सोलापूर : अज्ञात बालिकेच्या अपहरण प्रकरणी विशेष न्यायाधीश व्ही.पी आव्हाड यांनी आरोपीस दोन वर्षाच्या सक्त मजुरीची शिक्षा ठोठावली. आरोपीने लग्नासाठी मुलीचे अपहरण केल्याचे न्यायालयात सिद्ध झाल्याने त्यास शिक्षा सुनावली. Kidnapping of a girl for marriage; Accused from Sangolya sentenced to hard labor in Solapur
शंकर सदाशिव खरात पुजारी (वय-३४, रा. काटफळ, ता. सांगोला, जि. सोलापूर) असे आरोपीचे नाव आहे. यातील आरोपी शंकर पुजारी याने दि.२७ ऑगस्ट २०१४ रोजी आत्याच्या घरी कार्यक्रम आहे, असे खोटे सांगून पिडीत बालिकेला कार मधून पुणे या ठिकाणी त्याच्या बहिणीच्या घरी घेवून गेला.
पुणे येथे आरोपीने ४ दिवस पिडीतेस त्याच्या बहिणीच्या घरी ठेवले. या घटनेबाबत पिडीतेच्या वडीलांनी मोहोळ पोलीस ठाण्यात अज्ञात पिडीतेस आरोपीने लग्न करण्याच्या उद्देशाने अपहरण केल्याबाबत फिर्याद दाखल केली.
फिर्यादीचा तपास करुन न्यायालयात दोषारोपत्र दाखल केल्यानंतर सरकार पक्षातर्फे एकूण नऊ साक्षीदार तपासले. पिडीता ही अज्ञान असून तिला तिच्या पालकांच्या ताब्यातून लग्न करण्याच्या हेतूने बेकायदेशीर घेवून गेल्याबाबत साक्षीदारांच्या साक्षीवरुन गुन्हा सिध्द झाल्याबाबतचा सरकार पक्षाचा युक्तीवाद ग्राह्य धरुन विशेष न्यायाधीश व्ही.पी.आव्हाड यांनी आरोपीस २ वर्षे सक्तमजुरी व ५ हजार दंड व दंड न भरल्यास ३ महिने साधी कैद अशी शिक्षा सुनावली.
तसेच ५ हजार दंडामधून ३ हजार रूपये पिडीतेस नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले. या प्रकरणात सरकारी वकील म्हणून शितल डोके तर आरोपीचे वकील जयदीप माने यांनी काम पाहिले. यात पोलीस उपनिरीक्षक शितल घोगरे,कोर्ट पैरवी म्हणून पोलीस नाईक सोलनकर यांनी काम पाहिले.
https://www.facebook.com/109399567404448/posts/587733986237668/
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
□ सिव्हील हॉस्पिटलजवळ टेम्पोच्या धडकेने पादचारी वृद्ध ठार
सोलापूर – पोटफाडी चौक ते रंगभवन जाणाऱ्या रस्त्यावर रस्त्यावरील सिव्हील हॉस्पिटल समोर टेंपोच्या धडकेने गुलाब महेबूब बागवान (वय ६८ रा.दत्तनगर मुरुड जि.लातूर) हे पादचारी वृद्ध गंभीर जखमी होऊन मरण पावले.
हा अपघात शुक्रवारी (ता. 22) सकाळच्या सुमारास घडला. गुलाब बागवान हे सकाळी ९ वाजेच्या सुमारास शासकीय रुग्णालयासमोरील रस्ता ओलांडत होते. त्यावेळी त्यांना चक्कर येऊन ते खाली पडले. तेव्हा एमएच१३-एएन-२०४३ या टेम्पोच्या धडकेने ते गंभीर जखमी झाले. त्यांना त्वरित शासकीय रुग्णालयात दाखल केले असता ते उपचारा दरम्यान दुपारी मरण पावले. या अपघाताची नोंद सदर बझार पोलिसात झाली आहे.
□ आश्रम शाळेच्या आवारात विष प्राशन
सोलापूर : कवठे (ता.उत्तर सोलापूर) येथील आश्रम शाळेच्या आवारात संतोष महादेव पाटील (वय २१ रा.नीलम नगर, एमआयडीसी) या वॉचमनने विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना शुक्रवारी (ता. 22) दुपारच्या सुमारास घडली. त्याला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. डोकेदुखीच्या आजारास कंटाळून त्याने हा प्रकार केला अशी नोंद तालुका पोलिसात झाली आहे.
https://www.facebook.com/109399567404448/posts/587703869574013/