही वीट घालावी लागणार : उद्धव ठाकरे

भाजपसोबत जावे यासाठी माझ्यावर काही आमदारांचा दबाव आहे, मात्र माझ्या कुटुंबावर, मातोश्रीवर घाणेरडे आरोप करणार्‍यांच्या मांडीला मांडी लावून मी बसणार नाही. मी शांत आहे, षंड नाही, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी शिवसेनेच्या बंडखोर गटाला ठणकावले.

काही जण म्हणत होते की मेलो तरी शिवसेना सोडणार नाही. आज तेच पळून गेले आहेत. ठाकरे आणि शिवसेना हे नाव न वापरता जगून दाखवा, असे थेट आव्हानच उद्धव ठाकरे यांनी बंडखोरांना दिले आहे. मला या सगळ्या आरोपांचा वीट आला आहे. ही वीट ठेवून चालणार नाही, तर अशा लोकांच्या डोक्यावर हाणणार आहे, असा इशाराही उद्धव ठाकरे यांंनी एकनाथ शिंदेंना दिला आहे.

□ एकनाथ शिंदेंचे 38 आमदारांच्या सहिचे पत्र दाखवून शक्तिप्रदर्शन

मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडाचा बिमोड करण्यासाठी महाविकास आघाडीने कायदेशीर मार्ग स्विकारला आहे तर आता एकनाथ शिंदे यांनीही आक्रमकपणे शिवसेनेवर हल्ला चढवला आहे. एकनाथ शिंदे यांनी व्टिटरव्दारे 38 आमदारांच्या सहिचे पत्र दाखवून शक्तिप्रदर्शन केलं आहे.

 

 

समर्थक आमदार आणि तयांच्या कुटुबियांच्या मुख्यमंत्र्यांनी राजकीय आकसापोटी एकनाथ शिंदे सुरक्षाव्यवस्था काढली आहे. आमदारांच्या कुटुंबीयांना धमकवण्याचा प्रयत्न सरकारकडूनच केला जात असल्याचा आरोप शिंदेंनी केला आहे.

राज्यातील कोणत्याही आमदाराचे संरक्षण काढण्याचे आदेश मुख्यमंत्री वा गृहविभागाने दिलेले नाहीत. या संदर्भात ट्विटरद्वारे केले जाणारे आरोप पूर्णपणे चुकीचे व दिशाभूल करणारे आहेत, असे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी स्पष्ट केले. त्यांनी यासंदर्भात ट्विट केले आहे. याआधी एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत आमदारांचे संरक्षण काढल्याचा आरोप केला होता. तसेच संरक्षण काढलेल्या आमदारांची नावेही दिली होती.

 

Tags: #courage #ask #votes #name #your #ownfather #notice #rebel #MLAs #UddhavThackeray #eknathshinde#हिंमत #स्वतःच्या #बाप #नावाने #मतमागा #बंडखोर #आमदार #नोटीस #ठराव #शिवसेना #उद्धवठाकरे #एकनाथशिंदे
Previous Post

पुण्यात शिवसैनिक रस्त्यावर, तानाजी सावंतांचे कार्यालय फोडले, दगडफेक

Next Post

शिंदे गट अजूनही शिवसेनेत, पण आता भाजपमध्ये जायला काय हरकत – दीपक केसरकर

Surajya Digital

Surajya Digital

Next Post
शिंदे गट अजूनही शिवसेनेत, पण आता भाजपमध्ये जायला काय हरकत – दीपक केसरकर

शिंदे गट अजूनही शिवसेनेत, पण आता भाजपमध्ये जायला काय हरकत - दीपक केसरकर

वार्ता संग्रह

June 2022
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« May   Jul »

ट्विटर पेज

Currently Playing

About Us

SurajyaDigital
सुराज्य डिजिटल हा ब्रँड जगाच्या काना-कोपऱ्यातील सर्वंकष माहितीचा अचूक खजिना आपल्यापर्यंत पोहोंचविण्याचे काम करतोय. टाईम मीडिया हाऊसचा हा ब्रँड अल्पावधीतच मराठी वाचकांचा अत्यंत विश्वासार्ह ब्रँड बनला आहे.जगभरातील घटनांचा वेगवान आढावा घेत त्यावर भाष्य करण्याबरोबरच वाचकांच्या आवडीचे विषय, करमणूक यासारखे दृक्श्राव्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सुराज्य डिजिटल कटीबद्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा timemediahouse@gmail.com timemarathi@gmail.com
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697