● अधिवेशनातही ‘काय झाडी,काय डोंगार,काय हाटील’ चा संवाद
मुंबई : राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदी निवड झाली आहे. राहुल नार्वेकर यांनी बहुमताचा आकडा पार केला आहे. राहुल नार्वेकर यांनी 164 मतं मिळाली आहेत. त्यानंतर उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी त्यांच्या नावाची घोषणा केली. दरम्यान, महाविकास आघाडीच्या राजन साळवींना 107 मतं मिळाली. 3 आमदार हे तटस्थ होते. समाजवादी पक्ष आणि एमआयएम पक्षांनी या निवडणुकीत तटस्थ भूमिका घेतली. Praniti Shinde, along with seven NCP MLAs, Babanrao Shinde absent from the convention
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वाधिक सात आमदार आज सभागृहात नव्हते. राष्ट्रावादीचे दोन आमदार नवाब मलिक आणि अनिल देशमुख हे कोठडीत असल्याने ते आज उपस्थित राहू शकले नाहीत. तर आमदार निलेश लंके यांच्यासह राष्ट्रवादीचे पाच आमदारही गैरहजर होते.
मतदान सुरू असताना शिवसेनेचे बंडखोर आमदार शहाजीबापू पाटील यांची मतदानाची वेळ येताच,विरोधी बाकावरील सदस्यांनी एका सूरात ‘काय झाडी,काय डोंगार,काय हाटील’असा संवाल झाला. यामुळेच सभागृहात एकच हशा पिकला.
राष्ट्रवादीचे सदस्य दिलीप मोहिते आणि अण्णा बनसोडे उशीरा आल्याने त्यांना मतदान प्रक्रियेत भाग घेता आला नाही.तर कॉग्रेस आणि राष्ट्रवादीचे १० सदस्य गैरहजर होते.अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिंदे-फडणवीस सरकारने बाजी मारली असली तरी उद्या होणारी बहुमत चाचणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
https://www.facebook.com/109399567404448/posts/573955020948898/
माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या मातोश्रींचे निधन झाल्याने ते गैरहजर होते. राष्ट्रवादीचे सदस्य बबनराव शिंदे, निलेश लंके, तर भाजपचे लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक आजारी असल्याने मतदान प्रक्रियेत भाग घेवू शकले नाहीत. कॉग्रेसच्या प्रणिती शिंदे आणि एमआयएमचे मुफ्ती इस्माईल हे गैरहजर होते.
काँग्रेसचे आमदार जितेश अंतापूरकर यांचा आज विवाह होता त्यामुळे तेही गैरहजर होते. शिंदे गटात असलेले अपक्ष आमदार बच्चू कडू यांच्यासह अपक्ष आमदार आणि बहुजन विकास आघाडीच्या सदस्यांनी नार्वेकर यांच्या बाजूने मतदान केले.
》 राष्ट्रवादीचे 7 आमदार अधिवेशनात गैरहजर
आज विधानसभा अध्यक्षाची निवड करण्यात आली. यावेळी मात्र राष्ट्रवादीचे सात आमदार अधिवेशनाला हजर नव्हते. राष्ट्रवादीचे माजी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या मातोश्रींचे निधन झाल्याने ते येऊ शकले नाहीत. निलेश लंके हे आजारी असल्याने शिरूरमध्ये एका रुग्णालयात उपचार घेत असल्याचे सांगण्यात आले. मात्र बाकीचे आमदार का आले नाहीत हे अजून कळालं नाही.
》 विधानसभा अध्यक्षपदासाठी कुणी मतदान केलं नाही?
– मुक्ता टिळक, भाजप
– लक्ष्मण जगताप, भाजप
– प्रणिती शिंदे, काँग्रेस
– जितेश अंतापूरकर, काँग्रेस
* राष्ट्रवादी
– नवाब मलिक, अनिल देशमुख, निलेश लंके, दिलीप मोहिते,
दत्तात्रेय भरणे, अण्णा बनसोडे, बबनदादा शिंदे
* एमआयएम – मुफ्ती इस्माईल.
https://www.facebook.com/109399567404448/posts/573940210950379/