Wednesday, May 31, 2023
Surajya Digital
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
  • ब्लॉग
  • अर्थाअर्थ
  • शिवार
  • Techनिक
No Result
View All Result
Surajya Digital
No Result
View All Result

शिवसेनेचा निवडणूक चिन्ह टिकवण्यासाठी धावपळ, ‘धनुष्यबाण’ आमचाच : उध्दव ठाकरे

मुखपत्रातून  आता 'सन्माननीय बंडखोर' असा उल्लेख

Surajya Digital by Surajya Digital
July 8, 2022
in Hot News, महाराष्ट्र, राजकारण
0
शिवसेनेचा निवडणूक चिन्ह टिकवण्यासाठी धावपळ, ‘धनुष्यबाण’ आमचाच : उध्दव ठाकरे
0
SHARES
57
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

 

मुंबई : माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, ‘धनुष्यबाण हा आमचाच आहे तो आमच्यापासून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही’. यापूर्वी त्यांनी असे म्हटले होते की कोणतेही चिन्ह आले तरी ते घराघरापर्यंत घेऊन जा. या त्यांच्या विधानावर त्यांनी आज स्पष्टीकरण दिले. Rush to preserve Shiv Sena’s election symbol, ‘bow and arrow’ is ours: Uddhav Thackeray

एकनाथ शिंदेच्या बंडामुळे उध्दव ठाकरेंना सर्वच गमवावे लागत आहे. अगोदर मुख्यमंत्रीपद गेले आता पक्षावरही टांगती तलवार आली आहे. पण त्याआधीच शिवसेनेची ओळख असलेले निवडणूक चिन्ह धनुष्यबाण देखिल ठाकरेंच्या हातातून जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसे खुद्द उध्दव ठाकरेंनीच म्हटले आहे.

विधिमंडळात एकनाथ शिंदेच्या गटाला मान्यता दिल्यामुळे धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाकडे जाईल यावरून आता कायदेशीर लढाई होईलच यात शंका नाही. मात्र त्याआधीच उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी गाफील न राहता नव्या चिन्हाची तयारी ठेवावी आवाहन केले आहे. मुंबई आणि इतर महापालिकंच्या निवडणुकांना कमी वेळ उरला असून त्यावर लक्ष केद्रित करण्याचे आदेश उध्दव ठाकरेंनी दिले आहेत.

दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत आपली जाहीर भूमिका मांडली. धनुष्यबाण आमचाच आहे. तो आमच्यापासून कुणीही हिरावून घेऊ शकत नाही. असे ठाकरे यांनी यावेळी एकनाथ शिंदे गटाला ठणकावून सांगत शिवसेनेच्या चिन्हाबद्दल चर्चा सुरू असल्याचे म्हटले.

कायद्यानुसार धनुष्यबाण शिवसेनेपासून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. माणसं आहेत तोपर्यंत शिवसेना संपणार नाही. कट्टर शिवसैनिक आहेत तोपर्यंत पक्षाच्या भवितव्याला धोका नाही. शिवसेनेनं साध्या माणसाला मोठं केलं’. 15 ते 16 आमदार आमच्यासोबत आहेत. त्यांचे मला कौतुक आहे. अशी जिगरीची माणसं जिथं असतात तिथं विजय हमखास असतो. सगळे आमदार गेले, तरी पक्ष अस्तित्वात असतो. तुम्ही भ्रमाच्या भोपळ्यात अडकू नका.

विधिमंडळ पक्ष आणि राजकीय पक्ष वेगळा. शिवसैनिकांनी संभ्रम मनात ठेवू नये.माझा न्यायदेवतेवर विश्वास आहे. येत्या १२ तारखेला सुनावणीचा निकाल येईल तो शिवसेनेच्या भविष्याचा निकाल नसेल. पण या केसमुळे देशात लोकशाहीचं भविष्य किती काळ मजबूत राहणार आहे.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

 

आंबेडकरांच्या घटनेनुसार कारभार होणार आहे का हे सांगणारा हा निकाल असेल. आजपर्यंत गप्प असणारे तिकडे जाऊन बोलतायत. या लोकांना आजही उद्धव ठाकरेंबद्दल प्रेम आहे, आदित्यबद्दल आणि मातोश्रीबद्दल प्रेम आहे. खरंच धन्य झालो.

गेली 2-3 वर्षं विकृत भाषेत आमच्याविषयी बोलत होती, त्याच्याविरोधात कोणीही बोललं नाही.ज्यांनी टीका केली त्यांच्या मांडीला मांडी लावून बसत आहात. मग तुमचं हे प्रेम खरं आहे की खोटं हे जनतेला कळू द्या. धनुष्यबाण शिवसेनेपासून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही, असे उद्धव ठाकरेंनी शिंदे गटाला खडसावलं . अडीच वर्षांपूर्वी हेच केलं असतं, तर सन्मानाने झालं असतं. मला वादविवाद होऊ द्यायचा नाही.

