सोलापूर : महाआघाडी सरकारच्या पतनानंतर बंडखोर शिवसेना नेते एकनाथ यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या सहकार्याने नवे सरकार सत्तेवर आले. मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथविधी घेतल्यानंतर आता पुढील घडामोडीना वेग आला आहे. पण या बंडखोरीचे समर्थन करणा-या सोलापुरात मनीष काळजेंना निष्ठेचे फळ मिळणार का, याबाबत चर्चा होत आहे. Will Manish Kalje get the fruit of loyalty? Solapur Corporation in touch with Eknath Shinde since 2012
शिवसेनेच्या बंडाचे पडसाद राज्यासह सोलापुरात देखील उमटले. सोलापूर शहर जिल्ह्यातील आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी ‘मातोश्री’वर निष्ठा सांगत उध्दव ठाकरे यांना पाठबळ दिले मात्र एकनाथ शिंदे यांचे समर्थक मनीष काळजे यांनी बंडखोरीचे समर्थन केले. शिंदे यांची मागणी योग्य असल्याचे सांगत एकनाथ शिंदे यांच्या प्रति एकनिष्ठ राहिले. आता एकनाथ शिंदे यांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडली आहे. परिणामी काळजे यांना एकनाथाच्या निष्ठेचे फळ महामंडाळाच्या माध्यमातून पडणार असल्याची चर्चा आहे.
राज्यात गेल्या दहा बारा दिवसांपासून सत्ताबदलाचे वातावरण होते. एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत शिवसेना फोडली होती. शिंदे यांना शिवसेनेच्या ४० ते ४५ आमदारांचे पाठबळ होते. त्यामुळे राज्यात भाजप आणि एकनाथ शिंदे गटाची सत्ता येणार, असे राजकीय वातावरण होते. तर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री होतील, असा कयास बांधला जात होता.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
https://www.facebook.com/109399567404448/posts/572430274434706/
मात्र गुरुवारी झालेल्या राजकीय घडामोडीनंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. भाजपाची सत्ता येऊन देखील भाजपा गोटात शांतता होती. इकडे एकनाथ शिंदे यांचे एकमेव कट्टर समर्थक काळजे यांनी ढोलताशाच्या गजरात पेढे वाटत जल्लोष केला, गुलालाची मुक्त हस्ते उधळण केली. वास्तविक पाहता काळजे हे २०१२ पासून एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आले. शिंदे यांची कार्यपध्दत. सर्व घटकपक्षांना सोबत घेऊन जाण्याची वृत्ती आणि सामान्य नागरिकांना न्याय देण्यासाठी असलेली धडपड पाहून शिंदे यांच्या जवळ गेले.
२०१३ मध्ये एकनाथ शिंदे सोलापुरात आले असता अपंगा मुलांचा विषय घेऊन त्यांना भेटले. त्यांनी तात्काळ विषय मार्गी लावल्यामुळे त्यांच्याकडे जास्त जवळ गेले. शिवसेनेच्या शाखा प्रमुखापासून त्यांची राजकारणाची सुरुवात झाली.
उपजिल्हाप्रमुख ते युवासेनेच्या जिल्हा प्रमुखपदापर्यंत धुरा योग्यरित्या पार पाडली. एकनाथ शिंदे नगरविकास मंत्री झाल्यानंतर सोलापूरच्या अनेक प्रश्न शासनदरबारी मांडत शिंदे यांच्या माध्यमातून सोडवले. सोलापूर महानगर पालिकेतील स्थायी समितीचा वाद असो की विरोधीपक्ष निवडीचा विषय असो. एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून प्रश्न सोडवले. त्यामुळे ते एकनाथ शिंदे यांच्या जवळचे झाले. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेससमवेत आघाडी नको म्हणत शिंदेंनी वेगळी वाट धरली. त्यांना राज्यातून आणि शिवसेनेतून विरोध झाला.
सोलापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये देखील शिंदे यांच्यावर टीका झाली. शिंदे यांचे समर्थक म्हणून त्यांचे युवासेनेचे जिल्हा प्रमुख पद काढण्यापर्यंत विरोधकांची मजल गेली मात्र आपण शिंदे यांची साथ सोडली नाही. आता शिंदे राज्याचे मुख्यमंत्री झाले आहेत मुख्यमंत्रीपदी शिंदे विराजमान झाल्यानंतर आपण केलेल्या जल्लोषाची दखल शिंदे यांनी घेतली आहे. मुख्यमंत्र्यांनी थेट फोन करून आपल्या एकनिष्टेचे फळ नक्की मिळणार असल्याचे मनीष काळजे यांनी सांगितले.
“राज्यात अडीच वर्ष महाघाडीची सत्ता होती. शिवसेनेचा मुख्यमंत्री असताना शहरातील पदाधिकाऱ्यांनी शहर विकासाठी काही केले नाही. आता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आहेत. शहरात आणि जिल्हात शिंदे गट वाढवण्यासाठी प्रयत्न करणार आहे.”
– मनीष काळजे (एकनाथ शिंदे समर्थक)
https://www.facebook.com/109399567404448/posts/572888087722258/