□ शहरात ८.१४ लाख उद्दिष्टापैकी घेतला केवळ २५ हजार जणांनीच !
□ आता शहरातील १७ केंद्रांवर लसीकरणाची सोय !
सोलापूर : सोलापूर शहरात बूस्टर डोस लसीकरण कासव गतीने झाले. शहरात ८.१४ लाख उद्दिष्टापैकी केवळ २५ हजार जणांनीच बूस्टर डोस घेतला आहे. ही संख्या पाहता अगदी नगण्य आहे. यावरून बूस्टर डोस लसीकरण कासव गतीने होत असल्याचे निदर्शनास येत आहे. Booster dose vaccination in Solapur city at a snail’s pace!
यामुळे मात्र प्राप्त झालेल्या अहवालामुळे शासनाकडून कडक निर्देश प्राप्त होताच प्रशासन जागे झाले असून यासाठी विविध सुविधा व उपाययोजनांसह नागरिकांना बूस्टर डोस घेण्यासाठी आकर्षित करण्यात येत आहे. यासाठी जोरदार धडपड ही सुरू झाली आहे.
कोरोना रुग्ण आणि बळींची संख्या वाढत असल्याने महापालिका प्रशासन खडबडून जागे झाले आहे. आता शहरातील १७ केंद्रांवर लसीकरणाची सोय करण्यात आली आहे.
राज्यासह देशाबरोबरच सोलापूर शहरात देखील कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येऊ लागले आहेत. शिवाय बळींची संख्या देखील वाढत असल्याचे अहवालावरून पुढे आणण्यात आले आहे. अशावेळी मात्र कोरोना प्रतिबंधक दोन्ही लस घेतलेल्या नागरिकांसाठी उपलब्ध करण्यात आलेले बूस्टर डोस मात्र प्रशासनाने शासनाकडे सादर केलेल्या ८ लाख लोकांच्या उद्दिष्टापैकी केवळ २५ हजार नागरिकांनीच घेतल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. उशिरा का होईना आता प्रशासनाची धडपड सुरू झाली आहे.
आधीच कोरोनाशी लढा देताना आणि याचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या निर्देशानुसार मोठ्या प्रमाणात कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली होती. सोलापूर शहरात उद्दिष्ट असलेल्या ८ लाख १४ हजार नागरिकांमधून पहिला डोस २० टक्के पात्र नागरिकांनी, दुसरा डोस तब्बल ४० टक्क्यावर पात्र नागरिकांनी घेतलाच नाही.
यासाठी महापालिका प्रशासन आरोग्य विभाग आणि जिल्हा प्रशासनाने विविध उपाय योजना आखत जोर लावला. घरोघरी पथके पाठविण्यात आली. १०० टक्के लसीकरण झाले नाही. यामुळे प्रशासन देखील हवालदिल झाले होते. मात्र पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव अचानकच पुन्हा वाढल्याने शासनाच्या नव्या निर्देशानुसार आता कोरोना प्रतिबंधक लसीकरण आणि लसीकरण पूर्ण झालेल्या पात्र नागरिकांच्या बूस्टर डोससाठी धावपळ सुरू झाली आहे.
https://www.facebook.com/109399567404448/posts/579457987065268/
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
शासनाच्या निर्देशानुसार दोन डोस झाल्यानंतर बूस्टर डोससाठी जो मोठा कालावधी ठेवण्यात आला होता तो आता कमी करून सर्वांना बूस्टर डोस देण्याचे नियोजन आखण्यात आले आहे. यानुसार शहरात आता महापालिकेच्या १५ नागरी आरोग्य केंद्र आणि प्रशासनाने दिलेल्या मान्यतेप्रमाणे २ खासगी रुग्णालय अशा १७ ठिकाणी बूस्टर डोस घेण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
आतापर्यंत शहरातील हेल्थ केअरवर्कर, फ्रंटलाईन वर्कर यांच्यासह साठ वर्षावरील ज्येष्ठ नागरिक, ४५ ते ५९ वयोगटातील नागरिक यांना प्रारंभीपासूनच कोरोना प्रतिबंधक लसीकरण देण्यात आले. यानंतर मात्र १८ ते ४४ यानंतर १५ ते १७ आणि नंतर १२ ते १४ वर्षा दरम्यानच्या मुलांना देखील लसीकरण देण्यात आले. शहरातील असे एकूण पात्र ८ लाख १४ हजार ५६५ जणांचे उद्दिष्ट व त्याचे नियोजन करण्यात आले. यामधील ६ लाख ८४ हजार ९४३ जणांनी पहिला डोस तर ५ लाख १७ हजार ५९५ जणांनी दुसरा डोस घेतला.
□ पाच टक्के लोकांनाच दिला बूस्टर डोस
दुसरा डोस घेतल्यानंतर कालावधी ठरविल्याप्रमाणे बूस्टर डोस घेणे बंधनकारक करण्यात आले, मात्र याकडे महापालिका आणि आरोग्य विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे याचबरोबर बुस्टर डोसची उपलब्धता नसल्यामुळे आत्तापर्यंत केवळ २५ हजार ६४ जणांनीच हा डोस घेतला. याची टक्केवारी उद्दिष्टाच्या ५ टक्केच्या आसपास आहे.
https://www.facebook.com/109399567404448/posts/579492293728504/