□ मोठा उलटफेर, फडणवीसांचा अचानक मोठा निर्णय
मुंबई : एकनाथ शिंदे यांनी आज राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी एकनाथ शिंदे यांना शपथ दिली आहे. यावेळी मोजके लोक या ठिकाणी उपस्थित होते. मुंबईतल्या राजभवन येथील दरबार हॉलमध्ये हा शपथविधी पार पडला. Eknath Shinde was sworn in as the Chief Minister and Fadnavis was sworn in as the Deputy Chief Minister of Maharashtra oathscermny
देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्याआधी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. आज फक्त दोन नेत्यांचा शपथविधी झाला आहे. शिंदे गट आणि भाजप यांचे मिळून राज्यात नवीन सरकार तयार झाले आहे. मंत्रिमंडळातील इतर सदस्यांना नंतर शपथ दिली जाणार आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या मंत्रिमंडळात सामील होण्याचा निर्णय घेतला आहे. आधी पत्रकार परिषदेत त्यांनी आपण मंत्रीमंडळात सामील होणार नाही, असे म्हटले होते. मात्र आता फडणवीस यांनी मोठे मन दाखवत मंत्रिमंडळात सामील होण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी ट्विट करुन दिली आहे.
राजभवनातील दरबार हॉलमध्ये महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी पदाची शपथ घेतली. एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे 30 वे मुख्यमंत्री बनले आहेत. दहा दिवसांच्या सत्ता नाट्यानंतर अखेर बुधवारी उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला. आज शिंदे यांच्या शपथविधीला मुलगा खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासह संपूर्ण शिंदे कुटुंब उपस्थित होते. तसेच, भाजपा नेते आशिष शेलार उपस्थित होते.
एकनाथ शिंदे हे अनेक वर्षांपासून ठाणे जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करीत असले तरी ते मूळचे सातारा जिल्ह्यातील दरे तर्फ तांब गावचे सुपुत्र आहे. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, बॅ. बाबासाहेब भोसले, पृथ्वीराज चव्हाण यांच्यानंतर तब्बल 8 वर्षांनंतर पुन्हा सातारा जिल्ह्याला मुख्यमंत्रीपदाचा मान मिळाला आहे.
https://www.facebook.com/109399567404448/posts/571810657830001/
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
https://www.facebook.com/109399567404448/posts/571944814483252/
एकनाथ शिंदेंनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. आता यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्वीट करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. समृद्ध राजकीय व प्रशासकीय अनुभव असलेले एकनाथ शिंदे आता महाराष्ट्राला आणखी उंचीवर नेण्यासाठी काम करतील, असे मोदी यांनी म्हटले आहे.
नितीन गडकरी यांनी ट्विट करुन म्हटले की, ‘महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची शपथ ग्रहण केल्याबद्दल एकनाथ शिंदे यांचे तसेच उपमुख्यमंत्री पदाची शपथ ग्रहण केल्याबद्दल देवेंद्र फडणवीस यांचे हार्दिक अभिनंदन व दोघांनाही यशस्वी कार्यकाळासाठी शुभेच्छा. आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली व आपल्या दोघांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र प्रगतीचे नवे उच्चांक प्रस्थापित करो, या सदिच्छा’.
त्यानंतर आज गुरुवारी (30 जून) देखील घडामोडी मोठ्या वेगाने घडल्या. मुंबईत आल्यानंतर एकनाथ शिंदेंनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. त्यानंतर राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा केला. त्याच्या पुढे लगेचच पत्रकार परिषद घेत, एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होतील, अशी मोठी घोषणा फडणवीसांनी केली. अखेरीस गुरुवारी सायंकाळी एकनाथ शिंदेंचा राज्याचे 30 वे मुख्यमंत्री म्हणून शपथविधी पार पडला.
यावेळी पदाची शपथ घेताना एकनाथ शिंदे यांनी हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांचे स्मरण केले आणि त्यानंतर पदाच्या गोपनियतेची शपथ घेतली. या शपथविधीवेळी फक्त एकनाथ शिंदेंचा शपथविधी होईल, असाच सर्वांचा अंदाज होता. कारण देवेंद्र फडणवीसांनी तशी घोषणा केली होती.
मात्र, भाजपच्या केंद्रीय कमिटीने फडणवीस यांना उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सोपवण्याचा आग्रह केला आहे. विशेष म्हणजे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीच फडणवीसांना मंत्रिमंडळात सहभागी होण्यासाठी आग्रह केला.
विशेष म्हणजे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ट्विट करत फडणवीस यांनी मंत्रिमंडळात सहभागी होण्याचा निर्णय घेतल्याची माहिती दिली आहे. “भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या सांगितल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मोठ्या मनाने महाराष्ट्र राज्य आणि जनतेच्या हितासाठी सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय त्यांची महाराष्ट्राप्रती असणारी खरी निष्ठा आणि सेवेच्या समर्पणासाठी असणारी तयारी दर्शवते. त्यामुळे त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन”, असं अमित शाह ट्विटरवर म्हणाले.
केंद्रीय नेतृत्वाच्या सुचनेनुसार देवेंद्र फडणवीस यांनीही थेट मंत्रीमंडळात सहभागी होण्यास संमती दाखवली. तसेच, उपमुख्यमंत्री पद स्विकारण्याची तयारी दाखवली. त्यानुसार आज शिंदेंच्या शपथविधीच्या अगदी काहीवेळा पूर्वी झालेल्या या निर्णयानंतर एकनाथ शिंदे यांच्यासह देवेंद्र फडणवीस यांचाही शपथविधी झाला. त्यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.
https://www.facebook.com/109399567404448/posts/571870904490643/