पुणे : ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी राज्यपालांवर नाराजी व्यक्त केली आहे. मी पण वेगवेगळ्या शपथा घेतल्या. पण कोणत्याही राज्यपालांनी माझ्या तोंडात पेढा भरवला नाही, कधीही फुलांचा गुच्छ दिला नाही, असं म्हणत पवार यांनी नाव न घेता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी टोला लगावला आहे. शिवसेना विरुद्ध मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असा सामना राजकीय वर्तुळात रंगला आहे. No governor has paid me, the new list will be approved by the governor immediately – Sharad Pawar
बारा जणांच्या आमदारांच्या नियुक्तींचा वाद अजूनही प्रलंबित आहे. महाविकास आघाडी सरकार कोसळले तरी या नियुक्ती कधी होतात याची उत्सुकता सगळ्यांनाच लागली आहे. त्यावर आमची बारा जणांची आमदारकीसाठीची यादी राज्यपालांनी मंजूर केली नाही. पण आता नव्या सरकारकडून यादी दिली जाईल आणि ती राज्यपाल मंजूर करतील.
आघाडी सरकारने राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांची नावे मंत्रीमंडळाचा प्रस्ताव करुन पाठवला होता. मुळात मंत्रीमंडळाने दिलेल्या प्रस्तावाला राज्यपालांनी मान्यता देणे हे बंधनकारक असते. मात्र जवळपास अडीच वर्ष त्यांनी तो प्रस्ताव तसाच ठेवला व कोणताही निर्णय घेतला नाही, असे शरद पवार म्हणाले. राज्यपालांचा हा निर्णय लोकशाहीला कितपत योग्य आहे याची चर्चा करायची गरज नाही, लोकांना हे सर्व ठाऊक आहे असेही शरद पवार यांनी राज्यपालांच्या एकंदरीत कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.
राज्यपाल पदावर येताना ते निरपेक्ष पद्धतीनं काम करण्याची शपथ घेतात. आताचे राज्यपाल निरपेक्ष पद्धतीच्या कामाची नवी व्याख्या देशासमोर ठेवतील. मी पदग्रहणाच्या अनेक शपथा पाहिल्या किंवा स्वतःही अनेक शपथा घेतल्या. पण राज्यपालांनी पेढा भरवल्याचे मी कधी पाहिले नाही किंवा मी स्वतःही कधी पेढा खाल्ला नाही, अशी टीका राज्यपालांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत केली.
आपण १९६७ पासून शपथा पाहिल्या आहेत. १९७२ ते १९९० पर्यंत मीसुद्धा शपथा घेतल्या, परंतु कुठल्याही राज्यपालांनी मला असा पेढा भरवला नाही,असे विधान शरद पवार यांनी करत नाव न घेता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना बारीकसा पण करकचून चिमटा काढलाय.
https://www.facebook.com/109399567404448/posts/573774427633624/
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
https://www.facebook.com/109399567404448/posts/573786514299082/
विधिमंडळात शिवसेनेच्या बंडखोर आमदारांची जी संख्या आहे ते पाहता न्यायालयाचा निकाल काय येईल हे सांगता येत नाही. सभागृहात गेल्यावर हे सगळे विचारवंत काय करतील हे सांगता येत नाही. काही जण म्हणतात की सभागृहात गेल्यावर त्यांचे मतपरिवर्तन होईल. पण मला माहित नाही. सर्वोच्च न्यायालयाची कालची कमेंट गंभीर आहे. गृह मंत्रालयाला जाब विचारण्यात आल्याचे शरद पवार निदर्शनास आणून दिले.
मागीलवेळी मुख्यमंत्री झाल्यावर फडणवीसांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे अनेक नेते फोडले होते. या प्रश्नावर बोलताना शरद पवार म्हणाले की, ‘फडणवीस नव्या पद्धतीने लोकप्रतिनिधींना स्वतःकडे घेतायत. याबाबत आम्हाला काळजी घ्यावी लागेल.’ आमच्यावर हाय कमांडच्या नावाने त्यावेळेस भाजपकडून जी टिका व्हायची. तीच आता भाजपवर होतं आहे. म्हणजे आमची कार्यपद्धती योग्य होती हे यावरून सिद्ध होतंय, असेही शरद पवार म्हणाले.
राज्यात शिवसेना विरुद्ध शिंदेंसेना वाद सुरू आहे. उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना व्हीप दिला आहे. त्यामुळे भरपूर आमदार अडचणीत येऊ शकतात. त्यावर विविध नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. पक्षाचा व्हीप हा आमदारांना पाळावा लागतो. पक्ष म्हणजे विधिमंडळ पक्ष आणि पक्ष संघटना आहेत.
□ शपथविधीत राज्यपालांच्या हरकतीतही राजकारण
राज्यात नव्याने आलेल्या सरकारच्या शपथविधीची आठवण करून देताना शरद पवार यांनी सांगितले की, मी टीव्हीवर पाहिले. मी अमुक अमुक बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे यांना स्मरुन वगैरे वगैरे ते बोलले, ही शपथ दिली कुणी तर राज्यपाल यांनी असे पवार म्हणाले.
ज्यावेळी आमचे सरकार आले त्यावेळी मी पहिल्या लाईनमध्ये बसलो होतो, आमच्या एका सदस्याने बाबासाहेब आंबेडकर व इतरांना स्मरण करून शपथेला सुरुवात केली तर त्यांना याच राज्यपालांनी परत शपथ घ्यायला लावली आणि माझ्या नावाचा उल्लेखही केला. मात्र कालच्या शपथेवेळी राज्यपाल कोश्यारी यांनी हरकत घेतली नाही याबाबत शरद पवार यांनी आश्चर्य व्यक्त केले.
https://www.facebook.com/109399567404448/posts/573784707632596/