अक्कलकोट : श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या ३५ वा वर्धापनदिन व गुरूपौर्णिमा महोत्सवाचा शुभारंभ न्यासाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली रविवार दि.३ जुलै रोजी सायं. ६.३० वाजता श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळातील प्रांगणात सुरूवात झाली. राधा मंगेशकर यांच्या नक्षत्राचे देणे या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित होते. Akkalkot Swami Samarth Annachhatra Mandal’s anniversary, Gurupournima festival started
महेश गावसकर -चार्टर्ड अकाऊंटंट पुणे, अँड. नितीन हबीब – जेष्ठ विधिज्ञ सोलापूर, बाळासाहेब दाभेकर –अध्यक्ष भरत मित्र मंडळ पुणे, प.पू.श्री मंदार पुजारी – मुख्य पुजारी श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान अक्कलकोट, महेश इंगळे – अध्यक्ष श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान अक्कलकोट, न्यासाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले, वे.शा.सं.श्री अण्णू महाराज –पुजारी श्री स्वामी समर्थ समाधी माठ अक्कलकोट, अँड. पृथ्वीराज देशमुख, बाळासाहेब मोरे, आदी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करुन पहिल्या पुष्पाचे उद्घाटन करण्यात आले.
दरम्यान श्रींची प्रतिमा व स्वर्गीय लतादीदी मंगेशकर यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर थोर संगीत दिग्दर्शक व गायक पद्मश्री पंडीतजी ह्रदयनाथ मंगेशकर यांच्या मार्गदर्शनाखाली राधा मंगेशकर आणि सहकारी मुंबई यांचा ‘नक्षत्रांचे देणे, कार्यक्रम सादर करण्यात आला. यांच्यासमवेत राजेंद्र दुरकर, विशाल गुंडतवार, ऋतुराज कोरे, शैलेश देशपांडे, यश मंडारे, विवेक परांजपे यांनी साथ दिली. या सर्व कलाकारांचा न्यासाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
उद्घाटन सोहळ्यास उपस्थित मान्यवरांचा सत्कार अन्नछत्र मंडळाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या हस्ते श्रींची प्रतिमा कृपावस्त्र देवून करण्यात आला. न्यासाचे मुख्य पुरोहित अप्पू पुजारी यांच्या हस्ते यथसांग मंत्र पठणाने श्री स्वामी समर्थांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
https://www.facebook.com/109399567404448/posts/574525304225203/
राधा मंगेशकर यांच्या नक्षत्राचे देणे या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयदेव जयदेव जय शिवराया, जय शिवराया, विश्वाचा..! स्वामी माझा राम रे..!, एैरणीच्या देवा..,या या अनन शरणं आर्या ताराया, ही हिंदुशक्ती शंभु तेजा हे प्रुभो शिवाजी राजा, म्यानातून उसळती तलवारीची पात, वेडात दौडले मराठे वीर सात, ने मजसी परत मातृभुमीला सागरा प्राणतळमला, निसर्ग राजा..! आदी मराठमोळ्या गाण्यांनी उपस्थित श्रोत्यांचे मने जिंकली.
कोविड-१९ नंतर २ वर्षांनी आयोजित मंडळाच्या ३५ वा वर्धापनदिन व गुरूपौर्णिमा महोत्सवास श्रोतेगणांची गर्दी झाली होती. यावेळी न्यासाचे विश्वस्त अलकाताई भोसले, अर्पिताराजे भोसले, रुपाली शहा, न्यासाचे उपाध्यक्ष अभय खोबरे, पुण्याचे राजेंद्र पंडित, बाळासाहेब जाधव, शिरीष मावळे, ऋषिकेश बालगुडे, दिलीप ठोंबरे, अनिल येनपुरे, राजाभाऊ लवाटे, रामभाऊ जाधव, भाऊ कापसे, या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचलन श्वेता हुल्ले यांनी केले. तर न्यासाचे सचिव शामराव मोरे यांनी आभार मानले.
□ लतादीदींची आठवण
अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांना मंडळाच्या वर्धापनदिन व गुरूपौर्णिमा महोत्सवाचा शानदार शुभारंभास दरवर्षी कै.गान सम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांनी भ्रमणध्वनीव्दारे उपस्थित श्रोत्यांना संदेश व शुभेच्छा देत होत्या. या आठवणीला श्रोत्यांनी उजाळा दिल्या.
□ गुणीजन गौरव :
यामध्ये विशेष गौरव पुरस्कार तहसीलदार बाळासाहेब सिरसट, उत्तर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जितेंद्र कोळी, उप अधीक्षक भूमी अभिलेख अक्कलकोट कार्यालयातील सहाय्यक अधीक्षक व्ही.एस.अवसेकर यांचा न्यासाच्या वतीने विशेष गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
अक्कलकोट तालुक्यातील इयत्ता १० वी व १२ वी परीक्षेत उत्तम गुण मिळवलेल्या ११ गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव न्यासाच्या वतीने करण्यात आला. आज सोमवारी (दि.४ जुलै) सायंकाळी ७ वाजता ‘हास्य संजे’ कन्नड विनोदी कार्यक्रम सादरकर्ते -गंगावती प्रणेश आणि सहकारी कर्नाटक यांचा कार्यक्रम होणार आहे.
https://www.facebook.com/109399567404448/posts/574061317604935/