सोलापूर – काटगाव तालुका तुळजापूर येथे उस्मानाबाद जिल्ह्याला धाराशिव म्हणायचे नाही. या कारणावरून दोन गटात कोयता, लोखंडी गज, काठी आणि दगडाने केलेल्या मारहाणीत ५ जण जखमी झाले. ही घटना शनिवारी (ता. 2) रात्रीच्या सुमारास घडली. सर्व जखमींना काडगाव येथे प्राथमिक उपचार करून सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. Five injured in Osmanabad attack dharashiv
अमर सिद्धेश्वर वर्दे (वय 28), अविनाश वर्दे (वय २६) बसवेश्वर बाबुराव पांचाळ (वय ३० सर्व रा.काटगाव अशी पहिल्या गटातील जखमींची नावे आहेत. त्यांना हाफिज मुजावर, तमीज मुजावर आणि अन्य २५ लोकांनी कोयता, लोखंडी गज आणि दगडाने मारहाण केली.
तर दुसऱ्या गटात हाफिज कमीज मुजावर (वय ६५) आणि त्यांचा मुलगा तमीज मुजावर (वय २६) असे दोघे जखमी झाले. त्यांना दुकान बंद करावे म्हणून अमर वर्दे बसू सुतार व इतर २६ जणांनी दगड आणि लाथा बुक्क्याने मारहाण केली अशी नोंद सिव्हील पोलीस चौकीस झाली आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
https://www.facebook.com/109399567404448/posts/574176307593436/
□ दमाणी नगर येथे चाकूने मारहाण एक जखमी
दमाणी नगर परिसरातील लक्ष्मी पेठ येथे पूर्वीच्या भांडणावरून चाकू आणि लाथा बुक्क्याने केलेल्या मारहाणीत सिद्धेश्वर सरबळे (वय ३४) हे जखमी झाले. ही घटना काल शनिवारी रात्रीच्या सुमारास घडली. त्यांना आकीब अत्तार, आयुब शेख आणि इतर ४ जणांनी मारहाण केली, अशी नोंद फौजदार चावडी पोलिसात झाली आहे .
□ अल्पवयीन मुलीवर अत्याचार; विधी संघर्ष बालका विरुद्ध गुन्हा
सोलापूर – एका अल्पवयीन मुलीला तुझ्यासोबत प्रेम करतो असे म्हणून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना नईजिंदगी परिसरात घडली. या प्रकरणात एमआयडीसीच्या पोलिसांनी एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलाविरुद्ध बलात्कार आणि पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला. ही घटना 30 जूनच्या सायंकाळच्या सुमारास मड्डीवस्ती परिसरात घडल्याची नोंद पोलिसात झाली. सहायक निरीक्षक चौधरी पुढील तपास करीत आहेत.
□ विठ्ठल सहकारी साखर करखान्याच्या निवडणुकीसाठी २०५ पोलिसांचा बंदोबस्त
पंढरपूर : विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या प्रचाराच्या तोफा आज थंडावला आहेत. ५ जुलै रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत मतदान असणार आहे. त्यासाठी २०५ पोलिसांचा बंदोबस्त दिल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी दिली.
विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूकीत पहिल्यापासून चुरस निर्माण झाली आहे. विठ्ठलचे चेअरमन भगीरथ भालके, सहकार शिरोमणीचे कल्याणराव काळे, संचालक युवराज पाटील आणि धाराशिव कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांच्यात आरोपा प्रत्यारोपाने ही निवडणूक गाजली.
त्यामुळे बूथवर कोणत्याही अनुसूचित प्रचार घडू नये यासाठी पोलिसांनी मोठा बंदोबस्त दिला आहे. ७४ मतदान केंद्रावर १०५ बिथ आहेत. प्रत्येक बूथवर २ पोलीस कर्मचारी असणार आहेत. एकूण २०५ पोलीस आणि होमगार्डचा बंदोबस्त असणार आहे. तसेच संवेदनशील मतदान केंद्रावर आधीचा बंदोबस्त दिला आहे.
https://www.facebook.com/109399567404448/posts/574061317604935/