मुंबई : मुंबईत रात्री भयंकर दुर्घटना घडली आहे. कुर्ला परिसरात एक 4 मजली इमारत कोसळली. यातील मृतांचा आकडा 17 वर पोहोचला आहे. तर जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अजूनही घटनास्थळी मदतकार्य सुरू असल्याची माहिती एनडीआरएफने दिली आहे. ढिगाऱ्याखाली काही जण अडकले आहेत का? याचा शोध घेतला जात आहे. मुंबई महापालिकेने नोटीस बजावलेल्या इमारतींमध्ये वास्तव्य करू नये, असे आवाहन करण्यात येत आहे. Mumbai: Aditya Thackeray announces help on Kurla building accident, death toll rises to 17
आणखी काहीजण या ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती आहे. बीएमसी, अग्निशमन दल आणि एनडीआरएफ पथकाच्या वतीनं या ठिकाणी बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कुर्ला येथे इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी 5 लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे जाहीर केले आहे.
या दुर्घटनेनंतर एकूण 32 जण जखमी झाल्याची माहिती समोर आली होती, मात्र जखमींपैकी आता 17 जण मृत झाले असून 14 जण जखमी अवस्थेत होते. या 14 पैकी आता 5 जण रुग्णालयात उपचार घेत असून तर उर्वरित 9 जणांना उपचार देऊन घरी सोडण्यात आले आहे. दरम्यान या दुर्घटनाग्रस्त इमारतीचे बनावट ऑडिट रिपोर्ट तयार करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
https://www.facebook.com/109399567404448/posts/570355554642178/
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
https://www.facebook.com/109399567404448/posts/570392151305185/
काही मृतांची नावे आली आहेत. अजय भोले पासपोर (वय – 28), अजिंक्य गायकवाड (34), कुशर प्रजापती (20), सिकंदर राजभर (21), अरविंद भारती (19), अनुप राजभर (18), शाम प्रजापती (18), अनिल यादव (21), अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या दोघांची अद्याप ओळख पटलेली नाही. तसेच काही जखमींची नावे समोर आली आहेत. अखिलेश माजिद, चैहफ बसपाल , देवकी बलिया, प्रीत बलिया, संतोषकुमार गौड, सुदेश गौड, रामराज रहानी, संजय माझी, आदित्य कुशवाह, अबीद अन्सारी, गोविंद भारती, मुकेश मौर्य, मनीष यादव, अशी नावे आहेत.
जखमींवर शासकीय खर्चाने उपचार करण्याचेही निर्देश दिले आहेत. एकीकडे राज्य सरकारकडून मृतांना मदत जाहीर करण्यात आली असून दुसरीकडे एकनाथ शिंदे गट आणि आमदार मंगेळ कुडाळकरांकडून मृतांना पाच लाख रुपये मदत जाहीर करण्यात आली आहे. या घटनेमुळे आपल्याला दु:ख झाल्याची प्रतिक्रिया आमदार मंगेश कुडाळकर यांनी दिली आहे.
मुंबईतील कुर्ला येथील नाईकनगर परिसरातील चार मजली इमारत काल सोमवारी (ता.27) रात्री 11.30 च्या सुमारास कोसळली. या ढिगाऱ्याखाली अनेक लोक अडकल्याची शक्यता आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या ठिकाणच्या ढिगाऱ्यामधून अनेकांना वाचवण्यात यश आलं आहे. जखमी लोकांवर राजावाडी रुग्णालय आणि सायन रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मुंबईचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी यांनी मध्यरात्रीच्या सुमारास घटनास्थळी भेट दिली. जखमी झालेल्या लोकांवर जवळच्या रुग्णालयामध्ये उपचार करण्यात येत आहेत. या चारही इमारतींना मुंबई महानगरपालिकेकडून नोटीस देण्यात आली होती. असं असतानाही त्या ठिकाणी आठ ते दहा कुटुंबं राहत असल्याची माहिती आहे. या वास्तव्य करणारे रहिवासी भाडेकरू आहेत. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांची सुटका करण्यासाठी बचाव कार्याचे प्रयत्न सुरू आहेत. मुंबई महापालिकेने नोटीस बजावलेल्या इमारतींमध्ये वास्तव्य करू नये असे आवाहन करण्यात येत आहे.
https://www.facebook.com/109399567404448/posts/570594271284973/