मुंबई : उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे राज्यातलं ठाकरे सरकार कोसळलं. तर दुसरीकडे बच्चू कडूंना तीन रस्त्यांच्या कामात गैरव्यवहार केल्याच्या प्रकरणातून क्लीनचीट मिळाली आहे. अस्तित्वात नसलेल्या तीन रस्त्यांच्या कामात तब्बल एक कोटी 95 लाखांच्या गैरव्यवहाराचा आरोप त्यांच्यावर होता. वंचित बहुजन आघाडीच्या तक्रारीनंतर त्यांच्यावर आरोप झाले होते. Where the government collapsed, the file of a big leader was closed. MLA Bachchu Kadu
उध्दव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला असून लवकरच राज्यात भाजप- शिंदे गटाची सत्ता
येणार हे स्पष्ट झाले या बंडात सोबत राहून महत्वपूर्ण भूमिका पार पाडणाऱ्या बच्चू कडूंना मआविचे सरकार जाताच क्षणी रस्ते घोटाळ्यात क्लीन चिट मिळाल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
वंचित बहुजन आघाडीने तीन रस्त्यांच्या कामात बच्चू कडूंनी भ्रष्टाचार केला असल्याचे म्हटले होते तसेच जवळपास 2 कोटींचे रस्तेच अस्तित्वात नसल्यामुळे पोलिसांत बच्चू कडूंवर फसवणूकीचे गुन्हे दाखल झालेले होते. हे प्रकरण कोर्टात दाखल होतं संपुर्ण प्रकरणात पुरावे नसल्याने पोलिसांनी फाईल बंद करत बच्चू कडूंना क्लीन चीट दिली आहे.
Where the government collapsed, the file of a big leader was closed. MLA Bachchu Kadu
https://www.facebook.com/109399567404448/posts/571810657830001/
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
अकोल्याचे माजी पालकमंत्री बच्चू कडूंना तीन रस्त्यांच्या कामात गैरव्यवहार केल्याच्या प्रकरणातून क्लीनचीट मिळाली आहे. अस्तित्वात नसलेल्या तीन रस्त्यांच्या कामात तब्बल एक कोटी 95 लाखांच्या गैरव्यवहाराचा केल्याचा आरोप त्यांच्यावर होता. वंचित बहूजन आघाडीने केलेल्या तक्रारीनंतर त्यांच्यावर आरोप झाले होते. हे प्रकरण कोर्टात दाखल होते. सिटी कोतवाली पोलिसांत बच्चू कडूंवर फसवणूकीचे गुन्हे दाखल झालेले होते. संपुर्ण प्रकरणात पुरावे नसल्याने प्रकरणच तथ्यहिन असल्याचे पोलिसांकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. या प्रकरणाची फाईल पोलिसांनी बंद केली आहे.
वंचित बहुजन आघाडीने अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांच्यावर आर्थिक अपहाराचे गंभीर आरोप केले होते. पालकमंत्री बच्चू कडूंनी अस्तित्वात नसलेल्या रस्त्यांवर निधी वळता करत 1 कोटी 95 लाखांचा अपहार केल्याचा आरोप वंचित आघाडीने केला होता. जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील शिफारस केलेली रस्त्यांची कामे पालकमंत्री कडूंनी डावलल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता.
पालकमंत्र्यांनी जिल्हा परिषदेला डावलत आपल्या मर्जीतील रस्त्यांची कामे नियमबाह्यपणे करवून घेतल्याचा आरोप वंचितने केला. यातील दोन रस्ते अस्तित्वातच नसल्याचे पुरावे त्यांनी सादर केले होते. या तीन रस्त्यांच्या कामांत बच्चू कडूंनी एक कोटी 95 लाखांचा अपहार केल्याचा आरोप वंचितने केला होता.
https://www.facebook.com/109399567404448/posts/571780151166385/