सोलापूर – सोलापूर शहर परिसरात रात्रीचे वेळी घरफोड्या करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी नुकतीच अटक केली.त्यांनी शहर परिसरात १० ठिकाणी घरफोड्या केल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्या ताब्यातून रोख रक्कम आणि दागिने असा २६ लाखाचा ऐवज जप्त करण्यात पोलिसांना यश आलंय. याबाबत विस्तृत माहिती पोलीस उपायुक्तांनी दिलीय. Ten burglary cases uncovered, thieves buy real estate in Solapur
विशेष म्हणजे घरफोडी केल्यानंतर मिळालेल्या पैशातून त्यांनी शहर परिसरात स्थावर आणि जंगम अशी ४४ लाखाची मालमत्ता खरेदी केल्याचेही तपासात निष्पन्न झाले. एकूण ७० लाखाची मालमत्ता हस्तगत करण्यात गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले. अशी माहिती पोलीस उपायुक्त बापू बांगर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
उमेश विठ्ठल खेत्री (वय ३५ मुळ रा. बरगुंडी ता. इंडी जि.विजयपूर. सध्या रा. जुळे सोलापूर, ताकमोगे मंगल कार्यालयाजवळ) आणि त्याचा नातेवाईक लव सुरेश सासवे (वय २९ रा. गांधीनगर झोपडपट्टी, आहेरवाडी ता. दक्षिण सोलापूर, सध्या रा.ज्ञानेश्वर नगर, जुळे सोलापूर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
https://www.facebook.com/109399567404448/posts/579572993720434/
त्यांच्या ताब्यातून ९ लाख १ हजार ९८० रुपये रोख, १३७ ग्राम सोन्याचे दागिने आणि ५८४ ग्राम चांदीच्या वस्तू असा एकूण २५ लाख ९४ हजाराचा ऐवज जप्त करण्यात आला. याशिवाय होंडा आणि मारुती कंपनीच्या दोन मोटारी,२ मोटार सायकल आणि चुंगी, संजावाड आणि मल्लीकार्जून नगर परिसरातील शेत जमीन आणि खुले प्लॉट असा एकूण ४४ लाख २ हजार रुपयाची मालमत्ता हस्तगत करण्यात आली.
ही कामगिरी पोलीस आयुक्त राजेंद्र माने, उपायुक्त बापू बांगर, सहाय्यक आयुक्त प्रीती टिपरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे निरीक्षक सुनील दोरगे, सहाय्यक निरीक्षक नंदकिशोर सोळुंके, संजय क्षीरसागर, श्रीनाथ महाडिक, संदीप पाटील, पोलीस अंमलदार संताजी रोकडे संतोष मोरे, निलेश शिरूर आदींनी केल्याचे यावेळी सांगण्यात आले.
□ कर्नाटक, सोलापुरात गुन्हे दाखल
दोन्ही आरोपी विरुद्ध कर्नाटक राज्यातील इंडी,चडचण, झळकी, कोप्पल टाऊन, मुंद्राबाद आणि गोलघुमट पोलीसात जबरी चोरी,दरोडा,घरफोडी आणि कॉन्ट्रॅक्ट- किलींगचे गुन्हे दाखल आहेत. सोलापूर शहरातील विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ४ गुन्हे, सलगरवस्ती पोलीस ठाण्यातील २ गुन्हे तर जोडभावीपेठ, फौजदार चावडी, सदर बझार आणि एमआयडीसी पोलीस ठाण्यातील प्रत्येकी १ असे एकूण १० गुन्हे उघडकीस आले.
हे सर्व गुन्हे दोघांनी मिळून सन २०२१ ते २०२२ या कालावधीत केले. विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या एका चोरीच्या गुन्ह्यातील १ रिव्हाल्वर देखील जप्त करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले.
https://www.facebook.com/109399567404448/posts/579594193718314/