Friday, January 27, 2023
Surajya Digital
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
  • ब्लॉग
  • अर्थाअर्थ
  • शिवार
  • Techनिक
No Result
View All Result
Surajya Digital
No Result
View All Result

विठ्ठल कारखान्यासाठी तिरंगी सामना; 21 जागांसाठी ९१ जण रिंगणात

Triangular match for Vitthal Sugar Factory; 91 candidates contest for 21 seats in Pandharpur

Surajya Digital by Surajya Digital
June 28, 2022
in Hot News, सोलापूर
0
विठ्ठल कारखान्यासाठी तिरंगी सामना; 21 जागांसाठी ९१ जण रिंगणात
0
SHARES
55
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

पंढरपूर : विठ्ठल कारखान्याची निवडणूक सत्ताधारी भालके -काळे, युवराज पाटील व अभिजित पाटील अशी तिरंगी लढत होणार असून, २१ जागांसाठी तब्बल ९१ उमेदवार निवडणूक रिंगणात असणार आहेत. निवडणुकीत सत्ताधारी गटामध्ये फूट पडत भालके-काळे यांनी स्वतंत्र पॅनल टाकले. तर युवराज पाटील, गणेश पाटील, दीपक पवार या गटाने नव्या जुन्यांचा मेळ घालत स्वतंत्र पॅनल टाकला. डिव्हीपी उद्योग समूहाचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनी मागील वर्षभरापासून जोरदार तयारी करत स्वतंत्र पॅनल टाकला आहे. बी.पी. रोंगे यांनी शेवटच्या क्षणी अभिजित पाटील यांच्या गटाशी घरोबा केला. Triangular match for Vitthal Sugar Factory; 91 candidates contest for 21 seats in Pandharpur

 

श्री विठ्ठल सहकारी सहकरी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये सोमवार (दि. 27) उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत होती. यामध्ये 173 उमेदवारांनी उमेदवारी मागे घेतली आहे. तर या निवडणूक रिंगणात 21 जागेसाठी एकूण 91 उमेदवार रिंगणात आहेत. सध्या निवडणुकीसाठी तिरंगी लढत होत असून यामध्ये अपक्षांचाही मोठा भरणा दिसून येत आहे.

 

या निवडणूकीसाठी सत्ताधारी भालके-काळे आघाडीच्या वतीने श्री विठ्ठल शेतकरी विकास पॅनलने आपले 21 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवले असून हे उमेदवार पुढीलप्रमाणे : भाळवणी गट – बाळासाहेब विष्णू यलमार, विलास विष्णू देठे, सौ. रूक्मिणी पांडुरंग बागल, करकंब गट – दशरथ पंढरीनाथ खळगे, हणमंत ज्ञानोबा पवार, मारूती श्रीमंत भिंगारे, मेंढापूर गट – तानाजी भिमराव भुसनर, विलास अभिमन्यू भोसले, तुंगत गट – महेश मोहन कोळेकर,धनाजी लक्ष्मण घाडगे, सरकोली गट – भगिरथ भारत भालके, सौ. नयना अशोक शिंदे, कासेगांव गट – गोकुळ दिगंबर जाधव, बाळासाहेब दगडू आसबे, संस्था मतदार संघातून समाधान वसंतराव काळे, अनुसूचित जाती किंवा जमातीमधून दत्तात्रय हरिभाऊ कांबळे, महिला सदस्य – साधना नेताजी सावंत, वनिता राजाराम बाबर, इतर मागासवर्गीय अभिषेक अभयकुमार पुरवत, भटक्य विमुक्त जाती व जमाती विशेष मागास प्रवर्गातील प्रतिनिधी बाबासोा सदाशिव हाके.

