पुणे : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी बाबा पुरंदरे यांच्याविषयी भाष्य केले आहे. “काही इतिहासकारांनी शिवचरित्राबाबत अर्धवट माहिती दिली तर काहींनी धादांत खोटी माहिती दिली. माझ्या मते छत्रपती शिवाजी महाराजांवर बाबासाहेब पुरंदरेंएवढा अन्याय कोणीच केला नाही. रामदास शिवाजी महाराजांचे गुरु होते का याबाबत मी जास्त बोलू इच्छित नाही,” असे पवार म्हणाले. No one has done injustice to Shiv Raya as much as Babasaheb Purandar Sharad Pawar BJP state president Chandrakant Patil
आज शनिवारी पुण्यात एका कार्यक्रमात ते बोलत होते. काही इतिहासकारांनी शिवचरित्राबाबात अर्धवट माहिती दिली, त्यामध्ये बाबासाहेब पुरंदरेंचा समावेश होतो, असं वक्तव्य राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे. ‘शिवचरित्र आणि विचारप्रवाह’ या श्रीमंत कोकाटे लिखित पुस्तकाचं पुण्यामध्ये शरद पवार यांच्या हस्ते प्रकाशन झालं. या कार्यक्रमाला कोल्हापुरचे शाहू छत्रपती, जयसिंगराव पवार आदी मान्यवरांनी उपस्थिती लावली. या कार्यक्रमात शरद पवारांनी शिवचरित्राबाबत हे वक्तव्य केले आहे.
महाराजांचे गुरु या नात्याने दादोजी कोंडदेव यांच्या नावाने एक पुरस्कार सुरू केला होता. पण त्यावेळी दादोजी कोंडदेव हे शिवाजी महाराजांचे गुरु होते का, याचा शोध घेण्यासाठी एक समिती नियुक्त केली होती. या समितीने दादोजी कोंडदेव हे शिवाजी महाराजांचे गुरु नव्हते, असा निष्कर्ष काढला आहे. त्यामुळे दादोजी कोंडदेव हे शिवाजी महाराजांचे गुरु नव्हतेच. त्यांचे खरे गुरु हे राजमाता जिजाऊ याच आहेत. तसेच शिवाजी महाराज आणि रामदास स्वामी यांचाही दुरान्वये संबंध नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी यावेळी स्पष्ट केले.
शरद पवार म्हणाले, दिवंगत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा आणि वास्तववादी इतिहास लिहिला नाही. त्यांनी त्यांच्या लेखनात शिवाजी महाराजांवर कायम अन्याय केला आहे. हा अन्याय दूर करण्यासाठी शिवाजी महाराजांचा खरा इतिहास समाजासमोर आणण्याची गरज आहे. यासाठी नवीन पिढीतील इतिहास तज्ज्ञांनी पुढाकार घेतला पाहिजे.
https://www.facebook.com/109399567404448/posts/587746286236438/
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
□ मनावर दगड ठेवून आपण सर्वांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केलं
मुंबई : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पनवेल येथील प्रदेश कार्यकारणी बैठकीत मोठं वक्तव्य केलं आहे. ‘केंद्रातील नेत्यांनी आदेश दिला त्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले. मनावर दगड ठेवून आपण सर्वांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केले. आपल्याला दुःख झालं, पण आपण ते दुःख पचवून पुढे गेलो कारण आपल्याला गाडा पुढे हाकायचा होता, असं ते म्हणाले.
चंद्रकांत पाटील यांच्या या वक्तव्यामुळे मुख्यमंत्रीपदावरून भाजपमधील खदखद समोर आली आहे. चंद्रकांत पाटील यांनी हे वक्तव्य केले आहे. “आम्ही सर्वांनी मनावर दगड ठेवून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केले आहे. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय केंद्रीय नेतृत्वाने घेतला आहे. परंतु, या निर्णयामुळे आपल्याला दुःख झाले. परंतु, एवढं मोठं दुःख पचवून आपण सर्व जण पुढे गेलो ओहोत’. या वक्तव्यावरुन अनेकाच्या भुवया उंचावल्या आहेत.
चंद्रकांत पाटील म्हणाले, “मागील अडीच वर्षात राज्यात काय परिस्थिती आहे हे सर्वांनीच पाहिलं. ही परिस्थिती पाहिल्यानंतर राज्यात सत्ता बदल होण्याची गरज होती. राज्यात सत्ता बदल झालाही. सत्ता बदल होत असताना योग्य मेसेज देईल अशा व्यक्तीची गरज होती. परंतु, असे असताना देखील आपण सर्वांनी मनावर दगड ठेवून देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय नेतृत्वाने एकनाथ शिंदे यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री करण्याचा निर्णय घेतला. केंद्रीय नेतृत्वाच्या या निर्णयाचे आपल्या सर्वांना दु:ख झाले आहे. परंतु, हे दु:ख पचवून पुढे गेलो आहोत.
“देवेंद्र फडणवीस यांनी पाच वर्षे यशस्वी मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारली आहे. मुख्यमंत्री पदानंतर त्यांना उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारावी लागत आहे. परंतु, केंद्रीय नेतृत्वाचा आदेश त्यांनी मान्य करत उपमुख्यमंत्रीपद स्वीकारले आहे.” आता मात्र कार्यकारणी बैठकीमध्ये भाजपमधील खदखद समोर आली आहे.
जेव्हापासून शपथ घेतली, तेव्हापासून आपण सर्व मुंबईत आहोत त्यामुळे आता चला आपल्या घरी कामाला लागू जेव्हा सर्व ठरेल तेव्हा तुम्हाला बोलावले जाईल आणि तेही वेळेत होईल. आगामी काळात आपण खूप परिश्रम घेऊ. नेत्यांनी आदेश करायचा नसतो इच्छा व्यक्त करायची असते आणि आपण त्याच पालन करायचे असते, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.
https://www.facebook.com/109399567404448/posts/587733986237668/