मुंबई : पुणे जिल्ह्यातील शिवसेनेचे नेते विजय शिवतारे यांना पक्षाने धक्का दिला आहे. पक्षाच्या विरोधात जाऊन काम केल्यानंतर तसेच पक्षाची शिस्त मोडल्यानंतर विजय शिवतारे यांना शिवसेनेतून काढून टाकण्यात आलं आहे. इतकंच नाही तर शिवतारे यांचे शिवसेना सदस्यत्व देखील रद्द केल्याची माहिती आहे. गेल्या अनेक दिवसापासून शिवतारे पक्षाच्या विरोधात बोलत होते. Expulsion continues: Vijay Shivtare’s expulsion from Shiv Sena is full of politics Purandar politics
शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामधून या हकालपट्टीची बातमी आली आहे. शिवतारे यांचे शिवसेना सदस्यत्वही रद्द करण्यात आलं आहे. पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका शिवतारेंवर ठेवला आहे. दरम्यान, या सर्व प्रकरणावर शिवतारेंनी प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरेंच्या विचारावर चालत नाहीत. एकनाथ शिंदेंनी बाळासाहेबांचे विचारावर चालण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळं मी शिंदे गटासोबत गेल्याचे शिवतारेंनी सांगितले.
शिवतारे यांचं शिवसेना सदस्यत्वही रद्द करण्यात आलं आहे. पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत उद्धव ठाकरेंच्या आदेशाने ही कारवाई करण्यात आली आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत पुरंदर मतदारसंघात शिवतारे यांचा पराभव झाला होता. दरम्यान, शिवतारेंनी एकनाथ शिंदे यांची भेट त्यांना पाठिंबा दिला होता. तसंच गुरुपौर्णिमेला शिवतारे यांनी उद्धव ठाकरेंची भेट न घेता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. विजय शिवतारे यांनी गुरूपौर्णिमेला उद्धव ठाकरे यांची भेट न घेता भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणं पसंत केलं होतं.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
https://www.facebook.com/109399567404448/posts/583063236704743/
या भेटीचा फोटोही शिवतारे यांनी पोस्ट केला होता. यातून त्यांनी शिवसेना नेतृत्वाला थेट आव्हान दिल्याची चर्चा होती. या पार्श्वभूमीवरच अखेर आता शिवसेनेतून त्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. याबाबत शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयाकडून माहिती देण्यात आली आहे.
बारामती तालुक्याला लागून असलेल्या पुरंदर विधानसभा मतदारसंघातून शिवतारे यांनी २००९ आणि २०१४ च्या निवडणुकीत विजय मिळवला होता. तसंच २०१४ मध्ये राज्यात भाजप-शिवसेना युतीचं सरकार स्थापन झाल्यानंतर त्यांच्यावर राज्यमंत्रिपदाची जबाबदारीही देण्यात आली होती.
मात्र २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना काँग्रेसच्या संजय जगताप यांच्याकडून पराभवाचा धक्का सहन करावा लागला. त्यानंतर ते पक्षात फारसे सक्रिय नव्हते. त्यातच एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर त्यांनी शिंदे गटात सामील होणं पसंत केलं. परिणामी विजय शिवतारे यांना शिवसेना नेतृत्वाच्या रोषाला सामोरं जावं लागलं आहे.
यावर प्रतिक्रिया देताना शिवतारे म्हणाले की, एकनाथ शिंदे यांचीच खरी शिवसेना आहे. उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरेंच्या विचारावर चालत नाहीत. एकनाथ शिंदेंनी बाळासाहेबांचे विचारावर चालण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळं मी शिंदे गटासोबत गेल्याचे शिवतारे म्हणाले. हे सगळं संजय राऊत यांच्यामुळे घडलं आहे. त्यांना सिजोफ्रेनिया आजार जडलाय. त्या आजारामुळं त्यांना वेगवेगळे भास होत असल्याचे शिवतारे म्हणाले.
दरम्यान, विजय शिवतारे यांच्या या हकालपट्टीनंतर पुरंदर तालुक्यात शिंदे विरुद्ध ठाकरे असा संघर्ष पेटण्याची चिन्ह आहेत. शिवतारे यांनी शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतल्यामुळे पुरंदर तालुक्यातील इतर शिवसैनिक आणि शिवतारे समर्थक यांच्यात वाद होण्याची शक्यता आहे.
https://www.facebook.com/109399567404448/posts/582934726717594/