● नऊजणांची आत्महत्या नसून हत्या झाल्याचे उघड
सांगली – सांगलीतील मिरजमधील म्हैसाळ येथील वनमोरे कुटुंबातील ९ जणांनी आत्महत्या केली नसून त्यांची हत्या झाल्याची माहिती उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे, याप्रकरणी दोन मांत्रिकांना सोलापुरातून अटक करण्यात आल्याचे पोलीस अधीक्षक दीक्षित गोडाम यांनी सांगितले. Two arrested from Solapur in 9 suicide cases of the same family Sangli Miraj Mahisal Vanmore committed suicide
अब्बास महंमदअली बागवान वय ४८, रा. सरवदेनगर, मुळेगाव रोड, सोलापूर) आणि धीरज चंद्रकांत सुरवसे (वय ३०, रा. वसंत विहार, सोलापूर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. म्हैसाळ (ता. मिरज) येथे ९ जणांच्या आत्महत्येने खळबळ उडाली होती. ९ जणांनी आत्महत्या केल्याने पोलिसांनी तपास गतीने करण्यास सुरुवात केली होती.
आत्महत्या करण्यापूर्वी चिड्डीमध्ये डॉ. माणिक वनमोरे आणि शिक्षक पोपट वनमोरे यांनी २५ जणांची नावे लिहिली होती. त्या दृष्टीने २५ पैकी १८ सावकारांना अटक करण्यात आली होती. गुप्तधनाच्या हव्यासापोटी वनमोरे कुटुंबाचे कोट्यवधी रुपयांचे कर्ज झाले होते. त्यामुळे पोलीस अंधश्रद्धेच्या दृष्टीने देखील तपास करीत होते. यावेळी दोन मांत्रिकांची नावे तपासात निष्पन्न झाली होती.
गुप्तधनाच्या हव्यासापोटी वनमोरे कुटुंबाचे कोट्यवधी रुपयांचे कर्ज झाले होते. त्यामुळे पोलीस अंधश्रद्धेच्या दृष्टीने देखील तपास करीत होते. यावेळी दोन मांत्रिकांची नावे तपासात निष्पन्न झाली होती. दोन मांत्रिक हे वारंवार वनमोरे कुटुंबीयांच्या घरी येत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी बागवान आणि सुरवसे या दोघांना अटक केली. वरील दोघांनी वनमोरे कुटुंबीयांना जेवणातून विषारी द्रव्य घालून हत्याकांड केले आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक गेडाम यांनी दिली.
दोन मांत्रिक हे वारंवार वनमोरे कुटुंबीयांच्या घरी येत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी बागवान आणि सुरवसे या दोघांना अटक केली. वरील दोघांनी वनमोरे कुटुंबीयांना जेवणातून विषारी द्रव्य घालून हत्याकांड केले आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक गेडाम यांनी दिली.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
https://www.facebook.com/109399567404448/posts/570524541291946/
□ रंग, वास, चवहीन विषारी औषध
वनमोरे कुटुंबीयांनी प्राशन केलेले विषारी औषध, रंग, वास आणि चवहीन असल्याचा निर्वाळा वैद्यकीय सूत्रांनी दिला आहे. ते विषारी औषध त्यांनी खाद्यपदार्थ किंवा एखाद्या पेयामधून दिल्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. दरम्यान, ते विषारी औषध कुटुंब प्रमुखांनीच अन्य सदस्यांना दिले की, अन्य कोणी दिले याबाबतचे गूढ अद्यापही कायम आहे.
□ मृत्यूपूर्व चिठ्ठीतील हस्ताक्षर तपासणीसाठी
वनमोरे कुटुंबीयांचे मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांना दोघांच्या घरातून दोन चिठ्या सापडल्या आहेत. त्यातील मजकूर एकसारखाच असल्याचे सांगितले जात आहे. फक्त दोन्ही चिठ्यांमधील काही नावांत फरक आहे. लिहिण्याची पद्धतही एकसारखीच आहे. शिवाय त्या दोन्ही चिठ्ठीतील हस्ताक्षर एकाच व्यक्तीचे असावे, असा पोलिसांना संशय आहे. त्यामुळे त्या दोन्ही चिठ्ठीतील हस्ताक्षर तपासणीसाठी तज्ज्ञांकडे पाठविल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.
□ चर्चेतून सापडला सुराग
या घटनेनंतर पोलिसांनी सावकारांच्या मागे तपासाची दिशा निश्चित केली होती. मात्र म्हैसाळगावात वेगळीच चर्चा पोलिसांना ऐकायला मिळाली. वनमोरे कुटुंबाला प्रचंड कर्ज झाले होते. त्याची परतफेड करणे कठीण झाले होते. सावकार त्रास देत होते. अशातच वनमोरे कुटुंब रात्री-अपरात्री घरात पूजाअर्जा करत होते, त्याची कुणकुण शेजाऱ्यांना लागली होती. त्यात सोलापूरचा भोंदूबाबा आब्बास नेहमीच वनमोरे यांच्या घरी येत असल्याचे अनेकांनी पाहिले होते. हीच चर्चा पोलिसांपर्यंत पोहचली आणि पोलिसांनी आपला मोर्चा आब्बासकडे वळवला.
□ काय घडले होते ?
कर्जाला कंटाळून म्हैसाळ (ता. मिरज) येथील एकाच कुटुंबातील नऊजणांनी सामूहिक आत्महत्या केल्याची घटना २० जून रोजी उघडकीस आली होती. या घटनेत डॉ. माणिक वनमोरे, रेखा वनमोरे, आक्काताई वनमोरे, प्रतिमा वनमोरे, आदिनाथ वनमोरे, शुभम वनमोरे या सहा जणांचे मृतदेह एका घरात तर दीड किलोमीटर अंतरावरील घरात पोपट वनमोरे, संगीता वनमोरे, अर्चना वनमोरे या तिघांचे मृतदेह आढळले होते. मृताजवळ मिळालेल्या दोन चिठ्यांवरून सावकारांच्या तगाद्याने आत्महत्या केल्याची माहिती प्राथमिक पातळीवर मिळाली होती. या माहितीच्या आधारे २५ सावकारांविरूध्द आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. यापैकी १९ जणांना अटक करण्यात आली होती.
□ आब्बासनेच केला खेळ
याप्रकरणी अटक करण्यात आलेला आब्बास महमंदअली बागवान याची डॉ. वनमोरे यांच्याशी गेल्या तीन-चार वर्षांपासून ओळख होती. तो अधूनमधून वनमोरे यांच्या घरी येत होता. धीरज सुरवसे हा आब्बास याचा ड्रायव्हर असून तो मांत्रिक आब्बास याचा शिष्य म्हणूनच वावरत होता. आब्बास हा मांत्रिक असून तोच डॉ. वनमोरे यांना त्यांच्या घरातून गुप्तधन काढून देणार होता. त्यासाठी त्यानेच घरात पूजापाठ वगैरे केले होते. त्यानेच दिलेल्या तीर्थप्रसादातून विषबाधा झाल्यामुळे संपूर्ण वनमोरे कुटुंब जिवानिशी संपले आहे.
https://www.facebook.com/109399567404448/posts/570392151305185/