मुंबई : राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडताना दिसत आहेत. अशातच आता देवेंद्र फडणवीस दिल्लीला जाणार असल्याचं समजत आहे. परंतु त्यांच्या या दौऱ्याचं कारण समजू शकलेलं नाही. तसेच दुसरीकडे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हेही दिल्ली दौऱ्यावर जाणार आहे. त्यामुळे विविध चर्चांना उधाण आलं आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे ठाकरे सरकार धोक्यात आलं आहे. Big developments – Devendra Fadnavis and Sharad Pawar to go to Delhi for politics
आज सकाळीच शरद पवार यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत एक महत्वपुर्ण बैठक घेतली होती. या बैठकीनंतर पवार आता दिल्लीला जाणार असल्याने राजकीय घडामोडींचा वेग आल्याचं पाहायला मिळातं आहे. दरम्यान, शरद पवार यांनी आज सकाळी आघाडीच्या नेत्यांसोबत पार पडलेल्या बैठकीमध्ये महाविकास आघाडी ही भक्कम राहील तसंच कोर्टातही भूमिका व्यवस्थितीत राहील असंही पवार बैठकीत म्हणाले आहेत. एकीकडे एकनाथ शिंदे यांनी भाजपनेते तथा राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली असल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, शिंदे गटाला सत्तास्थापनेसाठी दिवसेंदिवस नवीन संकटाना सामोरं जावं लागत आहे. मग ती आमदारांच निलंबन करण्याची सेनेची खेळी असो वा राज्यपालांना झालेली कोरोनाची लागण यामुळे जवळफास पाच दिवसांपासून गुहावाटीत ठाण मांडून असणाऱ्या बंडखोर आमदारांमध्ये अस्थिरता निर्माण झाली असून आता ते माघारी फिरणार की काय अशा चर्चांना उधाण आलं आहे.
देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना झाल्याची माहिती आहे. फडणवीस दिल्लीत पक्ष नेतृत्वाशी चर्चा करणार आहेत. तर दुसरीकडे महाविकास आघाडी सरकार वाचवण्यासाठी मैदानात उतरलेले शरद पवारही आज दिल्लीला गेल्याची माहिती आहे. दिल्ली येथे विरोधी पक्षाकडून राष्ट्रपतीपदासाठी यशवंत सिन्हा यांचा उमेदवारी अर्ज दाखल होणार आहे. त्यासाठी पवार दिल्लीला गेल्याची माहिती आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
https://www.facebook.com/109399567404448/posts/568914458119621/
शिवसेना बंडखोर आमदारांचा गुवाहाटीतील मुक्काम वाढण्याची चिन्ह आहेत. हॉटेल रेडिसनमधील बंडखोर आमदारांच्या खोल्यांचे बुकिंग 30 तारखेपर्यंत वाढवण्यात आले आहे. कायदेशीर लढाई लढण्यासाठी तसेच उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्यावर अविश्वास ठराव टाकल्याने भाजपसोबत शिंदे गटाला चर्चा करायची आहे. अशी चर्चा आहे.
एकनाथ शिंदे रात्री फडणवीसांना भेटल्याची चर्चा एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची गुप्त भेट झाल्याची चर्चा सध्या सुरु झाली आहे. फडणवीस शुक्रवारी रात्री मुंबईच्या बाहेर होते. तर शिंदेंनी रात्री दिल्लीत व बडोदा येथे भाजप नेत्यांची भेट घेतल्याचे वृत्त समोर येत आहे. बडोदा या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत शिंदे यांनी चर्चा केल्याचे सांगितले जात आहे. मात्र भाजपने अजूनपर्यंत आपला शिवसेनेच्या बंडखोर आमदारांशी संपर्क नाही, असे म्हटले आहे.
रात्री दोन ते पहाटे चार या वेळेत दोघांची भेट झाली. या सभेसाठी फडणवीस इंदूरहून दिल्ली आणि नंतर वडोदरा येथे रवाना झाले होते. ही माहिती समोर आल्यानंतर शिंदे गट भाजपला कधीही पाठिंबा देऊ शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. शिवसेनेच्या 38 बंडखोर आमदारांसह आसाममधील गुवाहाटी येथे तळ ठोकून बसलेल्या एकनाथ शिंदे यांनी गुजरातमध्ये जाऊन वडोदरा येथे भाजप नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याचे सूत्रांकडून समजते.देवेंद्र फडणवीस रात्री 10.30 वाजता सभेसाठी मुंबईहून निघाल्याची माहिती समोर आली आहे.
दोन्ही नेते चार्टर प्लेनने वडोदरा येथे पोहोचल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. एकनाथ शिंदे गुवाहाटीहून वडोदराकडे रवाना झाले तर फडणवीस रात्री 10.30 वाजता मुंबईहून निघाले. रात्री दोन वाजता दोन्ही नेत्यांमध्ये बैठक झाली. दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे दोन तास चर्चा झाल्याचेही समोर येत आहे. त्यांच्यात काय चर्चा झाली अद्याप समजू शकले नाही.
https://www.facebook.com/109399567404448/posts/568910328120034/