मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आली आहे. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ही घोषणा केली आहे. अजित पवार यांची निवड होताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पवार यांचे अभिनंदन केले. तसेच पवार यांची भाषणशैली उत्तम आहे, याची महाराष्ट्राला माहिती आहे, असे शिंदे यांनी आपल्या अभिनंदनाच्या भाषणामध्ये म्हटले आहे. Election of Ajit Pawar as Leader of Opposition, NCP as Opposition Party after independence
विरोधी पक्षनेते पदी अजित पवार यांची निवड झाली आहे. त्यानंतर अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. “माझ्या कार्यकाळात एकही कायदा चर्चेशिवाय मंजूर होणार नाही, असा विश्वास मी राज्यातील जनतेला देतो. यासाठी मी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना सहकार्य करण्याचं आवाहन करतो. यापूर्वी अनेक विरोधी पक्षनेत्यांनी सभागृहात जनतेचे मुद्दे उपस्थित केले. तशीच चर्चा घडवण्याचं काम आपण करू,” असे पवार म्हणाले.
शासनाकडून ज्या त्रुटी राहतील त्यावर बोट ठेवण्याचं काम अजित पवार करतील. त्यांचा अनुभव त्यांच्या उपयोगी पडेल. त्यांना अनेक खात्यांचा अनुभव आहे. ते अर्थमंत्री होते, प्रत्येक खात्यातील बारकावे समजण्यात त्यांना सुलभ होईल. अत्यंत समर्थपणे ते विरोधी पक्षाची बाजू मांडतील. योग्य मुद्यांना सहकार्यही होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
विरोधी पक्षनेतेपदी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची निवड करण्यात आली आहे. राज्यातील सत्तांतरानंतर विरोधी बाकावर राष्ट्रवादी काँग्रेस हा मोठा पक्ष झाला आहे. यामुळे विरोधी पक्षनेता म्हणून कोणाची निवड करण्यात येईल याकडे सर्वांचे लक्ष लागून होते.
https://www.facebook.com/109399567404448/posts/574747210869679/
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
https://www.facebook.com/109399567404448/posts/574632507547816/
विरोधी पक्षनेता पदाच्या शर्यंतीत अजित पवार यांच्याबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे नाव आघाडीवर होते. आज अखेरीस अजित पवार यांच्याच नावाला पसंती देण्यात आली. विश्वासदर्शक ठराव मतदान झाल्यानंतर अध्यक्षांना अजित पवार हेच विरोधी पक्षेनेते असतील असे पत्र देण्यात आले होते. मात्र त्याची घोषणा मुख्यमंत्री शिंदे यांच्या भाषणानंतर करण्यात आली.
विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी अजित पवार यांचे अभिनंदन केले.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अजित पवार यांनी सातत्याने बारामतीचे आमदार म्हणून काम केले. त्यांनी बारामतीचे विकास मॉडेल विकसित केले आहे. अजित पवार यांनी जेव्हा राजकारणात प्रवेश केला, तेव्हा अजित पवार यांच्यासमोर अनेक दिग्गज नेते होते. मात्र शरद पवार यांच्यानंतर राष्ट्रवादीचे सर्वमान्य नेतृत्व होण्याची किमया केली, अशी भावना व्यक्त केली.
□ अजित पवारांनी मानले आभार
अजित पवार यांनी आपण विरोधासाठी विरोध करणार नाही, तर सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सभागृहात मांडू अशा भावना व्यक्त केल्या. “महाराष्ट्राच्या विधानसभेला उज्ज्वल परंपरा आहे. त्यात विरोधीपक्ष नेत्याचीही परंपरा आहे. आमचा गट १९९० च्या बॅचचा होता. त्यापूर्वी १९८५ मध्ये बाळासाहेब थोरातांचा गट निवडून आला होता. पूर्ण बहुमत मिळून भाजप-शिंदे गट सत्तेत आले आहेत. लोकशाहीत ज्याप्रमाणे मुख्यमंत्री – उपमुख्यमंत्री आणि विधानसभा अध्यक्षपद महत्वाचे असते, त्याप्रमाणेच विरोधीपक्ष नेतेपदही महत्त्वाचे असते. आपण आजवर अनेक नेत्यांना हे पद भूषवताना पाहिले आहे,`असे सांगत अजित पवार यांनी सर्वांचे आभार मानले.
□ ‘ईडीमुळे (एकनाथ, देवेंद्र) सरकार स्थापन झाले’
विधानसभेत शिंदे सरकारने 164 मते घेऊन बहुमताचा आकडा पार केला. शिंदे सरकार हे ईडीच्या मदतीने आले असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. मतदान सुरू असताना ईडी ईडी अशा घोषणा विरोधकांकडून दिल्या जात होत्या. यावेळी देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांना टोला लगावला आहे. हो महाराष्ट्रात ईडीच्याच मदतीनं सरकार स्थापन केलंय. पण यामध्ये ‘E’ म्हणजे, Eknath Shinde आणि ‘D’ म्हणजे, Devendra Fadnavis. असे फडणवीस म्हणाले.
https://www.facebook.com/109399567404448/posts/574525304225203/