□ महापालिका शाळेतील शिक्षकांच्या बदल्यांच्या धोरणावर होणार शिक्कामोर्तब !
सोलापूर : एकाच शाळेत पाच वर्ष सेवेनंतर प्रत्येक शिक्षकांची बदली होणार आहे. महापालिका प्राथमिक शिक्षण मंडळाअंतर्गत 58 शाळेतील शिक्षकांच्या बदल्यांच्या धोरणावर लवकरच शिक्कामोर्तब होणार आहे. No transfers since twelve years: Now teachers who have served five years in the same school will be transferred
महापालिका प्राथमिक शिक्षण मंडळ प्रभारी प्रशासन अधिकारी संजय जावीर यांनी शिक्षकांच्या बदल्या संदर्भात पालिकेच्या विविध माध्यमांच्या 58 शाळांमधील एकूण 164 शिक्षकांची माहिती संकलित केली आहे.
महापालिका प्राथमिक शिक्षण मंडळाअंतर्गत विविध माध्यमांच्या एकूण 58 शाळा सुरू आहेत. या शाळांमध्ये 211 शिक्षक अध्यापनाचे कार्य करीत आहेत. यावरून काही शिक्षक तब्बल 10 ते 21 वर्षे एकाच शाळेत तळ ठोकून असल्याचे निदर्शनास आले आहे. मनपा शाळेतील सर्व शिक्षकांच्या बदल्यांसंदर्भात धोरण निश्चित नव्हते.
संकलित माहितीच्या आधारावर महापालिका शाळेतील सर्व शिक्षकांच्या बदल्यांचे धोरण निश्चित करण्यासाठी महापालिका उपायुक्त विद्या पोळ यांच्या मार्गदर्शनाखाली यासंदर्भात प्रस्तावही तयार करण्यात आला आहे. महापालिका आयुक्त निर्णय घेणार असून लवकरच महापालिका शाळेतील शिक्षकांच्या बदली धोरणावर शिक्कामोर्तब होणार आहे.
सोलापूर महापालिका शाळांमधील शिक्षकांच्या बदल्या गेल्या बारा वर्षांपासून झाल्याच नाहीत. याबाबत महापालिका शिक्षण मंडळाचे प्रभारी प्रशासन अधिकारी संजय जावीर यांनी गांभीर्याने लक्ष देत तातडीने पालिका शाळांच्या शिक्षकांची सेवेसंदर्भात मुख्याध्यापकांकडून
माहिती मागविली होती. कार्यवाही हाती घेतली.
https://www.facebook.com/109399567404448/posts/587696379574762/
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
□ सोलापुरात उद्या रविवारी विद्यार्थ्यांची सायकल रॅली
सोलापूर : वन विभाग सोलापूर यांच्या सहकार्याने वन संवर्धन दिनानिमित्त सोलापूर महानगरपालिका पर्यावरण विभाग यांच्या प्रोत्साहनातून इको फ्रेंडली क्लब आणि जय अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांची सायकल रॅली, नेचर वॉक आणि वक्तृत्व स्पर्धा यांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती वन विभागाच्यावतीने देण्यात आली.
हे सर्व कार्यक्रम येत्या रविवारी (ता. २४ जुलै) रोजी होणार आहेत. यावेळी सकाळी ६.३० वाजता सायकल रॅलीला जय अकॅडमी येथून सुरुवात होणार आहे. ही रॅली व्हीआयपी रोड सात रस्ता, धर्मवीर संभाजी महाराज तलाव विजापूर रोड, इंचगिरी मठ मार्गे श्री सिद्धेश्वर वन विहार येथे आल्यानंतर या रॅलीचा समारोप होणार आहे.
यानंतर सकाळी ९ वाजता आठवी, नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. वक्तृत्व स्पर्धेसाठी पर्यावरण संवर्धनात माझा सहभाग, माझ्या स्वप्नातील सोलापूर पर्यावरणपूरक सण उत्सव हे विषय असणार आहेत. विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ८७८८९९२०८० या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
https://www.facebook.com/109399567404448/posts/587662282911505/