सोलापूर : येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या व आवारातील एजाज कॅन्टीनच्या पाठीमागील पडक्या खोलीत सोमवारी सकाळी एका महिलेचा मृतदेह आढळून आला. तिच्या शरीरावर ब्लेडने वार करुन खून केला असून, तिच्या नातवाला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. Murder of a woman in the Collector’s office, grandson taken into custody
रजिया सलीम शेख (वय ७२, रा. विडी घरकूल) असे महिलेचे नाव आहे. त्या जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात बसून आलेल्या नागरिकांना मदत करण्याचे काम करीत असत. त्या दोन दिवसांपूर्वी घरातून बाहेर पडल्या होत्या. त्या घरी परतल्या नसल्याने त्यांची मुलगी शबाना मलंग शेख आणि त्यांचे नातेवाईक शोध घेत होते. सोमवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास गफूर पठाण यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात पडक्या खोलीत रजियाचा मृतदेह आढळल्याची माहिती मिळाली.
घटनास्थळी मयत रजिया शेख यांच्या अंगावरील साडी अस्ताव्यस्त अवस्थेत होती. दोन्ही हाताला जखमा होत्या. गळ्याला वार करण्यात आला होता. पायाला ही जखमा होत्या, त्यामुळे धारदार शस्त्राने त्यांचा खून झाल्याचे दिसून आले.
ब्लेडसारख्या धारदार वस्तूने गळ्याला मारल्याच्याही खुणा दिसून आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. फिर्यादीने घटनेच्या ठिकाणी जाऊन पाहणी केली असता, रजिया यांचा मृतदेह आढळून आला. मृतदेहाची ओळख पटली. रजिया शेख यांच्याजवळ मोबाइल होता, तो गेल्या दोन दिवसांपासून बंद असून तो मृतदेहाजवळ आढळून आला नाही.
https://www.facebook.com/109399567404448/posts/570406137970453/
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
नातवाने केलेला आंतरजातीय विवाह रजिया यांना पटला नव्हता. यामुळे त्यांच्यात नेहमी वाद होत होता. नातवाच्या पत्नीला त्या रागाने बोलत होत्या. यातून नातवानेच आजीचा घात केल्याचे बोलले जात आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून, त्याची चौकशी सुरु असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली. हल्ला करण्यात आल्याचा कयास बांधला जात आहे.
रजिया या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात ज्या ठिकाणी बसून काम करीत होत्या, जी जागा पावसामुळे ओली झाली होती, त्याठिकाणी वाळलेली माती टाकावी या उद्देशाने रजिया पडक्या खोलीकडे गेल्या होत्या. तिथेच संधी साधून संशयिताने रजियावर हल्ला केल्याचा कयास बांधला जात आहे.
मटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त बापू बांगर, डॉ. वैशाली कडूकर, सहायक पोलीस आयुक्त माधव रेड्डी यांनी घटनास्थळी, भेट देऊन पाहणी केली. तसेच तपासाबाबत अधिकाऱ्यांना सूचना केल्या. त्यानंतर रजिया यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला. याप्रकरणी रजिया यांच्या नातवाला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक पोपटराव धायतोंडे हे करीत आहेत.
“शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालात महिलेचा खून झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अज्ञात व्यक्तीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात येत आहे. खून कोणी केला? का केला? याचा तपास सुरू आहे. लवकरच सर्व गोष्टी बाहेर येतील.”
माधव रेड्डी – सहायक पोलीस आयुक्त
https://www.facebook.com/109399567404448/posts/570392151305185/