विठ्ठल हे वारकरी संप्रदायाचे म्हणजेच भागवत धर्माचे प्रमुख दैवत मानले जाते. विठोबा, विठुराया, पांडुरंग किंवा पंढरीनाथ ही दैवतं मुख्यतः ज्याला पांडुरंग म्हणून ओळखले जाते त्याला सामान्यता विष्णूचे किंवा श्रीकृष्णाचे रूप मानले जाते. विठोबा हा मुलताः एकेश्वरवादी भक्तीचा केंद्रबिंदू आहे. Ashadhi Wari Special Avaghe Garje Pandharpur Chala Nama Gajar Pandharpur Blog Article Solapur
विठोबाच्या आख्यायिका त्याच्या भक्त पुंडलिका भोवती फिरतात. वारकरी कवी ,संत त्यांची भक्ती गीते अभंग विठ्ठलाला समर्पित करतात. मराठीत रचलेले अभंग अनोख्या शैलीसाठी ओळखले जातात.
मराठी विषयाचा अभिमान हा तर ज्ञानदेवाच्या आवडीचा विषय आहे. त्यासाठी म्हणतात माझे मराठीची बोलू कौतिके | परी अमृता ते ही पैजा जिंके |ऐसी अक्षरे रसिक| मिळविण| मराठीतून साध्या सोप्या भाषेतून संतांनी ज्ञान दिले कारण पंढरपूरला येणारा वारकरी हा सामान्य माणूस आहे. त्याला अलंकारिक भाषेचे ज्ञान नसते. त्यामुळे त्यांनी वारकऱ्यासाठी सोप्या भाषेतून अभंग रचना करून ज्ञान दिले .
पंढरपूर हे तीर्थक्षेत्र सोलापूर जिल्ह्यात चंद्रभागे तीरावर वसलेले आहे. मध्ययुगीन काळात शिलालेखात कानडी भाषेत पंढरपूर या क्षेत्राचे नाव पंडरंगे, असे आहे या मंदिराला आठ प्रवेशद्वार आहेत. त्यातील पूर्वेकडील प्रवेशद्वाराला नामदेवाचे नाव देण्यात आले. पूर्वेकडील नामदेव पायरी खाली संत नामदेव यांचे पार्थिव शरीर त्यांच्या इच्छेप्रमाणे पुरले आहे. वारकरी संप्रदायाचे पंढरपूर व तेथील विठ्ठल एक कुलदैवत मानले जाते . गोरगरिबांचा देव म्हणून विठ्ठलाची ओळख होते.
आषाढ महिन्यात देवशयनी एकादशी आणि कार्तिक महिन्यात प्रबोधनी एकादशी हे विठोबाचे सर्वात महत्त्वाचे उत्सव आहेत.
” दिनाचा दयाळू” पुंडलिकाची मातृ पितृभक्ती व सेवा वृत्त पाहून भगवंत संतुष्ट झाले. पुंडलिकाच्या भेटीसाठी लोहदंड तीर्थ जवळ आले .पुंडलिक मात्यापित्याच्या सेवेत मग्न होते .भगवंताने त्यास दर्शन दिले वर दिला पुंडलिकाने त्याचे माता-पित्याची सेवा पूर्ण होईपर्यंत देवाला विटेवर उभे राहून प्रतीक्षा करण्याची विनंती केली.
भीमातीरी म्हणजे दुसरी द्वारका भगवान श्रीकृष्ण विठ्ठल रूपात कटीवर हात ठेवून भक्तासाठी युगे अठ्ठावीस वर्ष अजूनही उभा आहे. संत शिरोमणी नामदेवराय आरतीत म्हणतात, पुंडलिका भेटी परब्रह्म आले गा विठोबा हा देव भक्त, भक्तांच्या भेटीला, आलेला आहे. विठोबा संतांचा कैवारी समजला जातो. आज जे पांडुरंग महात्म्य उपलब्ध आहेत त्यात संस्कृत मधील स्कंद पुराण, पद्मपुराण आणि विष्णुपुराण ही तीन महात्मे प्रमुख म्हणून ओळखली जातात.
