■ तानाजी सावंत, मोहिते-पाटील, देशमुख, शहाजी पाटील यांची नावे चर्चेत
सोलापूर / दीपक शेळके
शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी राज्याचे तिसावे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे तर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. आता शिंदे- फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात सोलापूर जिल्ह्यातील कोणत्या आमदाराची वर्णी लागते आणि मंत्रिपदाची लॉटरी कोणाला लागते याबाबत आता चर्चा झडू लागल्या आहेत तसेच सोलापूरचे पालकमंत्रीपद कोणाला मिळते याबाबत तर्क वितर्क लढवले जात आहेत. Shigela Solapur Deshmukh Sawant Mohite Patil Shahajibapu Patil Curiosity about the ministerial post in the district has increased
तानाजी सावंत, विजयकुमार देशमुख, रणजितसिंह मोहते पाटील, शहाजी पाटील – यांची नावे अग्रेसर असल्याचे बोलले जात आहे. सत्ता वाटपाचे सूत्र अद्याप ठरले नाही. एक दोन दिवसात इतर मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. यामध्ये भाजप आणि भाजपला मदत करणाऱ्या अपक्ष आमदारांची संख्या जास्त असणार आहे. त्यामुळे शिंदेच्या सरकारवर भाजपचा रिमोट असणार आहे. सालापू जिल्ह्यामध्ये भाजपचे तब्बल आठ आमदार आहेत तर शिवसेनेचा एक आमदार आहे. उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे समर्थक असणारे सोलापूर शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख देशमुख, दक्षिण सोलापूरचे सुभाष देशमुख, पंढरपूर मंगळवेढ्याचे समाधान अवताडे, बार्शीचे आमदार राजा राऊत, माळशिरसचे राम सातपुते, अक्कलकोटचे सचिन कल्याणशेट्टी आणि रजणितसिंह मोहिते पाटील यांचा समावेश आहे.
शिवसेनेचे सांगोल्याचे एकमेव आमदार शहाजी पाटील आणि माजी मंत्री सोलापूर जिल्ह्यातील शेजारील मंत्री तानाजी सावंत यांनी बंडखोरी करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना साथ दिली आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
https://www.facebook.com/109399567404448/posts/572430274434706/
यापैकी विजयकुमार देशमुख आणि सुभाष देशमुख फडणवीस सरकारमध्ये मंत्री राहिले आहेत. विजयकुमार देशमुख यांनी सोलापूरचे पालकमंत्रीपद तर सुभाष देशमुख यांनी सहकारमंत्रीपद भूषिवले आहे. आता या आमदरांपैकी शिंदे फडणवीस – सरकारमध्ये कोणाची वर्णी लागते कोणाच्या गळ्यात पालकमंत्रीपदाची माळ पडते याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.
फडणवीस यांच्या सरकारमध्ये दोन देशमुखांची वर्णी लागली होती. दोघांनी आपले काम चांगले केले. विजयकुमार देशमुख यांनी पाच वर्षे पालकमंत्रीपदाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली तर सुभाष देशमुख यांचे मंत्रिपद त्यांच्या संस्थामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. तर विजय देशमुखांचा मितभाषी स्वभाव आणि फडणवीस यांचे विश्वासू असल्याने त्यांची देखील वर्णी लागण्याची शक्यता आहे. फडणवीस समर्थक रणजितसिंह मोहिते-पाटील यांचेही नाव पुढे येऊन त्यांच्या गळ्यात पालकमंत्रीपदाची माळ पडण्याची शक्यता आहे.
एकनाथ शिंदे यांना सांगोल्याचे आमदार शहाजी पाटील आणि भूम-परांडाचे आमदार तानाजी सावंत यांनी मोठी साथ दिली. शहाजी पाटील यांचा सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या ऑडिओमुळे एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीची आगळी वेगळी चर्चा राज्यात झाली तर तानाजी सावंत यांनी देखील शिंदे यांना साथ दिली. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या कोट्यातून मंत्रिपदासाठी विचार होण्याची शक्यता आहे.
https://www.facebook.com/109399567404448/posts/572489714428762/