मुंबई : फिल्ममेकर लीणा मणिकेलाई यांनी आपल्या येणाऱ्या चित्रपटाचे पोस्टर लाँच केले आहे. यामध्ये हिंदू श्रद्धेचे प्रतीक असलेल्या काली देवीच्या हातात सिगारेट दिसत आहे. यातूनच मोठा वाद सध्या उद्भवला आहे. लीणा यांच्यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे. नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. त्यांच्या अटकेची मागणी सुद्धा होत आहे.
अभिनेत्री अनुष्का शर्माच्या बुलबुलपासून ते सैफ अली खानच्या तांडवपर्यंतच्या अनेक चित्रपट आणि वेब सिरीजवर हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप होत आहेत. याच लिस्टमध्ये आता ‘काली’ या माहितीपटाचा समावेश झाला आहे.धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी लिना यांच्याविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. लिना मणीमेकल यांना अटक करा अशा अर्थाचा ‘#ArrestLeenaManimekal’ हा हॅटशॅग अनेकांनी वापरलाय.
भारतीय चित्रपट निर्मात्या असणाऱ्या लिना मणीमेकल यांच्या या माहितीपटावर जोरदार टीका होताना दिसत आहे. कालीमातेचा अपमान या माहितीपटाच्या पोस्टरमधून करण्यात आला दावा अनेकजण करीत आहेत. लिना यांनी सोशल मीडियावर नुकताच त्यांच्या काली या माहितीपटाचं पोस्टर शेअर केला. राइम्स ऑफ कॅनडा नावाच्या कार्यक्रमादरम्यान अगा खान संग्रहालयामध्ये हे पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं.
लीना मणिमेकलाई यांनी २ जुलै रोजी ‘काली’ या माहितीपटाचे पोस्टर प्रदर्शित केले होते. या चित्रपटात माता कालीला सिगारेट ओढताना दाखवलं असून तिच्या एका हातात त्रिशूल आणि दुसऱ्या हातात एलजीबीटी समुदायाचा रंगीत ध्वज दाखवण्यात आला आहे. त्यामुळे या पोस्टरवरून मोठा वाद निर्माण झाला आहे.
Super thrilled to share the launch of my recent film – today at @AgaKhanMuseum as part of its “Rhythms of Canada”
Link: https://t.co/RAQimMt7LnI made this performance doc as a cohort of https://t.co/D5ywx1Y7Wu@YorkuAMPD @TorontoMet @YorkUFGS
Feeling pumped with my CREW❤️ pic.twitter.com/L8LDDnctC9
— Leena Manimekalai (@LeenaManimekali) July 2, 2022
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
https://www.facebook.com/109399567404448/posts/575201280824272/
हे पोस्टर पाहून अनेकांनी सोशल मीडियावरुन आपला संताप व्यक्त केलाय. हिंदू देवतेच्या अवतारात एक महिला या पोस्टरवर दिसत आहे. मात्र ही महिला सिगारेट ओढताना दिसत आहे. या पोस्टरवरील या महिलेच्या मागील बाजूस समलैंगिकतेसंदर्भातील सप्तरंगी झेंडाही दिसत आहे.
हे पोस्टर पाहून अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. अनेकांना लिना यांच्याविरोधात पोस्ट केल्या आहेत. एका युझरने, “हिंदू भक्तांच्या भावना दुखावण्याचा हा मुद्दाम केलेला प्रयत्न आहे. व्यक्त होण्याचं स्वातंत्र्य याचा अर्थ असा नाही की सर्जनशीलतेच्या नावाखाली तुम्ही काहीही कराल. हे डिजीटल माध्यमांवरही कसं प्रकाशित होऊ दिलं?, हे काढून टाका”, असं म्हटलंय.
अन्य एकाने, “मी लिना मणीमेकल यांना विनंती करतो की हे पोस्टर काढून टाकावं, यामुळे कोट्यांवधी हिंदूंच्या भावना दुखावल्या जात आहेत. समाजातील मोठ्या घटकाच्या भावनांचा सन्मान आगा खान संग्रहालयाकडून दाखवण्यात यावा,” असं म्हटलंय.
“हे पोस्टर पाहून धक्का बसला आहे. एम. एफ हुसैन यांच्यापासून तुमच्यापर्यंत सर्वांनाच हिंदू देवी – देवतांचा सन्मान न करण्यातून आनंद मिळतो आणि हाच तुमचा उद्देश असतो. हे आक्षेपार्ह आहे कृपया हे काढून टाकावे. हे मानसिक दृष्ट्या त्रास देणारेही आहे,” असं अन्य एकाने म्हटलंय. काहींनी थेट गृहमंत्र्यांना टॅग केलंय.
या वादग्रस्त पोस्टरवरून झालेल्या गदारोळानंतर लीना यांनी आणखी एक ट्वीट केले आहे, ज्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. दक्षिणात्य भाषेत असलेल्या आपल्या या ट्वीटमध्ये त्यांनी लिहिले की, ‘माझ्याकडे गमावण्यासारखं काहीच नाहीये. मला एक असा आवाज बनायचंय जो कधीही कुणाला घाबरणार नाही. याची किंमत जर माझा जीव असेल तरी बेहत्तर..मी तो देईन.’ या आधी त्यांनी आपल्या या चित्रपटाबाबत सांगताना लिहिले होते की, ‘हा चित्रपट संध्याकाळच्या त्या घटनांभोवती फिरतो, जेव्हा तिला काली दिसते आणि ती टोरंटोच्या रस्त्यावर फिरते.’
https://www.facebook.com/109399567404448/posts/575153427495724/