टाळ मृदुंगाच्या गजरात विठ्ठलाच्या नामघोषात वारकऱ्यांच्या दिंड्या एकादशीच्या अगोदर एक दिवस, पंढरपुरात दाखल होतात. झेंडे तुताऱ्या सजवलेला घोडा, अब्दागीर पालख्या इतर घोडे बैलगाड्या यांचे ताफे असतात. वारकरी हे दिंडीतून 21 दिवसाचा प्रवास करतात वर्षातील आषाढ शुक्ल एकादशीच्या पर्वावर संपूर्ण महाराष्ट्रातून गावोगावच्या देवस्थानाच्या दिंड्या 15 ते 20 दिवस पायी प्रवास करून पंढरपुरात भगवान श्री विठ्ठलाच्या दर्शनास येतात.
https://www.facebook.com/109399567404448/posts/578709143806819/
आषाढी यात्रा ही पंढरीतील मोठी यात्रा म्हणून ओळखली जाते. आषाढ महिन्यातील शुद्ध एकादशीस ही यात्रा भरते. भगवंत एकादशीपासून शयन करतात. आषाढी एकादशीपासून चातुर्मास चालू होतो. चातुर्मासात अधिकाधिक विठ्ठल गुणाचे, रूपाचे स्मरण करतात.
आषाढी कार्तिकी विसरू नका मज |सांगत असे गुज पांडुरंग||
आषाढीला विठ्ठलाचे दर्शन 24 तास सुरू असते. ज्ञानेश्वर महाराज व तुकाराम महाराज यांच्या दिंड्यासह असंख्य दिंड्या महाराष्ट्रातील तसेच इतर राज्यातील कानाकोपऱ्यातून पंढरपूरकडे श्री विठ्ठल दर्शनासाठी येतात “पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, आणि जय जय राम कृष्ण हरी” या नामघोषाने सारे वातावरण भरून जाते. वारकरी चंद्रभागे स्नान करून विठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरात शेगाव येथून पूर्णब्रह्म अधिकारी श्री संत गजानन महाराज तर आळंदीहून ज्ञानेश्वराची, देहूहून तुकारामाची, त्रिंबकेश्वर हून निवृत्तिनाथांची , पैठणहून एकनाथाची, उत्तर भारतातून कबीराची पालखी येते. या दिवशी वारकरी संप्रदायात उपवास करण्याचे महत्त्व आहे .स्थानिक विठ्ठलाची मंदिरे, शाळा, यांच्यामध्ये आषाढी एकादशी निमित्त दिंड्या विसावल्या जातात.
वर्षातून 24 एकादशी येतात. या दिवशी हरी पाठाचे नामस्मरण केले जाते. पंढरपूरचा विठ्ठल कसा आहे त्याचे वर्णन हरीपाठाच्या अभंगात आले आहे. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी| कर कटेवरी ठेवून या|| तुळशीहार गळा कासे| पितांबर आवडे निरंतर हेचि ध्यान|| वरील अभंगातून विठुरायाच्या बाह्य रूपाचे वर्णन केले जाते. तो दिसायला गोड आहे. युगे अठ्ठावीस विटेवरी उभा आहे गळ्यात तुळशीची माळ आहे. असा श्रीहरी आम्हाला दिसतो. हरिपाठ म्हणजे नेहमी ईश्वराचे नामस्मरण करण्यासाठी केलेली अभंग रचना वारकरी संप्रदायात हरीपाठाला महत्त्वाचे स्थान आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ ,संत नामदेव आणि निवृत्तीनाथ यांनी हरीपाठाचे अभंग रचले.
वारकरी संप्रदायात माऊली हा शब्द उच्चारताच ज्ञानेश्वर महाराजांची आठवण होते. या सांप्रदायात माऊलीचे कार्य अलौकिक आहे. त्याने आपले जीवन पांडुरंगाच्या भक्तीत तसेच लोकोपयोगी कार्यासाठी वाहून दिले. महाराष्ट्रात अनेक संत होऊन गेले. त्यात पुरुषाबरोबर महिला संतांनीही समाजप्रबोधनात खूप मोठा हातभार लावलेला आहे. त्यात संत मुक्ताबाई चा उल्लेख करावाच लागेल संत निवृत्तीनाथ ,संत ज्ञानेश्वर, संत सोपान देव यांच्या त्या धाकट्या भगिनी होत्या. प्रत्येक जीवाला त्रैलोक्यातील सर्व सुखे प्राप्त व्हावीत, असे मागणे ज्ञानोबाराय पसायदान यामध्ये विश्वात्मक देवाकडे मागणे मागतात. ज्ञानोबारायाचा गौरव” योग्याची माऊली” म्हणून गौरव करतात नाथाने “साधकाचा मायबाप” म्हणून गौरव केला.
