पुणे : छातीवर दगड ठेवून एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री केलं, असं विधान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. यावरच खोचक अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली आहे. दगड छातीवर ठेवायचा की डोक्यावर ठेवायचा ? हा त्यांचा प्रश्न असल्याचे म्हणत पवारांनी भाजपला टोला लगावला. संपूर्ण सत्ता केंद्रीत करुन ठेवत दोघांनी सरकार चालवायचं ठरवल्याचं दिसतंय, असं सुद्धा पवार म्हणाले आहेत. If the stone is placed on the chest, then on the head; Sharad Pawar’s shocking reaction
पनवेल येथे काल शुक्रवारी आयोजित कार्यक्रमात भाजपचे नेते आणि माजी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांच्या निवडीवर खळबळजनक वक्तव्य केलं आहे. एकनाथ शिंदे यांना केंद्रीय नेतृत्वाने मुख्यमंत्री करण्याचा निर्णय घेतला, तो आम्ही काळजावर दगड ठेऊन स्वीकारला. आम्हाला त्या निर्णायाचं दु:ख झालं, असं चंद्रकांत पाटील म्हणाले. यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि मविआ सरकारचे प्रणेते शरद पवार यांनी खोचक प्रतिक्रिया दिलीय. पुण्यातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृहात डॉ. श्रीमंत कोकाट लिखित शिवचरीत्र आणि विचारप्रवाह ग्रंथाचं प्रकाशन शरद पवार यांच्या हस्ते झालं. यावेळेस ते बोलत होते. मंत्रीमंडळाचा विस्तारावरून पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना शरद पवार यांनी सत्ता एककेंद्रीत करण्याच्या विचाराने दोघेच कारभार पाहत असल्याचे म्हटले आहे.
शिंदे गटातील आमदार सुहास कांदे यांचे उद्धव ठाकरेंवरील आरोप आणि रखडलेला मंत्रीमंडळ विस्तार यावर देखील पवार बोलले. पाटलांच्या वक्तव्यावर पवार म्हणाले, दगड छातीवर ठेवायचा की डोक्यावर ठेवायचा हा त्यांचा प्रश्न आहे. संपूर्ण सत्ता केंद्रीत करत दोघांनी सरकार चालवण्याचा घाट शिंदे यांनी घातल्याचं दिसतं, असंही पवार म्हणाले.
https://www.facebook.com/109399567404448/posts/587823289562071/
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
एकनाथ शिंदे यांच्या सुरक्षेवर बोलताना पवार म्हणाले, सुरक्षा कोणाला द्यायची याची चर्चा कॅबिनेटमध्ये होत नाही. मुख्य सचिव, गृह सचिव, पोलीस महासंचालक आदी लोकांची एक समिती असते, त्यांचा तो निर्णय असतो. गडचिरोलीसारख्या नक्षलग्रस्त जिल्ह्याचे पालकमंत्री असल्याने शिंदे यांना विशेष सुरक्षा देण्यात आली होती, असा खुलासा शरद पवारांनी केला आहे.
सरकारच असं चालवायचं आहे. शिंदे आणि फडणवीस या दोघांनीच संपूर्ण सत्ता केंद्रीत ठेऊन सरकार चावलायचं ही भूमिका स्वीकारलेली दिसतंय. शिंदे आणि फडणवीस यांच्या या भूमिकेला केंद्र आणि राज्यातून पाठिंबा असल्याचं दिसत आहे. दोघांनीच सरकार चालवण्याला त्यांचे राज्यातील सहकारी आणि देशातील नेतृत्व या दोघांचीही संमती आहे. त्यामुळे हे सहाजिक आहे. ते सत्ताधारी आहेत. ते जे करतील ते आपल्याला स्वीकारावं लागेल, असा टोमणाही मारला. भाजपमध्ये वरिष्ठांच्या आदेशाबाबत तडजोड करता येत नाही हे फडणवीस यांनी दाखवून दिल्याचा टोमणा पवारांनी लगावला.
□ बाबासाहेब पुरंदरे यांनी केला अन्याय
इतिहासाशी संबंध असलेल्या घटकांनी जे लिखाण केलं त्यात काही ठिकाणी सत्याचा आधार आहे काही ठिकाणी अतिशयोक्ती आहे आणि काही ठिकाणी धादांत असत्य आहे. पुरंदरेंइतका अन्याय शिवछत्रपतींवर कोणी केला नाही, असं वत्तव्यही शरद पवार यांनी केले. त्यामुळे खळबळ माजली आहे.
बाबासाहेब पुरंदरेंइतका अन्याय शिवछत्रपतींवर कोणी केला नाही. रामदासांचे योगदान काय? कोंडदेवांचे योगदान काय? जास्त खोलात मी जाऊ इच्छित नाही, असंही पवार म्हणाले. समितीने निष्कर्ष काढला दादोजी कोंडदेव आणि शिवछत्रपतींचा काडीमात्र संबंध नव्हता. त्यामुळेच पुरस्कार काढून टाकण्यात आला. अनेक गोष्टी अशा ज्या न पचणाऱ्या त्यामुळे मी खोलात जात नाही. सत्यावर आधारीत नव्या पिढीला प्रेरणा देणारा वास्तव इतिहास पाहीजे असंही पवार म्हणाले.
दोन महिन्यापूर्वीच राज ठाकरेंनी बाबासाहेब पुरंदरेंना उतारवयात ब्राम्हण असल्याने पवारांनी खूप त्रास दिल्याचा आरोप केला होता. त्यानंतर आज परत शरद पवारांनी पुरंदरे यांच्या लेखनावर संशय घेतल्याने राज ठाकरे आता काय बोलणार आहेत, हे पहावे लागणार आहे.
https://www.facebook.com/109399567404448/posts/587733986237668/