सोलापूर : महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दक्षिण सोलापूरच्या अध्यक्षपदावर दुसऱ्यांदा रेणुका महागांवकर यांची तर उपाध्यक्षपदावर प्राध्यापक दिपक देशपांडे, कार्याध्यक्षपदी प्रशांत बडवे यांची अविरोध निवड करण्यात आली. हॉटेल एैश्वर्या येथे सभासदांच्या उपस्थितीत ही बैठक पार पाडली. Mahagaonkar as the President of MASAP South Solapur Branch and Prashant Badve as the Executive President
महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे यांचे सोलापूर जिल्हा प्रतिनिधी असलेले पद्माकर कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली पदाधिकारी निवडीची बैठक घेण्यात आली. यामध्ये प्रारंभी मागील वर्षीच्या कार्यक्रमाचा आढावा घेण्यात आला. खर्चाला मंजुरी देण्यात आली. तत्पूर्वी महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दक्षिण सोलापूरच्या कार्यकारिणीच्या निवडीसाठी सभासदांमधून 15 जणांचे अर्ज प्राप्त झाले. 15 जणांच्या कार्यकारिणीसाठी 15 जणांचे अर्ज आल्याने ते सर्व अर्ज मंजूर करून कार्यकारणीची निवड निर्वाचन अधिकारी सीए नितीन नावंदर यांनी अविरोध निवड झाल्याचे घोषित केले.
□ पुढीलप्रमाणे पदाधिकाऱ्यांची निवड
अध्यक्ष – रेणुका अविनाश महागांवकर
उपाध्यक्ष – दिपक शंकरराव देशपांडे
कार्याध्यक्ष – प्रशांत सदाशिव बडवे
प्रमुख कार्यवाह – जितेश जीवन कुलकर्णी
सहकार्यवाह – गुरूनाथ नामदेव वठारे
कोषाध्यक्ष – अमोल वासुदेव धाबळे
कार्यकारिणी सदस्य –
अविनाश महागांवकर, पृथा रविंद्र हलसगीकर, अभय विजय जोशी,विनायक दिगंबर होटकर, मेधा जितेश कुलकर्णी, शैलजा सुधीर रत्नपारखी, संजय जगन्नाथ भोईटे, आम्रपाली जोटेनवार, प्रकाश लक्ष्मण मोकाशे.
अशी निवड अविरोध करण्यात आली. सन 2022 ते 2027 या 5 वर्षाच्या कालावधीसाठी ही पदाधिकारी आणि कार्यकारिणीची निवड करण्यात आली असल्याचे निर्वाचन अधिकारी नितीन नावंदर यांनी जाहीर केले.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
□ अकरावी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी पुढच्या महिन्यात लागणार
सोलापूर : इयत्ता ११ वी च्या प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून गुरुवारी जाहीर करण्यात आले. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांना सूचना केल्या आहेत. १ ऑगस्टपासून सर्व -महाविद्यालये सुरु करावीत असे म्हटले आहे. या प्रक्रियेमध्ये महाविद्यालयातील पहिली गुणवत्ता यादी ११ जुलै रोजी जाहीर होणार आहे.
शहर आणि जिल्ह्यातील सर्व अनुदानित, विनाअनुदानित, स्वयंअर्थसहाय्यित महाविद्यालयांना इयत्ता ११ वी च्या प्रवेश संबंधीचे वेळापत्रक पाठवण्यात आले आहे. त्यानुसार २३ ते ५ जुलै या काळात विद्यार्थ्यांना ऑनलाईन, ऑफलाईन प्रवेश अर्ज विक्री व सादर करावयाचे आहेत. यानंतर ६ ते ७ जुलै या दोन दिवसात पहिली गुणवत्ता यादी जाहीर होईल. १२ ते १५ जुलै या चार दिवसात कार्यालयीन वेळेत प्रवेश द्यावयाचा आहे.
यानंतर दुसरी गुणवत्ता यादी १६ जुलै रोजी महाविद्यालयांच्या नोटीस बोर्डवर लावण्यात येईल. १८ ते २२ जुलै या काळात विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल. २३ जुलै रोजी तिसरी गुणवत्ता यादी जाहीर होईल आणि २५ ते ३० जुलै या दिवसात प्रवेश देण्यात येईल. यानंतर जागा शिल्लक असल्यास गुणवत्तेनुसार प्रवेश देण्यात यावा, शिक्षणाधिकारी भास्करराव बाबर आणि शिक्षण विस्तार अधिकारी अशोक भांजे यांनी पत्रान्वये सर्व महाविद्यालयांना सूचित केले आहे.
“सर्व कनिष्ठ महाविद्यालये १ ऑगस्टपासून शासनाच्या परिपत्रकाच्या अधीन राहून सुरु करण्यात यावीत. वर्गात प्रवेश देताना कोविड १९ च्या सर्व सूचनांचे पालन करुन खबरदारी घ्यावी”
– भास्करराव बाबर, शिक्षणाधिकारी (माध्य.), जि. प. सोलापूर)