नवी दिल्ली : अंमलबजावणी संचालनालयाने (ED) पश्चिम बंगालचे माजी शिक्षणमंत्री पार्थ चॅटर्जी यांना अटक केली आहे. पश्चिम बंगालमधील शिक्षक भरती घोटाळ्याप्रकरणी ही अटक करण्यात आली आहे. चटर्जी यांना अटक करून वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले आहे. ED Action: Former Education Minister Partha Chatterjee Minister Arrested West Bengal
पश्चिम बंगालमधील मंत्री पार्थ बॅनर्जी यांना शिक्षक भरती घोटाळ्यामध्ये अटक करण्यात आली आहे. बॅनर्जी यांच्या निकटवर्तीय अर्पिता मुखर्जीच्या घरातून 20 कोटींची रोकड जप्त करण्यात आली आहे. अर्पिता या मॉडेल व अभिनेत्री असून त्यांनी बंगाली चित्रपटांतून काम केले आहे. अर्पिता मुखर्जी यांची दुर्गा पूजा समितीच्या माध्यमातून पार्थ चॅटर्जीशी यांच्याशी ओळख झाली होती.
ईडीने आर्पितानंतर आता पार्थ चटर्जी यांना अटक केली आहे. अर्पिता ही पश्चिम बंगालमधील मंत्री पार्थ चटर्जी यांची निकटवर्तीय आहे. अर्पिता मुखर्जी बंगाली, ओडिया आणि तमिळ चित्रपटात काम केले आहे. अर्पिता आणि पार्थची भेट दुर्गा पुजा कार्यक्रमातूनच झाली. त्यानंतर त्यांचे संबंध वाढत गेले. अर्पिताने आपल्या करिअरमध्ये अनेक चित्रपटातून साईड रोल केले आहे. सुपरस्टार प्रोसेनजीत आणि जीतची प्रमुख भूमिका असलेल्या अमर अंतरनाड चित्रपटात तिने ,साईड रोल केला आहे.
ED is carrying out search operations at various premises linked to recruitment scam in the West Bengal School Service Commission and West Bengal Primary Education Board. pic.twitter.com/i4dP2SAeGG
— ED (@dir_ed) July 22, 2022
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
https://www.facebook.com/109399567404448/posts/587803902897343/
पश्चिम बंगालच्या ईडी कारवाईत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या मंत्रिमंडळात सहयोगी मंत्री पार्थ चॅटर्जी यांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. शिक्षक भरती घोटाळा प्रकरणी पार्थ चॅटर्जी आणि त्यांची जवळची सहकारी अर्पिता मुखर्जी यांच्या घरावर ईडीने छापे टाकले आहेत.
छाप्यांमध्ये अर्पिताच्या लपून बसलेल्या ठिकाणांवरून 20 कोटी रुपयांहून अधिक रोकड जप्त करण्यात आली आहे. केंद्रीय एजन्सीला संशय आहे की जप्त केलेली रोख रक्कम एसएससी घोटाळ्यात कमावलेली रक्कम असू शकते. अर्पिता मुखर्जीच्या घरातून 20 हून अधिक मोबाईल फोनही जप्त करण्यात आले आहेत, ज्याचा उद्देश आणि वापर याचा शोध घेतला जात आहे. पश्चिम बंगाल शाळा सेवा आयोग आणि पश्चिम बंगाल प्राथमिक शिक्षण मंडळातील भरती घोटाळ्याच्या संदर्भात ईडीने विविध ठिकाणी छापे टाकले आहेत.
□ यांच्यावरही ईडीची कारवाई
ईडीच्या छाप्यात चॅटर्जी व्यतिरिक्त शिक्षण राज्यमंत्री परेश सी. अधिकारी, पश्चिम बंगाल प्राथमिक शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष आणि आमदार माणिक भट्टाचार्य, आमदार पार्थ चॅटर्जी यांच्या निकटवर्तीय सुश्री अर्पिता मुखर्जी, तत्कालीन एमआयसी ऑफ एज्युकेशन ओएसडी पीके बंदोपाध्याय. पीएस सुकांता आचार्य ऑफ एज्युकेशन, कृष्णा सी. अधिकारी, कल्याणमय भट्टाचार्य यांचे नातेवाईक एमआयसी; पश्चिम बंगाल केंद्रीय शाळा सेवा आयोगाचे सल्लागार – 5 सदस्यीय समितीचे निमंत्रक डॉ. एस.पी. सिन्हा, पश्चिम बंगाल माध्यमिक शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष कल्याणमय गांगुली, पश्चिम बंगाल केंद्रीय शाळा सेवा आयोगाचे माजी अध्यक्ष सौमित्र सरकार, शालेय शिक्षण विभागाचे उपसंचालक आलोक कुमार सरकार यांच्यावर ही छापे टाकले आहे.
https://www.facebook.com/109399567404448/posts/587746286236438/