वृत्तसंस्था : जपानचे माजी पंतप्रधान व भारताचे मित्र शिंजो आबे यांचे निधन झाले आहे. त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. ते नारा या शहरात एका कार्यक्रमात भाषण देत होते. तेव्हा त्यांच्यावर हल्लेखोराने गोळीबार केला. यात आबे जखमी झाले. त्यानंतर त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. यादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. जपानच्या सरकारी मीडियानं निधनाच्या बातमीला दुजोरा दिला आहे. Shinzo Abe death shooting: Former Japanese Prime Minister Shinzo Abe dies, Modi expresses grief in India
जपानची सरकारी वृत्तवाहिनी एनएचकेच्या वृत्तानुसार, जपानमधील नारा शहरातील एका कार्यक्रमात भाषण करत असताना शिंजो आबे यांच्यावर गोळीबार झाला. हल्लेखोराला अटक करण्यात आली आहे. या कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित असलेल्या पत्रकाराच्या माहितीनुसार, गोळीबारानंतर शिंजो आबे यांचं शरीर रक्तानं माखलं होतं. हल्लेखोरांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे.
जपानचे माजी पंतप्रधान व भारताचे मित्र शिंजो आबे यांचे निधन झाले आहे. त्यावर मोदींनी दु:ख व्यक्त केले. ‘माझ्या सर्वात प्रिय मित्रांपैकी एक शिन्झो आबे यांच्या दुःखद निधनाने मला धक्का बसला आहे आणि दुःख झाले आहे. तो एक प्रचंड जागतिक राजकारणी, एक उत्कृष्ट नेता आणि एक उल्लेखनीय प्रशासक होता. जपान आणि जगाला एक चांगले स्थान बनवण्यासाठी त्यांनी आपले जीवन समर्पित केले’, असं पंतप्रधान मोदींनी ट्विट केलं.
ते एक महान वैश्विक नेते, उल्लेखनीय प्रशासक होते. त्यांनी जपान आणि विश्वाला एक उत्तम स्थान मिळवून देण्यासाठी संपूर्ण आयुष्य समर्पित केले, अशा शब्दांत मोदी यांनी आबे यांना श्रद्धांजली वाहिली. तसेच उद्या म्हणजेच ९ जुलै रोजी देशात राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
As a mark of our deepest respect for former Prime Minister Abe Shinzo, a one day national mourning shall be observed on 9 July 2022.
— Narendra Modi (@narendramodi) July 8, 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, की ‘शिंजो आबे यांच्यासोबत माझा अनेक वर्षांपासूनचा स्नेह होता. गुजरातचा मुख्यमंत्री असल्यापासून माझा आणि त्यांचा परिचय होता. पंतप्रधान झाल्यानंतर आमची मैत्री पुढेही कायम राहिली. अर्थव्यवस्था आणि जागतिक घडामोडींविषयीच्या त्यांच्या दृष्टीकोनाने माझ्यावर कायमच प्रभाव राहिला. अलीकडेच जपान दौऱ्यावेळी शिंजो आबे यांची भेट घेण्याची, तसेच अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्याची मला संधी मिळाली होती. ती माझी अखेरची भेट ठरेल हे माझ्या ध्यानीमनीही नव्हते. त्यांच्या कुटुंबीयांप्रती आणि जपानी नागरिकांबद्दल मी सहवेदना व्यक्त करतो.’
शिंजो आबे यांचं टोपणनाव ‘द प्रिंस’ आहे. राजकीय पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातून शिंजो आबे यांचा जन्म झाला. माजी परराष्ट्र मंत्री शिंतारो आबे यांचे ते पुत्र आणि माजी पंतप्रधान नोबुसुके किशी यांचे ते नातू होय. 1993 ला ते पहिल्यांदा जपानच्या संसदेचे सदस्य म्हणून विजयी झाले. 2005 साली त्यांचा कॅबिनेटमध्ये समावेश झाला. त्यावेळी जुनिचिरो कोइझुमी हे पंतप्रधान होते.
2006 साली शिंजो आबे पहिल्यांदा जपानचे पंतप्रधान झाले. महायुद्धानंतर जपानमध्ये झालेल्या पंतप्रधानांमध्ये सर्वात तरुण पंतप्रधान म्हणून त्यांची नोंद झाली. 2006 ते 2007 असा एक वर्ष, नंतर 2012 ते 2020 पर्यंत ते पंतप्रधान झाले. शिंजो आबे हे जपानचे सर्वाधिक काळ पंतप्रधान राहिलेले नेते आहेत. 2020 मध्ये आरोग्याच्या कारणावरून त्यांनी पंतप्रधानपद सोडलं. त्यांच्यानंतर योशिहिदे सुगा यांनी जपानच्या पंतप्रधानपदाची धुरा हाती घेतली.
आबे यांच्या कार्यकाळात संरक्षण क्षेत्रावरच्या खर्चात जवळपास 13 टक्क्यांची वाढ झाली. त्यांनी संरक्षणविषयक अधिक लवचिक धोरणं तयार केली. सैन्यासाठी अत्याधुनिक आणि महागडे सैन्य हार्डवेअरसह F-35 लढाऊ विमानं खरेदी केली. जपानच्या प्रादेशिक क्षेपणास्त्र क्षमता वाढवण्यास सक्षम तंत्रज्ञानाचीही भर टाकली.
https://www.facebook.com/109399567404448/posts/577090363968697/