मुंबई : शिवसेनेतून माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटलांची हक्कालपट्टी करण्यात आल्याचे वृत्त सामनामधून प्रसिध्द झाले होते. त्यानंतर शिवसेनेने प्रसिद्धीपत्रक काढून ही बातमी अनावधानाने छापली असल्याचा खुलासा केला. आता उध्दव ठाकरेंनी या सर्व प्रकारानंतर आढळराव पाटलांना फोन केला. तसेच झाल्या प्रकाराबद्दल हळहळ व्यक्त केली. पण “राज्यभर माझी बदनामी झाली त्याचं काय?” अशी प्रतिक्रिया आढळराव यांनी दिली. Uddhav Thackeray calls Adhalrao after false news of expulsion, Shivajirao Adhalrao gives warning
आज शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामन्यातून शिवसेनेचे शिरूर लोकसभा मतदारसंघातील माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याचं वृत्त प्रसिद्ध झालं आणि राज्यात एकच खळबळ माजली आहे. शिवसेनेने प्रसिद्धीपत्रक काढून ही बातमी अनावधानाने छापली असल्याचा खुलासा केला आहे. त्यांनी नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शुभेच्छा दिल्या या कारणावरून त्यांना काढून टाकल्याची माहिती होती. या घटनेनंतर माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन नाराजी व्यक्त केली होती.
या सर्व प्रकारानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवाजीराव आढळराव पाटील यांना फोन करून झाल्या प्रकाराबद्दल हळहळ व्यक्त केली आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
https://www.facebook.com/109399567404448/posts/574061317604935/
याबाबत शिवाजीराव आढळराव पाटील म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला आणि झाल्या प्रकाराबद्दल हळहळ व्यक्त केली आहे पण राज्यभर माझी बदनामी झाली त्याचं काय?” अशी सावध प्रतिक्रिया आढळराव यांनी दिली आहे. दरम्यान आज दिवसभर मी विचार करणार आहे. झाल्या प्रकाराबद्दल उद्धव ठाकरे यांना भेटणार आहे. त्यानंतर पुढचा निर्णय ठरवला जाईल अशा सूचक इशाराही त्यांनी दिला आहे.
म्हणाले की, आज सकाळपासून अनेकांचे फोन आले. सामना पेपर आणि न्यूज चॅनेलवर बातम्या पाहिल्या, त्या खऱ्या आहेत का? मला आधी वाटलं कोणीतरी माझी चेष्टा करतंय. मात्र, मी स्वतः सामना पेपर वाचला आणि मलाच धक्का बसला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज राष्ट्रवादीच्या विरोधात बोलत आहेत. मी कित्येक वर्षे राष्ट्रवादीच्या उमेदवाराविरूद्ध लढलो. गेल्या अडीच वर्षापासून मी त्यांना अंगावर घेत आलोय आता फक्त गोळ्या मारायच्याच बाकी आहेत.
शरद पवारांनी मला लोकसभा न लढण्यासाठी ऑफर दिली होती पण मी बाळासाहेबांच्या विचारावर ठाम राहिलो. आज माझी काही चुकी नसताना काही कारण नसताना मला पक्षातून काढून टाकण्यात आलंय. यासाठी काहीतरी कारण तरी द्यायचं.
पक्षातून हकालपट्टी झाल्यापासून मला कोणत्याही पक्षाचा फोन आलेला नाही. शिवसेनेत आल्यापासून मी भाजपमध्ये जाणार, राष्ट्रवादीत जाणार अशी चर्चा आहे. पण, त्यात आत्तापर्यंत तथ्य नव्हतं, यापुढे ही नसेल, असे सांगून त्यांनी आपण शिवसेनेतच राहणार असल्याचे स्पष्ट केले.
https://www.facebook.com/109399567404448/posts/573955020948898/