Monday, March 27, 2023
Surajya Digital
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
  • ब्लॉग
  • अर्थाअर्थ
  • शिवार
  • Techनिक
No Result
View All Result
Surajya Digital
No Result
View All Result

अभिनेत्री सुश्मिता सेनबरोबर डेट; ललित मोदीचा खुलासा, लवकरच करणार लग्न

Date with actress Sushmita Sen; Lalit Modi's revelation, will get married soon

Surajya Digital by Surajya Digital
July 14, 2022
in Hot News, टॉलीवुड, देश - विदेश
0
अभिनेत्री सुश्मिता सेनबरोबर डेट; ललित मोदीचा खुलासा, लवकरच करणार लग्न
0
SHARES
71
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुंबई : आयपीएलचे माजी आयुक्त ललित मोदीने अभिनेत्री सुष्मिता सेनसोबत लग्नाची घोषणा ट्विटरवर केली होती. पण त्यानंतर ललित मोदीने नवीन ट्विट करत खुलासा केला आहे. आम्ही एकमेकांना डेट करत आहोत. लवकरच एकेदिवशी लग्न करु, असे ललित मोदीने स्पष्ट केले आहे. Date with actress Sushmita Sen; Lalit Modi’s revelation, will get married soon

या फोटो मध्ये ललीत मोदी आणि सेन मालदीवमध्ये सुट्टी घालवताना दिसत आहेत. या फोटोंसोबत ललित मोदी यांनी कॅप्शन लिहीलं आहे त्यामध्ये त्यांनी सुष्मिता सेनला बेटर हाफ असे म्हटले आहे. यानंतर त्यांच्या विवाहाची चर्चा सोशल मिडीयावर रंगली होती. मात्र ललित मोदी यांनी या चर्चाना उत्तर देऊन चर्चेला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केलाय. अद्याप आम्ही लग्न केलेले नसून आम्ही एकमेकांना डेट करत असून लग्नाचा दिवस देखील लवकरच उजाडेल असे स्पष्टीकरण दिले आहे.

ललित मोदींवर बायोपिक येणार असल्याचे जाहीर झाल्यापासून त्यांच्या आयुष्यातील अनेक छोट्या-मोठ्या गोष्टी चाहत्यांसमोर येत आहेत. सुष्मिता सेनसोबत रिलेशनशिपमध्ये येण्याआधी ललित मोदी यांनी त्यांच्या आईच्या मैत्रिणीसोबत लग्न केलं होतं. ललित मोदी यांचे शिक्षण परदेशात झाले आहे. परदेशात असतानाच त्यांनी त्यांच्या आईच्या मैत्रीणीला म्हणजेच मीनल यांना प्रपोज केलं होतं. त्या ललित मोदींपेक्षा नऊ वर्षांनी मोठ्या होत्या.

 

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

ललित मोदी आणि मीनल यांच्या प्रेमाला त्यांच्या कुटुंबाचा विरोध होता. त्यामुळेच त्यांनी कुटुंबाच्या विरोधात जाऊन लग्न करण्यात निर्णय घेतला. 17 ऑक्टोबर 1991 रोजी ते लग्नबंधनात अडकले. ललित मोदी आणि मीनल यांनी रुचिर नावाचा मुलगा आहे. तर रुचिर यांना आलिया नावाची एक मुलगी आहे. मीनल यांचे 2018 मध्ये निधन झाले आहे. त्यामुळे आता ललित मोदी सुष्मितासोबत लवकरच लग्नबंधनात अडकू शकतात.

 

Just back in london after a whirling global tour #maldives # sardinia with the families – not to mention my #betterhalf @sushmitasen47 – a new beginning a new life finally. Over the moon. 🥰😘😍😍🥰💕💞💖💘💓 pic.twitter.com/Vvks5afTfz

— Lalit Kumar Modi (@LalitKModi) July 14, 2022

उद्योगपती आणि आयपीएलमध्ये महत्वाची भूमिका बजावणारे ललित मोदी हे प्रसिद्ध अभिनेत्री सुश्मिता सेनशी विवाहबद्ध झाले आहेत, अशी चर्चा सुरू झाली होती. सध्या सोशल मीडियावर त्यांचे फोटो व्हायरल होण्यास सुरुवात झाली आहे. मात्र आणखीन यासंदर्भात यासंदर्भात अभिनेत्री सुश्मिता सेनकडून कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही. गेल्या काही महिन्यांपूर्वी सुश्मिताचं तिच्या बॉयफ्रेंडशी ब्रेक अप झालं होतं. ललित मोदी यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून सुष्मितासोबतचे रोमँटिक फोटो शेअर करून याची घोषणा केली आहे.

दरम्यान सोशल मीडिया वापरकर्ते आणि सुष्मिता सेनच्या चाहत्यांसाठी हा आश्चर्याचा धक्का ठरला आहे. ललित मोदींच्या पोस्टवर सोशल मीडिया वर प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. दोघेही एकमेकांना डेट करत आहेत यावर बऱ्याच जणांचा यावर विश्वास बसत नाहीये, मात्र दुसरीकडे चाहते दोघांचेही अभिनंदन करत आहेत.

दरम्यान, ललित मोदी यांचा बायोपिक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा सिनेमा क्रिडा पत्रकार बोरिया मजूनदार यांच्या ‘मॅवरिक कमिश्नर: द आयपीएल-ललित मोदी सागा’ या पुस्तकावर आधारित आहे. ललित मोदी यांच्या प्रेमाचा नवा अध्याय सुरू झाल्याने प्रेक्षकांना या सिनेमाची उत्सुकता आहे.

 

 

Tags: #Date #actress #SushmitaSen #LalitModi #revelation #married #soon#अभिनेत्री #सुश्मितासेन #डेट #ललितमोदी #खुलासा #लवकरच #लग्न
Previous Post

सोलापूर : लाचखोर तलाठ्यास दंडासह पाच वर्षाची शिक्षा

Next Post

‘दामाजी’च्या अध्यक्षांना दिला पराभवाचा उतारा; भाजपच्या आमदाराचे भाजपवाल्यांनीच केला पराभव

Surajya Digital

Surajya Digital

Next Post
‘दामाजी’च्या अध्यक्षांना दिला पराभवाचा उतारा; भाजपच्या आमदाराचे भाजपवाल्यांनीच केला पराभव

'दामाजी'च्या अध्यक्षांना दिला पराभवाचा उतारा; भाजपच्या आमदाराचे भाजपवाल्यांनीच केला पराभव

वार्ता संग्रह

July 2022
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Jun   Aug »

ट्विटर पेज

Currently Playing

About Us

SurajyaDigital
सुराज्य डिजिटल हा ब्रँड जगाच्या काना-कोपऱ्यातील सर्वंकष माहितीचा अचूक खजिना आपल्यापर्यंत पोहोंचविण्याचे काम करतोय. टाईम मीडिया हाऊसचा हा ब्रँड अल्पावधीतच मराठी वाचकांचा अत्यंत विश्वासार्ह ब्रँड बनला आहे.जगभरातील घटनांचा वेगवान आढावा घेत त्यावर भाष्य करण्याबरोबरच वाचकांच्या आवडीचे विषय, करमणूक यासारखे दृक्श्राव्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सुराज्य डिजिटल कटीबद्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा timemediahouse@gmail.com timemarathi@gmail.com
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697