मुंबई : राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीनंतर शिंदे सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार होणार आहे. पहिल्या टप्प्यात 10 मंत्री घेणार शपथ घेणार असल्याची माहिती मिळत आहे. शिंदे गटाचे पाच तर आणि भाजपचे पाच मंत्री घेणार शपथ घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आधी 10 मंत्र्यांना शपथ देणार असून अधिवेशन संपले की दुसऱ्या टप्प्यातील मंत्रीमंडळाचा विस्तार होणार असल्याची माहिती मिळत आहे. Failure of Shinde Fadnavis government even after fifteen days; Read when the Cabinet will be expanded
राज्यात सत्तांतर झाल्यानंतर एकनाथ शिंदे आणि फडणवीस सरकार सत्तेवर येऊन 15 दिवस उलटले, पण बराच काथ्याकूट होऊनही अजूनही मंत्रिमंडळ विस्तार करण्यात एकनाथ शिंदे यांना अपयश आलंय. ‘भारतीय राज्यघटनेच्या कलम 164 1A नुसार राज्याचे मंत्रीमंडळ किमान 12 मंत्र्यांचे असणे बंधनकारक आहे. त्यापेक्षा कमी महाराष्ट्रात 2 मंत्र्यांचे मंत्रीमंडळ जे निर्णय घेतेय, त्याला घटनात्मक संख्येच्या मंत्रिमंडळाला घटनेची मान्यता नाही. गेले 2 आठवडे वैधता नाही, राज्यपाल, हे काय सुरू आहे?’, असे ट्विट करत शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे.
राज्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे. पावसामुळे अनेक ठिकाणचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुसळधार पावसामुळे राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणी 1 जूनपासून आतापर्यंत 102 लोकांचा बळी गेला आहे. राज्यामध्ये 14 एनडीआरएफ आणि पाच एसडीआरएफ पथकाकडून बचावकार्य सुरु आहे. आतापर्यंत मुसळधार पावसामुळे सुमारे 183 जनावरांचा मृत्यू झाला आहे. पण एकडे आणखीन मंत्रिमंडळच विस्तार झाला नसल्याने मदतकार्य निर्णय घेता येत नाहीत.
पण आता राष्ट्रपती पदाची निवडणूक झाल्यानंतर 19 ते 21 जुलैदरम्यान मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
https://www.facebook.com/109399567404448/posts/583148803362853/
शिवसेनेच्या बंडखोर आमदारांच्या नाराजीची भीती, शिंदे गटाकडून अधिकच्या मंत्रिपदाची मागणी त्याबरोबरच भाजपमध्ये मंत्रिपदासाठी होत नसलेले मतैक्य या पार्श्वभूमीवर राज्यातील शिंदे सरकारचा शपथविधी लांबणीवर पडला आहे. राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत नाराजी नाट्य होऊन याचा फटका भाजप उमेदवाराला बसू शकतो. त्यामुळे निवडणूक झाल्यानंतरच 19 ते 21 जुलैच्या दरम्यान माहिती सूत्रांनी दिली आहे.
30 जून रोजी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचा शपथविधी झाला. त्यानंतर तीन आठवडे उलटून मंत्रिमंडळ विस्ताराचे घोडे गंगेत न्हाले नाही. भाजपला 29 आणि शिंदे गटाला 8 कॅबिनेट व 5 राज्यमंत्री अशी 13 मंत्रिपदे देण्याचे ठरले होते. शिंदे गटात ठाकरे सरकारमधील 7 मंत्री आहेत. त्यांना मंत्रिपद द्यावे लागणार आहे. शिंदे गटात 40 बंडखोरांसह 10 अपक्ष आहेत. म्हणूनच शिंदे गटाला अधिकची मंत्रिपदे पाहिजे आहेत. भाजपने याला होकार दिला नसल्याने मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर पडला आहे.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर लगेच राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन येत्या 25 जुलैपासून सुरू होण्याची शक्यता आहे. या अधिवेशनात कोणते महत्त्वाचे मुद्दे चर्चेत येतात याकडेही सर्वांचं लक्ष असणार आहे.
पंधरा दिवस उलटूनही राज्य सरकारमध्ये एकाही नव्या मंत्र्याचा शपथविधी झाला नाही. यावरुन राज्याचे विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी शिंदे आणि फडणवीसांवर जोरदार निशाणा साधला आहे. “दोघेच आख्ख्या महाराष्ट्राचे मालक झाले आहेत. त्यांना कोणालाही विचारायचे नाही. त्यांनी ताबडतोब निर्णय घेतले पाहिजेत. पण ते निर्णय घेताना दिसत नाहीत. दोघेच आख्ख्या महाराष्ट्राचे मालक आहेत का? 165 आमदारांचा पाठिंबा मिळूनही मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यासाठी एवढा वेळ का लागतोय?’ असा सवाल अजित पवार यांनी उपस्थित केला आहे.
https://www.facebook.com/109399567404448/posts/583063236704743/