अक्कलकोट / रविकांत धनशेट्टी
राज्यात भाजपचे सरकार आल्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रीमंडळात कुणाकुणाला स्थान मिळणार याविषयीची चर्चा सुरू असतानाच त्यात सोलापूर जिल्ह्यातून कोणा कोणाची वर्णी लागणार याविषयी उत्सुकता लागून आहे. एक तरुण आमदार म्हणून अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी हेही मंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याचे सांगण्यात येते. Akkalkot MLA Sachin Kalyanshetti in the race for the post of Minister, Goa election showed special work
माजी गृहराज्यमंत्री सिध्दाराम म्हेत्रे यांच्या सारख्या ताकतवान ज्येष्ठ नेत्याला मोठ्या मताधिक्याने पराभूत करून २०१९ ला विधानसभेवर सचिन कल्याणशेट्टी हे निवडून गेले. अक्कलकोट तालुका हा परंपरागत काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जात होता. परंतु १९९५ साली विधानसभा निवडणुकीत स्व. बाबासाहेब तानवडे यांनी या बालेकिल्ल्याला जोरदार सुरूंग लावून भाजपचा पहिला झेंडा रोवला होता. तानवडे यांनी तालुक्यात भाजपच्या माध्यमातून अनेक नेते घडविले. त्यापैकी स्व. पंचप्पा कल्याणशेट्टीसर हे एक होत.
जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये अक्कलकोटमधून दोन ते तीन सदस्य निवडून द्यायचे. त्यात पंचप्पा कल्याणशेट्टी यांचे मोठे योगदान होते. आपले वडील पंचप्पा
कल्याणशेट्टी यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून सचिन कल्याणशेट्टी यांनी राजकीय वाटचाल सुरू ठेवली आहे. समाज कारणाच्या माध्यमातून त्यांनी तालुक्यात दांडगा जनसंपर्क हित वाढवला आहे. या कार्याची पोहच पावती म्हणून तालुक्याचे जनतेने सचिन कल्याणशेट्टी यांना 2019 साली अक्कलकोट विधानसभा निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने निवडून दिले आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
https://www.facebook.com/109399567404448/posts/572834831060917/
सचिन हे अतिशय शांत, संयमी, निगर्वी व लाडके तरुण तडफदार आणि खऱ्या अर्थाने जनतेमध्ये राहून जनतेची सेवा करणारा आमदार असून लोकांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असतात. त्यांना सोलापूर जिल्ह्याची देखील चांगली जाण आहे. त्यांना मंत्रीपद दिल्यास ते मंत्रीपद सत्कारणी लावू शकतात. वास्तविक पाहता १९९५ मध्ये भाजपची युतीच्या मंत्रिमंडळात तानवडे यांची वर्णी लागायला हवी होती पण शह काटशहच्या राजकारणात तानवडे यांना मंत्रीपद मिळू शकले नाही.
अक्कलकोट तालुक्याने सदैव भाजपची पाठराखण केली आहे. तेव्हा यंदा तरी सचिन कल्याणशेट्टी यांना मंत्रिपद मिळावे, अशी तालुक्याची जोरदार मागणी आहे.
□ गॉडफादरकडून प्रयत्न….
सचिन कल्याणशेट्टी यांचा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी व माजी सहकार मंत्री आमदार सुभाष देशमुख यांचा जवळचा संबंध असून मंत्री पदासाठी त्यांच्यामार्फत जोरदार फिल्डिंग लावल्याची सांगण्यात येत आहे.
८ नोव्हेंबर २०२१ रोजी फडणवीस हे विविध विकास कामाचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळ्यानिमित्त अक्कलकोटला येऊन गेले होते. त्यावेळी सचिन कल्याणशेट्टी यांच्या कार्यासंदर्भात त्यांनी कौतुक देखील केले होते. गडकरी यांनी २५ एप्रिल २०२२ रोजी रस्ते विकास कामाचे लोकार्पण समारंभ निमित्ताने सोलापूर दौऱ्यावर आले असता अक्कलकोटला आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या घरी सदिच्छा भेट दिली होती.
विशेष म्हणजे गोवा विधानसभा निवडणुकीचे मुख्य प्रभारी तथा फडणवीस यांनी गोवा विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी आपली विश्वासू सहकारी सचिन कल्याणशेट्टी यांच्यावर सोपवली होती. ती जबाबदारी सचिन कल्याणशेट्टी यांनी आपल्या कल्पक नेतृत्वाची आणि व्यूहरचनेची चुणूक दाखवीत आपल्या पक्षाचे उमेदवार प्रेमेंद्र शेट यांचा विजयी रथ किनारी पोचविण्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण भूमिका बजावली असल्याने गोव्यातील मतदारसंघाचे भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सचिन कल्याणशेट्टी व त्यांचे चाळीस जणांची तरुण पदाधिकारी व फळी यांच्यावर कमालीचे खुश झाली.
यामुळे सचिन कल्याणशेट्टी यांच्यावर कौतुकाच्या वर्षाव देखील केला होता. गोवा निवडणुकीत मतदार संघातून आमदार म्हणून प्रेमेंद्र शेट निवडून आले तेव्हा त्यांनी पहिल्यांदा फोन सचिन कल्याणशेट्टी यांनाच केला होता.
https://www.facebook.com/109399567404448/posts/572699507741116/