मुंबई : एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी ही घोषणा केली आहे. एकनाथ शिंदे आज एकटे संध्याकाळी 7.30 वाजता मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. त्यांना भाजप पूर्ण पाठिंबा देणार आहे. शिंदे यांच्या नेतृत्वात हे सरकार महाराष्ट्राच्या विकासासाठी सर्व प्रयत्न करणार, असेही फडणवीस यांनी सांगितले आहे. ते मुंबईतल्या राजभवनावरील पत्रकार परिषदेत बोलत होते. Eknath Shinde to be Chief Minister, now ‘Shinde Government’ in Maharashtra; Outside the Fadnavis government
देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे सत्ता स्थापनेचा दावा केल्यानंतर संयुक्त पत्रकार परिषद घेत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मोठी घोषणा केली. एकनाथ शिंदे हेच महाराष्ट्राचे पुढील मुख्यमंत्री होतील, असे देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
देवेंद्र फडणवीस नव्याने स्थापन होणाऱ्या ‘शिंदे सरकार’ मध्ये प्रत्यक्ष मंत्रीमंडळात सामील होणार नाहीत. शिंदे यांच्या गटाला भाजप पाठिंबा देणार आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार आहेत. मात्र शिंदे यांच्या सरकारमध्ये फडणवीस मंत्री म्हणून शपथ घेणार नाहीत. पण ते सरकारला पूर्ण मदत करणार आहेत. दरम्यान या सरकारमध्ये मंत्री म्हणून कुणाला संधी मिळणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
नव्या सरकारचा शपथविधी आज संध्याकाळी 7 वाजता होणार आहे. मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील, असे सांगितले जात होते. पण आता चित्र बदलले आहे. राजभवन येथील दरबार हॉलमध्ये हा शपथविधी होणार आहे. त्यासाठी पूर्ण तयारी करण्यात आली आहे. थोड्याच वेळात देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे राजभवनावर पोहोचत आहेत.
महाराष्ट्रात आता शिंदे सरकार येणार आहे. राज्याचे नवीन मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे शपथ घेणार आहेत. त्यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन सत्ता स्थापन करण्याचा दावा केला. भाजपने शिंदे यांच्या गटाला पाठिंबा दिला आहे. तसेच अनेक अपक्षांचाही शिंदे यांना पाठिंबा आहे. एकनाथ शिंदे आज एकटेच मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. नंतर मंत्रीमंडळाचा विस्तार होणार आहे.
》 पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस म्हणाले…
• हिंदुत्वाचा विरोध करणाऱ्यांसोबत उद्धव ठाकरेंनी युती केली व
भाजपला बाहेर ठेवले, हा अपमान होता.
– जनतेने भाजप-सेनेला बहुमत दिले होते.
– गेल्या अडीच वर्षात महाविकास आघाडीने प्रचंड भ्रष्टाचार केला
– 2 मंत्री भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली जेलमध्ये जाणे खेदजनक
– दाऊदशी संबंधित नेत्याला जेलमध्ये गेल्यानंतर मंत्रीपदावरून हटवले नाही.
– एकनाथ शिंदे शिवसेनेचे गटनेते आहेत.
https://www.facebook.com/109399567404448/posts/571944814483252/
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
□ एकनाथ शिंदेंना झेड सुरक्षा, शिंदे मुंबईत पोहोचले, ताजमध्ये 123 खोल्या बुक
मुंबई : बंडखोर आमदार एकनाथ शिंदे आज मुंबईला येणार आहेत. विमानतळ परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.. तिथल्या गाड्या हटवण्याचं काम पोलिस करीत आहेत. गेट क्रमांक आठमधून ते बाहेर पडणार आहेत. एकनाथ शिंदेंना झेड सुरक्षा देण्यात आली आहे. तसेच भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट शिंदे घेऊ शकतात, त्यांनतर ते राज्यपालांची सुद्धा भेट घेणार आहेत.
एकनाथ शिंदे अखेर मुंबई विमानतळावर पोहोचले आहेत. तब्बल 10 दिवसानंतर ते पहिल्यांदा मुंबईत आले आहेत. शिवसैनिक आक्रमक होण्याची शक्यता असल्याने शिंदे यांना झेड दर्जाची सुरक्षा पुरवण्यात आली आहे. शिंदे यांच्या स्वागतासाठी काही कार्यकर्ते विमानतळावर पोहोचले आहेत. दरम्यान शिंदे पहिल्यांदा फडणवीसांच्या सागर बंगल्यावर जाणार आहेत. त्यानंतर फडणवीस- शिंदे राजभवन येथे जाणार आहेत.
भाजप एकनाथ शिंदे गटासोबत सत्ता स्थापन करणार आहे. आता नव्या सरकारच्या मंत्रिमंडळात कोणाला स्थान मिळेल, याची चर्चा सुरु झाली आहे. मात्र, मंत्रीपदे याबाबत अद्याप कोणतीही चर्चा झालेली, असे स्पष्टीकरण शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी दिले आहे.
भाजपसोबत कोणती आणि किती मंत्रीपदे याबाबत अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही, लवकरच होईल. तोपर्यंत कृपया मंत्रिपदाच्या याद्या आणि याबाबत पसरलेल्या अफवा यावर विश्वास ठेवू नका, असे नेते एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.
एकनाथ शिंदे आज देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार आहेत. सागर बंगल्यावर शिंदे – फडणवीसांची भेट होणार आहे. एकनाथ शिंदे गोव्यातून मुंबईत आले आहेत. शिंदे-फडणवीस भेट होणार आहे, असे सांगितले जात आहे. पुढील राजकीय सत्ता समीकरणाबाबत चर्चा करणार आहेत. त्याआधी शिंदे यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार, धर्मवीर आनंद दिघे यांची शिकवण, महाराष्ट्राचा सर्वांगिण विकास आणि आमदारांच्या मतदारसंघातील विकास कामे हाच आमचा फोकस आहे, असे एकनाथ शिंदे यांनी ट्विट करताना म्हटले आहे.
दरम्यान, महाविकास आघाडी सरकार उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यानंतर कोसळले असतानाच गोव्यात दाखल झालेल्या शिवसेना बंडखोर नेत्यांचा गट आज मुंबईत येणार नसल्याची माहिती आहे. एएनआयच्या बातमीनुसार भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी एकनाथ शिंदे गटाला सध्या मुंबई मध्ये येऊ नका, असा निरोप दिला आहे.
महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्याने आता बहुमत चाचणीसाठी मतदान आवश्यक राहिलेले नाही. त्यामुळे एकनाथ शिंदे गटाला तातडीने मुंबईत येण्याची आवश्यकता नाही. मुंबईच्या ताज प्रेसिडेन्सी मध्ये १२३ खोल्या बुक केल्या गेल्या असून येथेच एकनाथ शिंदे गटाचा मुक्काम असेल असे सांगितले जात आहे. मात्र शपथविधी बाबत नक्की निर्णय होईपर्यंत शिंदे गटाने मुंबईत येऊ नये असे आवाहन त्यांना केले गेल्याचे सांगितले जात आहे.
https://www.facebook.com/109399567404448/posts/571917071152693/