 

माझ्याकडून मी शांतपणाने सांगतोय. मी सध्या प्रश्नांना उत्तरं देणार नाही. मी आजही म्हणतो हिंमत असेल तर पुन्हा निवडणुका घ्या. मध्यावधी निवडणूक व्हायला हवी. मी चुकलो असेल तर जनता मला घरी बसवेल. सामान्य लोकांना शिवसेनेनं मोठं केलं याचा मला अभिमान आहे. जे लोक मोठे झाले ते गेले. त्यांना जाऊ द्या. आजही अनेक जण शिवसेनेसोबत आहेत. कितीही आमदार जाऊ द्या पक्ष आपलाच राहील. पक्षसंघटन आणि विधिमंडळ हे वेगळं असतं.  राष्ट्रपतीच्या निवडणुकीत द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा द्यायचा की नाही हे खासदारांसोबत बोलून ठरवणार असल्याचे म्हटले.

□ मुखपत्रातून  आता ‘सन्माननीय बंडखोर’ असा उल्लेख

 

शिवसेनेत जे काही कथित बंड झाले त्याची पेरणी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होत असतानाच झाली होती, असा गौप्यस्फोट त्यांच्यातल्याच एकाने केला. भाजप सरकार स्थापनेच्या पहिल्या दिवसापासून सरकार पाडायचेच या ईर्षेने कसा कामास लागला होता तेच या आमदारांच्या वक्तव्याने स्पष्ट होते. यापैकी आणखी एका सन्माननीय बंडखोर आमदाराने स्पष्ट केले, ‘मातोश्रीचे दरवाजे सन्मानाने उघडले तर आम्ही आनंदाने परत येऊ!’ आता दरवाजे सन्मानाने उघडायचे म्हणजे नक्की कसे काय करायचे? ‘मातोश्री’ची परंपरा व संस्कार असा आहे की तेथे सगळ्यांचाच सन्मान होतो. दरवाजे उघडेच असतात व दाराबाहेरील चपलांचे ढिगारे हेच ‘मातोश्री’चे वैभव आणि श्रीमंती आहे,” असं शिवसेनेनं म्हटलं आहे.

स्वतःस बंडखोर म्हणवून घेणाऱ्या आमदारांनी कधी या पर्यायाचा विचार केला आहे काय? ‘चला साहेब, आता पुरे झाले. हे महाविकास आघाडीचे सरकार थांबवा. आपण बाहेर पडू व स्वबळावर हिंदुत्वाचे सरकार आणू. तोपर्यंत वाटल्यास विरोधी पक्षात बसू!’ अशी भूमिका या तथाकथित हिंदुत्ववादी बंडखोर आमदारांनी घेतली असती तर त्यांना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ‘व्वा रे माझ्या मर्दांनो!’ असे बोलून पाठच थोपटली असती. पण यापैकी काहीच घडले नाही. उलट सत्तेतून फक्त सत्तेकडे हाच मार्ग त्यांनी निवडला.

□ शिंदे – फडणवीसांचा 2 दिवसीय दिल्ली दौरा

#EknathShinde #delhi #DevendraFadnavis #tour #2day #दिल्ली #सुराज्यडिजिटल #surajyadigital

एकनाथ शिंदे यांनी गुरूवारी मुख्यमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारला आहे. आता त्यानंतर शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे आज 2 दिवशीय दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत. ते दिल्लीला भाजप पक्षश्रेष्ठींना भेटणार आहेत. त्यामुळे अमित शहा आणि जेपी नड्डा यांच्याशी खातेवाटपावर चर्चा होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिंदे आणि फडणवीस हे दोघेही संध्याकाळी दिल्लीसाठी रवाना होणार आहेत.

 

 

Tags: #Rush #preserve #ShivSena's #election #symbol #bowandarrow #ours #UddhavThackeray#शिवसेना #निवडणूक #चिन्ह #टिकवण्यासाठी #धावपळ #धनुष्यबाण #उध्दवठाकरे #शिंदेगट #राजकारण
Previous Post

‘विठ्ठल’चा चेअरमन विधानसभेच्या आखाड्यात उतरतोच; विठ्ठल परिवाराला मिळाले आक्रमक नेतृत्व

Next Post

Shinzo Abe death गोळीबार : जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांचे निधन, भारतात दुखवटा जाहीर

Surajya Digital

Surajya Digital

Next Post
Shinzo Abe death गोळीबार : जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांचे निधन, भारतात दुखवटा जाहीर

Shinzo Abe death गोळीबार : जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांचे निधन, भारतात दुखवटा जाहीर

वार्ता संग्रह

July 2022
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Jun   Aug »

ट्विटर पेज

Currently Playing

About Us

SurajyaDigital
सुराज्य डिजिटल हा ब्रँड जगाच्या काना-कोपऱ्यातील सर्वंकष माहितीचा अचूक खजिना आपल्यापर्यंत पोहोंचविण्याचे काम करतोय. टाईम मीडिया हाऊसचा हा ब्रँड अल्पावधीतच मराठी वाचकांचा अत्यंत विश्वासार्ह ब्रँड बनला आहे.जगभरातील घटनांचा वेगवान आढावा घेत त्यावर भाष्य करण्याबरोबरच वाचकांच्या आवडीचे विषय, करमणूक यासारखे दृक्श्राव्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सुराज्य डिजिटल कटीबद्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा timemediahouse@gmail.com timemarathi@gmail.com
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697