 

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

 

कारखान्याचे विद्यमान संचालक युवराज पाटील यांनीही या निवडणुकीत स्वतंत्र निवडणूक लढण्याचा निर्णय मागील अनेक दिवसापासून घेतला आहे. यामध्ये त्यांनी श्री विठ्ठल आण्णा-भाऊ शेतकरी विकास पॅनलने आपले 21 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवले असून हे उमेदवार पुढीलप्रमाणे : भाळवणी गट – दिपक दामोदर पवार, मोहन नामदेव बागल, मधुकर शामराव गिड्डे, करकंब गट – रामकृष्ण नारायण जवळेकर, सिद्राम देविदास पवार, शहाजी माणिक मुळे, मेंढापूर गट – युवराज विलासराव पाटील, बळिराम यशवंत पाटील, तुंगत गट – विक्रांत चंद्रकांत पाटील,गणेश कृष्णा चव्हाण, सरकोली गट- प्रविण रामचंद्र भोसले, बबन रंगनाथ शिंदे, कासेगाव गट – प्रशांत आण्णासाहेब देशमुख, हेमंतकुमार प्रकाशराव पाटील, माणिक विश्वनाथ जाधव, संस्था मतदार संघ- बाळासाहेब महादेव पाटील, अनुसूचित जाती किंवा जमाती नवनाथ गणपत लोखंडे, महिला सदस्य राजश्री पंडितराव भोसले, सुशिला दगडू भुसनर, इतर मागासवर्गीय नारायण महादेव जाधव, भटक्या विमुक्त जाती व जमाती विशेष मागास प्रवर्गातील प्रतिनिधी बाळासाहेब कृष्णा गडदे.

 

 

 

धाराशिवचे चेअरमन उद्योगपती अभिजीत पाटील यांनी  अखेरच्या टप्प्यात मागील निवडणूकीत प्रस्थापितांना सळो की पळो करून सोडलेले डॉ. बी.पी.रोंगे यांना ऐनवेळी आपल्यासोबत घेत 21 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये तुंगत गट – अभिजीत धनंजय पाटील, प्रविण विक्रम कोळेकर, करकंब गट – दत्तात्रय विश्वनाथ नरसाळे,  नवनाथ अंकुश नाईकनवरे, कालिदास शंकर साळुंखे, कासेगांव गट – सुरेश बाबा भुसे, बाळासाहेब चिंतामणी हाके, प्रेमलता बब्रुवाहन रोंगे, भाळवणी गट – साहेबराव श्रीरंग नागणे, धनंजय उत्तम काळे, कालिदास रघुनाथ पाटील, मेंढापूर गट – दिनक आदिनाथ चव्हाण, जनक माणिक भोसले, सरकोली गट – संभाजी ज्ञानोबा भोसले, सचिन पोपट वाघाटे, अनुसूचित जाती सिताराम तायाप्पा गवळी, इतर मागास वर्ग – अशोक ज्ञानाोबा जाधव, संस्था मतदार संघ राजाराम धोडिंबा सावंत, महिला प्रतिनिधी कलावती महादेव खटके, सविता विठ्ठल रणदिवे, भटक्या विमुक्त जातीमधून सिद्धेश्वर शंकर बंडगर यांचा समावेश आहे.

Tags: #Triangular #match #Vitthal #Sugar #Factory #candidates #contest #seats #Pandharpur#विठ्ठल #साखर #कारखाना #तिरंगी #सामना #जागा #रिंगणात #पंढरपूर
Previous Post

जिल्हाधिकारी कार्यालयात महिलेचा खून, नातवाला घेतले ताब्यात

Next Post

एकाच कुटुंबातील 9 आत्महत्याप्रकरणी सोलापुरातून दोघांना अटक

Surajya Digital

Surajya Digital

Next Post
एकाच कुटुंबातील 9 आत्महत्याप्रकरणी सोलापुरातून दोघांना अटक

एकाच कुटुंबातील 9 आत्महत्याप्रकरणी सोलापुरातून दोघांना अटक

वार्ता संग्रह

June 2022
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« May   Jul »

ट्विटर पेज

Currently Playing

About Us

SurajyaDigital
सुराज्य डिजिटल हा ब्रँड जगाच्या काना-कोपऱ्यातील सर्वंकष माहितीचा अचूक खजिना आपल्यापर्यंत पोहोंचविण्याचे काम करतोय. टाईम मीडिया हाऊसचा हा ब्रँड अल्पावधीतच मराठी वाचकांचा अत्यंत विश्वासार्ह ब्रँड बनला आहे.जगभरातील घटनांचा वेगवान आढावा घेत त्यावर भाष्य करण्याबरोबरच वाचकांच्या आवडीचे विषय, करमणूक यासारखे दृक्श्राव्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सुराज्य डिजिटल कटीबद्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा timemediahouse@gmail.com timemarathi@gmail.com
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697