सोलापूर : जमिनीच्या फेरफारला नावाची नोंद करून सातबारा उतारा देण्यासाठी लाच घेणा-या तलाठ्यास न्यायालयाने दंडासह पाच वर्षाची शिक्षा ठोठावली आहे. Bribery Talathas sentenced to five years with fine Solapur Court
मृत्युपत्र आणि न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे जमिनीच्या फेरफारची नोंद घेऊन तक्रार दारास सातबाराचा उतारा देण्यासाठी ६० हजाराची लाच घेणाऱ्या विजय हणमंतप्पा विजापुरे (रा.देगाव ता. उत्तर सोलापूर.भवानीपेठ मड्डी वस्ती) याला ५ वर्षे सक्त मजुरी आणि ४ हजार रुपये दंड अशी शिक्षा विशेष न्यायाधीश रेखा एन.पांढरे यांनी सुनावली.
तक्रारदार याची आत्या मयत झाली होती. त्यांचे मृत्यूपत्र आणि न्यायालयाने दिलेला आदेश घेऊन ते फेरफारीची नोंद करून ७/१२ चा उतारा घेण्यासाठी तत्कालीन तलाठी विजय विजापूरे याच्या कार्यालयात गेले होते. ते काम करून देण्यासाठी तलाठी विजापुरे याने तक्रारदारास ६० हजाराची लाच मागितली होती. दरम्यान तक्रारदाराने सोलापुरातील लाचलुचपत प्रतिबंध कार्यालयाशी संपर्क साधून तक्रार नोंदवली होती.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
https://www.facebook.com/109399567404448/posts/581835576827509/
त्याप्रमाणे लाचेशी रक्कम स्वीकारताना तलाठी विजापुरे याला अटक करून सदर बाजार पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यचा तपास गणेश जवादवाड (तत्कालीन पोलीस उपअधीक्षक, ॲन्टी करप्शन) यांनी करून आरोपी विजापूरे याचे विरुद्ध विशेष न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले होते. गुन्हा शाबित झाल्याने विशेष न्यायालयाने आरोपीला शिक्षा सुनावली.
यात सरकारतर्फे या खटल्यात ॲड.माधुरी देशपांडे तर आरोपी ॲड. राहुल खंडाळ यांनी काम पाहिले. कोर्ट पैरवी म्हणून सहा. फौजदार सायबण्णा कोळी, पोह.बाणेवाले आणि पोना घुगे यांनी काम पाहिले.