https://www.facebook.com/109399567404448/posts/578587140485686/
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
https://www.facebook.com/109399567404448/posts/578586813819052/
तुकाराम महाराज म्हणतात , जगी ऐसा बाप व्हावा | ज्याचा वंश मुक्तीस जावा | पोटा येता हरले पाप |ज्ञानदेव मायबाप | आषाढी वारीत या सोहळ्यात ज्ञानोबा तुकाराम हा गजर केवळ एक सांप्रदायिक नामजप नसून त्यास सोह साधनेचे अधिष्ठान आहे एक श्वास तर दुसरा उच्छवास आहे.
तुकाराम महाराज म्हणतात “हरीच्या भक्ती नाही भय चिंता |दुःख निवारिता नारायण||” ज्याच्या मुखामध्ये विठोबाचे नाव आहे त्याला कशाचीही भीती नाही त्यासाठी तुकाराम म्हणतात नलगे वाहने संसार उदवेग | जडो नदी पांगदेवराया || असो द्यावा धीर सदा, समाधान | आहे नारायण जवळच || तुका म्हणे माझा सखा पांडुरंग | व्यापीयले जग तेणे एक ||माझा सखा माझ्याजवळच असल्यामुळे मला कशाची भय चिंता काळजी नाही.
थोडक्यात तुकारामाने विठोबाला सखा असे म्हटले आहे. तोच माझ्या जवळ व्यापून राहिला आहे. त्यामुळे संसारूपी नदी मला पार करताना कशाची भय चिंता वाटत नाही.” दसरा दिवाळी तोची आहे सन |सखे संतजन भेटतील” सण-उत्सवाप्रसंगी अनेक आप्तस्वकीय एकमेकांना भेटण्यासाठी येतात तसेच संत जन या वारीच्या सोहळ्यात एकमेकाला भेटण्यासाठी येतात आणि आम्ही सुखदुःख एकमेकापाशी व्यक्त करतो. थोडक्यात संत तुकाराम म्हणतात आज आमची भेट झाली आणि भेटीत तृप्त झालो तो आमचा सोनियाचा दिवस आहे. त्यामुळेच आमच्या मुखातून माऊलीचे नामस्मरण घडले. आम्ही संताच्या पायावर माथा टेकवून धन्य झालो.
संत तुकाराम म्हणतात भाते भरूनी हरिनामाचे | वीरगर्जती विठ्ठलाचे |अनंत नामाची आरोळी |एकेकाहूनी
बळी ||आमच्या मुखामध्ये हरिनामाचा जयघोष असल्यामुळे आम्ही शूरवीर
आहोत आणि या आवाजाच्या गर्जनामध्ये आम्ही विठ्ठलाचे नामस्मरण करतो. तुकाराम महाराज म्हणतात “तुका म्हणे आता सोड यांची आस | धरी रे कास पांडुरंग”|| संत तुकाराम महाराज म्हणतात प्रपंचाची आस आता सोडली पाहिजे आणि पांडुरंग चरणी लीन झाले पाहिजे. तरच आपणाला समाधान लाभेल असे सांगतात.
संत तुकाराम महाराज म्हणतात ‘प्रपंच’ आणि ‘परमार्थ’ हे दोन्ही जीवन जगण्यासाठी अत्यावश्यक आहेत. प्रपंच नसला तरी परमार्थ होत नाही आणि परमार्थ नसला तरी प्रपंच नीट करता येत नाही. त्यामुळे महाराज म्हणतात प्रपंच करुनी परमार्थ साधावा. वाचे अळवावा पांडुरंग खरे तर माणसाने प्रपंचात फारसे गुंतून राहू नये कारण त्याला सुख मिळेलच असे सांगता येत नाही पण प्रपंचाबरोबर परमार्थ जर करत राहिला तर निश्चित त्याला सुख भेटेल जो हरिभक्तीचा आसुसलेला आहे त्याच्या संसारात कधीच दुःख येणार नाही. त्यासाठी संसाराच्या अंगी अवघीच व्यसने |आम्ही या कीर्तने शुद्ध झालो तुकाराम महाराज म्हणतात आम्ही संसारातून थोडासा वेळ काढून तुझ्या ओढीने पंढरपूर मध्ये आलो आणि आम्ही तुझ्या सहवासाने पवित्र झालो, याचे समाधान लाभते.
https://www.facebook.com/109399567404448/posts/578206477190419/
महाराष्ट्राबरोबरच कर्नाटक ,गुजरात, राजस्थान, तामिळनाडू व आंध्र प्रदेश या राज्यातून वारकरी मोठ्या संख्येने आषाढीवारीस पंढरपूरला येतात. संत ज्ञानेश्वर व संत तुकारामाच्या पालखी समवेत जवळपास दोन लाख वारकरी विविध दिंडीतून पायी चालत येतात. पंढरपुरात सर्व जाती धर्माच्या भाविकांना गाभाऱ्यात प्रवेश मिळतो व विठ्ठल चरणी माता टेकविता येतो. मंदिरातील सोळा खांबापैकी एका खांबाला सोने व चांदीच्या पत्र्याने मडविले आहे. त्यालाच गरुड खांब म्हणतात. अनेक वारकरी या खांबाला उराउरी भेटतात आणि समाधानी होतात. पंढरीचे महात्मे वर्णन करताना म्हणतात”जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर |जेव्हा नव्हती गोदा गंगा तेव्हा होती चंद्रभागा”||
पृथ्वी तलावावर कोणताही सजीव नव्हता तेव्हा पंढरपूर अस्तित्वात होते. गोदा गंगा जेव्हा नद्या नव्हत्या तेव्हा चंद्रभागा अस्तित्वात होती याचाच अर्थ पंढरपूर हे तीर्थक्षेत्र खूपच प्राचीन आहे. संत तुकाराम म्हणतात चंद्रभागेच्या तीरावरील हे पंढरपूर भूवरीचे वैकुंठ आहे. थोडक्यात चंद्रभागे नदीत एक वेळा स्नान जरी केले तरी अनंत पाप नाशिवंत होतात. चंद्रभागेच्या वाळवंटात पुंडलिकाची समाधी आहे.
प्रत्येक वारकरी चंद्रभागे स्नान केल्यानंतर पुंडलिकाच्या मंदिराच्या दिशेने हात जोडून दर्शन घेतात. चंद्रभागेच्या तीरावर बारा घाट आहेत. त्याचा वापर वारकरी करतात. नदीच्या पात्रातील मोकळी जागा वारकरी कीर्तनासाठी वापरतात जरी विठ्ठलाचे दर्शन झाले. नाही तर शिखराचे दर्शन घेऊन समाधानी होतात. चंद्रभागा नदीला पापनाशी म्हणतात. नदीपात्रात स्नान केले तर सर्व पाप नाहीसे होते .गंगेत स्नान केल्याचे समाधान लाभते अशी आख्यायिका आहे.
विठू माऊली साठी माऊली म्हणतात हेची दान देगा देवा | तुझ विसर न व्हावा| नलगे मुक्ती धनसंपदा |संत संघ येई सदा|| विठ्ठलाला म्हणतात आम्हाला फक्त तुझ्या नामस्मरणाची दान हवेआहे कोणत्याही क्षणी तुझ्या नामस्मरणाचा आम्हाला विसर न व्हावा बाकी ऐश्वर्य संपत्ती आम्हाला नको संतांचा सहवास आम्हाला हवा आहे असेच वारकरी अपेक्षा करतात. चंद्रभागेच्या तीरावर अनेक दिंड्या विसावलेल्या असतात. हरी नामाच्या घोषाने सर्व चंद्रभागाच फुललेली असते तेव्हा संत म्हणतात”
खेळ मांडीयेला वाळवंटी घाई | नाचते वैष्णव भायी रे |क्रोध अभिमान केला पावटणी | एक एका लागतील पायी रे | आम्ही वाळवंटातच आमचा खेळ मांडला आहे. सर्व वैष्णव भक्त हरिनामाच्या नामस्मरणात तल्लीन झाले आहेत. आम्हाला ..कोणताही गर्व नाही क्रोध नाही अभिमान नाही आमचा तर अहंकार केव्हाच निघून गेला आहे. म्हणूनच प्रत्येक वारकरी माऊली म्हणून , एकमेकांच्या पायावर डोके टेकवतात.
● प्रा. दादाराव डांगे, सोलापूर
https://www.facebook.com/109399567404448/posts/578028610541539/